गणवेश, बूट, रेनकोट खरेदीसाठी या विद्यार्थ्यांच्या खात्यावर येणार आता २६४२ रुपये.


मित्रांनो समाज कल्याण विभागामार्फत शासकीय वसतिगृह निवासी शाळा मधील विद्यार्थ्यांना गणवेश रेनकोट बुट अशा शालेय उपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावरती 2642 रुपयांचा अनुदान वितरित केला जाणार आहे.
याच संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 9 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आलेला आहे. 
मित्रांनो शासकीय वसतिगृह निवासी शाळातील विद्यार्थ्यांना गणवेश बुटाचा वाटप केल जात. पण विद्यार्थ्यांना न मिळणाऱ्या वस्तू या सर्वांच्या तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या होत्या. याचबरोबर शासनाच्या माध्यमातून सर्व प्रकारचे अनुदान आता डी.बी.टी. च्या (Direct Benefit Transfer) स्वरूपात देण्यासाठी ची तयारी सुरू आहे. त्या मुळे त्या पद्धतीने अंमलबजावणी केली जात आहे. या आधारावर 2016 मध्ये घेतलेल्या शासन निर्णयानुसार आता या विद्यार्थ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यावरती या गणवेशासाठी बुटासाठी आणि रेनकोट साठी दिली जाणारी रक्कम ही वितरित करण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे. ( डाऊनलोड शासन निर्णय) त्याच्यामुळे या शासन निर्णयाच्या आधारे आता विद्यार्थ्यांना बूट त्याचप्रमाणे शालेय गणवेश पिटी गणवेश आणि रेनकोट अशा चार वस्तू खरेदी करण्यासाठी हे अनुदान दिले जाणार आहे. 
या शासन निर्णयाच्या आधारे बूट खरेदी करण्यासाठी डर्बी/बेली शूज फोम लेदर अप्पर विथ पीव्हीसी सोल अशा प्रकारच्या आकारमानास ज्याचे शासन प्राप्त किंमत 285 रुपये असेल, याप्रमाणे शालेय युनिफॉर्म याच्यासाठी 926 रुपये, पिटी युनिफॉर्म साठी 945 रुपये, तर रेनकोट खरेदीसाठी 491 रुपये अशाप्रकारे एका विद्यार्थ्याला 2642 रुपये एवढी रक्कम प्रतिवर्षी दिली जाणार आहे. याच्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश केल्यानंतर ते विद्यार्थ्याचे नोंद झाल्यानंतर त्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 60 टक्के रक्कम ही जमा केले जाणार आहे.


तसेच विद्यार्थ्यांच्या पालकाच्या माध्यमातून हा गणवेश, बुट, रेनकोट इत्यादी वस्तू खरेदी केल्यानंतर त्याच्या ज्या काही खरेदी पावत्या असतील त्या शाळेमध्ये जमा केल्यानंतर उर्वरित जी 40 टक्के ची रक्कम ही त्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. आधार सलग्न बँक खात्यावरती लाभ देण्याची जी काही कारवाई आहे, ही अतिशय गोपनीय पद्धतीने केली जाणार आहे. याच्या लाभार्थी याद्या किंवा याच्याबद्दलची माहिती कुठल्याही प्रकारे सामाजिक रित्या प्रकाशित केले जाणार नाही.

आणि अशा प्रकारचे गोपनीय माहितीसह या विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रतिवर्षी युनिफॉर्म बुटट आणि रेनकोट खरेदीसाठी 2642 रुपये एवढी रक्कम देण्यासाठी या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे.

अशा प्रकारचा हा शासन निर्णय आपण www.gr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकता किंवा याची लिंक खाली मिळेल.

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

1 thought on “गणवेश, बूट, रेनकोट खरेदीसाठी या विद्यार्थ्यांच्या खात्यावर येणार आता २६४२ रुपये.”

Leave a Comment