केंद्र सरकारच्या स्माम योजने अंतर्गत शेती औजारे घेण्यासाठी मिळणार ५० ते ८० टक्के अनुदान, काय आहे केंद्र सरकारची स्माम योजना ?


सध्या सर्वत्र महागाई भरपूर वाढली आहे, यात शेतकरी हि आहेत. खते, बियाणे , कीटकनाशक तसेच शेती अवजारच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. महाग अवजारे शेतकर्यांना घेण्यासाठी परवडत नाहीत म्हणून केंद्र सरकारने स्माम योजना (Smam Scheme) हि नवीन योजना सुरु केली आहे. या योजनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला शेती औजारे खरेदीसाठी ५० ते ८० टक्के अनुदान मिळणार आहे. मात्र बऱ्याच शेतकर्यांना या योजनेची माहिती नाही.

या योजनेसाठी फक्त जमीन नावावर असणे गरजेचे आहे. या मुळे शेती साठी जी औजारे वापरतो ती खरेदीसाठी ५० ते ८० टक्के पर्यंत अनुदान मिळणार आहे. शेती करतांना उपकरणे घेऊन शेती करणे शेतकर्यांना परवडत नसल्याने हि योजना सुरु केली आहे.

  • अर्ज करण्यासाठी हि कागदपत्रे आवश्यक 
  • ७१२ उतारा
  • आधार कार्ड
  • ८ अ उतारा
  • बँक पासबुक
  • जातीचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर

वरील  कागदपत्र लागणार आहेत.

  • असा करा अर्ज 

स्माम योजनेचा ( Smam Yojana ) लाभ घेण्यासाठी सुरवातीला https://agrimachinery.nic.in/Index/Index या वेबसाईट वर जावे लागेल.

या ठिकाणी Registration असा पर्याय आहे त्या मध्ये जावे लागेल त्यात farmer निवडावा लागणार आहे. ते निवडल्या नंतर आपल्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.

या पेज वर नवीन नोंदणी करावी लागणार आहे.

यात आपले राज्य निवडून आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर अर्जातील सर्व माहिती नीट वाचून भरावी लागेल.

शेवटी अर्ज व्यवस्थित भरून झाल्यावर submit करावे अशा पद्धतीने आपला अर्ज व्यवस्थित पूर्ण होईल.

हे पण वाचा : शेतकऱ्यांनाही भरावा लागणार आता इन्कम टॅक्स… ‘या’ पेक्षा जास्त उत्पन्न असणार्‍या शेतकऱ्यांची होणार आयकर विभागाकडून तपासणी.

वरील लेख आपल्या मित्रांना पाठवण्यास विसरू नका. किंवा आपल्या काही प्रश्न  असल्यास, कमेंट करून नक्की कळवा… धन्यवाद 🙏🏻

अशाच पद्धतीच्या नवनवीन पोस्ट साठी खाली दिलेल्या आमच्या राज्यस्तरीय WhatsApp  तसेच Telegram ग्रुप ला जॉईन करा..🙏👇

👉 जॉईन  WhatsApp group 
👉 जॉईन  Telegram Group

Leave a Comment