ई श्रम कार्ड चे फायदे काय ? कोण काढू शकतो ई श्रम कार्ड….

(What are the benefits of e-Shram card? Who can get e-Shram card)  

e-Shram Card Benefits: भारत सरकारने असंघटित कामगारांसाठी ई श्रम (eshram card) कार्डचे पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून देशातील 4 करोड कामगारांनी यामध्ये आतापर्यंत नोंदणी केली आहे. eShram कार्ड पोर्टल वरती अजूनही नवीन नोंदणी चालू आहे. इच्छुक कामगार या पोर्टलच्या माध्यमातून नवीन नोंदणी करू शकतात. नोंदणीकृत कामगारांना या पोर्टलच्या माध्यमातून ई श्रम कार्ड दिले जाणार आहे. या कार्ड वरती UAN क्रमांक असेल. या कार्ड पासून काय फायदे आपल्याला होणार आहेत (Benefit eShram Card) तसेच हे ई श्रम कार्ड कोन काढू शकतो याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

नोंदणीचे फायदे –

  • असंघटित क्षेत्रातील कामगारांना शासनाच्या सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार.
  • ई श्रम कार्डच्या प्राप्त माहितीचा वापर करून असंघटित कामगारांच्या हितासाठी च्या योजना बनवण्यासाठी शासनाची मदत करणार.
  • ई श्रम कार्ड नोंदणी नंतर 2 लाखापर्यंत अपघाती विमा मिळणार.( PMSBY अंतर्गत )
  • ई श्रम कार्ड नोंदणीकृत कामगारांना जर एखाद्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला तर त्यांच्या परिवारांना 2 लाख रुपये मिळणार.
  • एखाद्या दुर्घटनेमध्ये अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये रक्कम कामगारांना मिळेल.
  • नोंदणीकृत कामगारांना एक UAN क्रमांक दिला जाईल.

  • स्थलांतरीत कामगारांची माहिती ठेवणे शासनास सुखकर होईल.


असंघटित कामगार कोण आहेत?

➤ 43.7 कोटी असंघटित कामगार भारतात काम करत आहेत.

त्यामधील असंघटित कामगारांची काही उदाहरणे:

➧ लहान आणि सीमांत शेतकरी                     ➧ शेतमजूर

➧ पिक सामायिक करा                                 ➧ मच्छिमार

➧ पशुपालनात गुंतलेले आहेत                       ➧ बिडी लाटणे

➧ लेबलिंग आणि पॅकिंग  ➧ इमारत आणि बांधकाम कामगार 

लेदर कामगार                                          ➧ विणकर
➧ नावी                                                      ➧ घरकाम करणाऱ्या 

➧ सुतार                                                       मील कामगार

वीट भट्टी आणि दगड खाणीतील कामगार स्वामिल मध्ये कामगार

घरगुती कामगार                                     भाजी आणि फळ विक्रेते

वृत्तपत्र विक्रेते                                           रिक्षा ओढणारे 

ऑटो चालक                                             सुतार कामगार 

सामान्य सेवा केंद्र                                     रस्त्यावरील विक्रेते 

एम एन जी आर जि कामगार                      आशा कामगार 

दूध उत्पादक शेतकरी                               स्थलांतरित कामगार

 

पात्रता आणि निकष :

 

वय १६ ते ५९ वर्ष असावे

आयकर भरणारा नसावा

EPFO आणि ESIC चे सदस्य नसावे

असंघटीत कामगार श्रेणी मध्ये कार्यरत असणे आवश्यक आहे.   

नोंदणी साठी आवश्यकता :

नोंदणी तुम्ही स्वतः ई श्रम पोर्टल ( https://eshram.gov.in/ ) वरून किंवा CSC सेंटर वरून करू शकता.

1. अनिवार्य

आधार क्रमांक वापरून अनिवार्य ई केवायसी

    * ओटीपी

    * फिंगर प्रिंट

    * IRIS
चालू बँक खाते
चालू मोबाईल नंबर   

2. पर्यायी

✔ उत्पन्नाचे प्रमाणपत्र
व्यवसायाचे प्रमाणपत्र
कौशल्य प्रमाणपत्र
शिक्षण प्रमाणपत्र
 
ई श्रम कार्ड बद्दल नक्कीच सर्व माहिती आपल्याला मिळाली असेल अशी अशा करतो.
 
अशाच पद्धतीची माहिती आपल्या WHATSAPP वर मिळण्यासाठी खालील WHATSAPP ग्रुप जॉईन करा 👇👇
 
👇👇ई श्रम कार्ड कसे काढावे त्यासाठी खालील व्हिडीओ पाहा.👇👇
 

 

Leave a Comment