अतिवृष्टी नुकसान भरपाई 3445 कोटी निधी आला.. पहा तुमच्या जिल्ह्याला किती?

अतिवृष्टी नुकसान भरपाई  

      2022 मध्ये राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित ( Flood-Damage-Compensation ) झालेल्या शेतकऱ्यांना मदत वितरण करण्याकरता दि.8 सप्टेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून 3456 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे.  याच संदर्भातील एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय दि. 8 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात आलेला आहे. 

     या शासन निर्णयाच्या माध्यमातून वितरित केल्या जाणाऱ्या मदतीसाठी 13 हजार 600 रुपये प्रति हेक्टर, तीन हेक्टर च्या मर्यादेमध्ये. बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टर च्या मर्यादेमध्ये. तर बहु वार्षिक पिकांच्या मदतीसाठी 36 हजार रुपये प्रती हेक्टर, तीन हेक्टर च्या मर्यादे मध्ये वितरित  केला जाणार आहे. याचबरोबर आपण जर पाहिलं त्या मदतीचा वितरण करत असताना महसूल मंडळामध्ये ( Land Record )गेल्या 24 तासांमध्ये 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली मंडळ, याचप्रमाणे ज्या मंडळामधील गावांमध्ये 33 टक्के पेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेले अशा शेती पिकांच्या नुकसानीसाठी हि मदत वितरित केली जाणार आहे. Land Record

     याचप्रमाणे शेत जमिनीवरील गाळ साठणे, डोंगराळ जमिनीवरील शेतजमिनीवरील मातीचा ढिगारा काढणं, शेती दुरुस्ती मातेचा थर काढणं, दरड कोसळणं, अशा नुकसानीसाठी सुद्धा ही मदत वितरित केले जाणार आहे. आणि याच्यासाठी सुद्धा 56.45 कोटी एवढा निधी या शासन निर्णयाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. 

जून, जुलै व ऑगस्ट २०२२ मध्ये शेतीपिकाच्या  झालेल्या नुकसानीचा तपशील खालील प्रमाणे: 

पहिला जिल्हा बाधित जालना जिल्ह्यातील ६८९८ शेतकऱ्यांसाठी 3.71 कोटी एवढी मदत केली जाणार आहे.

परभणी जिल्ह्यातील 1557 शेतकऱ्यांसाठी 1 कोटी 60 लाख रुपये, 

हिंगोली जिल्ह्यांमध्ये 1 लाख 33 हजार 970 शेतकऱ्यांसाठी, 157 कोटी 4 लाख रुपये एवढी मदत वितरित केले जाणार आहे. Land Record

नांदेड जिल्ह्यामधील सात लाख 41 हजार 946 शेतकऱ्यांसाठी 717 कोटी 88 लाख एवढी मदत वितरित केली जाणार आहे.

लातूर जिल्ह्यामधील 49 हजार 160 शेतकऱ्यांसाठी 37 कोटी 30 लाख रुपये तर उस्मानाबाद अर्थात धाराशिव जिल्ह्यामध्ये 75 हजार 739 शेतकऱ्यांसाठी 90 कोटी 74 लाख एवढी मदत वितरित केली जाणार आहे. एकूण औरंगाबाद विभागासाठी आपण जर पाहिलं तर 10 लाख 9270 शेतकऱ्यांसाठी 180 लाख एवढी मदत वितरित केली जाणार आहे. Land Record

नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यासाठी 18467 शेतकरीसाठी, 11 कोटी 24 लाख रुपये.

धुळे जिल्ह्यामधील 4497 शेतकऱ्यांसाठी तीन कोटी 39 लाख रुपये.

नंदुरबार जिल्ह्यामध्ये 877 शेतकऱ्यांसाठी 35 लाख रुपये तर जळगाव जिल्ह्यामधील 11 हजार 424  शेतकऱ्यांसाठी 19.6 कोटी रुपये.

अहमदनगर जिल्ह्यासाठी 21410 शेतकऱ्यांसाठी 2 कोटी 91 लाख एवढी मदत केली जाणार आहे. 

अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यासाठी एकूण अमरावती जिल्ह्यामधील 291 हजार 919 शेतकऱ्यांसाठी 533 कोटी 14 लाख रुपये. Land Record

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 1 लाख 488 शेतकऱ्यांसाठी 123 कोटी 62 लाख रुपये.

यवतमाळ जिल्ह्यामध्ये 3 लाख 78 हजार 461 शेतकऱ्यांसाठी 529 कोटी 98 लाख रुपय.

बुलढाणा जिल्ह्यामधील 10098 शेतकऱ्यांसाठी 8 कोटी 23 लाख रुपये तर वाशिम जिल्ह्यामधील 5856 शेतकऱ्यांसाठी 1 कोटी 76 लाख रुपये मदत दिली जाणार आहे. 

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांसाठी मिळून 5889 शेतकऱ्यांसाठी 2 कोटी 64 लाख रुपये एवढी मदत वितरित केली जाणार आहे.

व विभागातील नागपूर जिल्ह्यातील दोन लाख 67 हजार 92 शेतकऱ्यांसाठी 339 कोटी 68 लाख रुपये व वर्धा जिल्ह्यामधील 2 लाख 32 हजार 646 शेतकऱ्यांसाठी 345 कोटी 99 लाख रुपये तर भंडारा जिल्ह्यामधील एकूण 49 हजार 493 शेतकऱ्यांसाठी 63.87 कोटी रुपये तर गोंदिया जिल्ह्यामधील 28 हजार 754 शेतकऱ्यांसाठी 30.59 कोटी रुपये. Land Record

चंद्रपूर जिल्ह्यासाठी 2 लाख 30 हजार 362 शेतकऱ्यांसाठी 302 कोटी 3 लाख रुपये दिले जाणार आहेत. 

गडचिरोली जिल्ह्यातील 54637 शेतकऱ्यांसाठी 74 कोटी 1 लाख रुपये एवढी मदत दिली जाणार आहे.

पुणे जिल्ह्यातील 9192 शेतकऱ्यांसाठी 3.18 कोटी. 

सातारा जिल्ह्यामधील 982 शेतकऱ्यांसाठी 28 लाख रुपये.

सांगली जिल्ह्यामधील एकूण 185 शेतकऱ्यांसाठी 28 लाख रुपये. 

सोलापूर जिल्ह्यामधील 28 हजार 66 शेतकऱ्यांसाठी 40.53 कोटी तर कोल्हापूर जिल्ह्यातील 365 शेतकऱ्यांसाठी 9.93 लाख रुपये अशी मदत या ठिकाणी वितरित केली जाणार आहे. 

एकंदरीत राज्यामधील 27 लाख 65 हजार 727 शेतकऱ्यांसाठी 34 कोटी 45 लाख रुपये एवढी मदत दिली जाणार आहे. याचबरोबर जमिनी खरडून वाहून गेल्यामुळे शेत जमिनीवरती 3 इंचापेक्षा जास्त गाळ असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा नुकसान झालेले आहे. अशा शेतकऱ्यांसाठी 56.45 कोटी रुपये एवढा मदत सुद्धा या शासन निर्णयाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. ( वरील आकडेवारीत नजर चुकीने काही चुका होऊ शकतात तरी शेवटी दिलेला शासन निर्णय पाहावा.) शासन निर्णय डाऊनलोड करण्या करता लिंक सर्वात शेवटी दिली आहे.मित्रांनो पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या मदतीचा वितरण झाल्यानंतर या पात्र लाभार्थ्यांच्या लाभार्थी याद्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रकाशित केल्या जाव्यात, अशा प्रकारचे निर्देश सुद्धा या शासन निर्णयाच्या माध्यमातून दिले गेले आहेत. DBT च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ऑनलाईन पद्धतीने हे रक्कम वितरीत केली जावी अशा प्रकारचे निर्देश सुद्धा या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. 

अशा प्रकारचा 8 सप्टेंबर 2022 रोजीचा शासन निर्णय आपण www.gr.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावरती पाहू शकता. 

हे पण वाचा- उस्मानाबाद जिल्हयातील शेतकऱ्यांनी कसा मिळवला कंपनीकडून पिक विमा?


तर मित्रांनो अशा प्रकारे मदतीचा वितरण करण्यात आलेले जे शेतकऱ्यांच्या खात्यावरती 15 सप्टेंबर 2022 पासून क्रेडिट होण्यासाठी सुरुवात होईल.

तर मित्रांनो अशा प्रकारची एक माहिती होती आपल्याला नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्स धन्यवाद.

👉डाऊनलोड शासन निर्णय 👈

अशाच माहितीसाठी आमचा व्हॉट्स ॲप ग्रुप नक्की जॉईन करा 👇🏻👇🏻

आमच्या ईतर पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment