नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजाराचे प्रोत्साहन अनुदान.. ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय..

नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजाराचे प्रोत्साहन अनुदान.. ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय..

Join WhatsApp Group (Farmers who repay regular loans will get incentive grant of Rs 50,000 .. Important decision of Thackeray government)
ठाकरे सरकार जाण्याची सध्या शक्यता आहे. या सर्व गोंधळात मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी कॅबिनेटची बैठक घेतली आहे. या बैठकीत एक निर्णय घेण्यात आला आहे. नियमित कर्जाची ( Pik Karj ) परतफेड करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन (Incentive Grant Of 50 Thousand) अनुदान यासंदर्भात महत्त्वाची माहिती आली आहे. 


नेहमीत कर्जची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदान :


मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे ( Udhaav Thakre )यांनी जाता जाता एक महत्त्वाचा असा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला आहे. नियमित  कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजाराचे प्रोत्साहन अनुदान १ जुलै २०२२ पासून वाटप करण्यास सुरू होणार आहे. याबाबत महाविकास आघाडीच्या सरकारने दिनांक 22 जून रोजी एक महत्त्वाचा निर्णय प्रोत्साहन अनुदानाबाबत घेतला आहे. फेब्रुवारी 2022 महिन्यांमध्ये 41 हजार 55 कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले होते. यावर्षी 911 कोटी रुपयाचा कर्ज कोटा उपलब्ध करण्यात आला होता.  त्यापैकी जवळजवळ 43 लाख 12 हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.


कोणते शेतकरी असतील पात्र:


ठाकरे सरकारच्या या  निर्णय अंतर्गत राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना ( Farmer Scheme ) याचा फायदा होणार आहे. सन २०१७-१८, वर्ष २०१८-१९, व वर्ष २०१९-२० या वर्षामध्ये घेतलेल्या पिक कर्जाचे दि. ३० जून २०२२ पर्यंत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकर्यांना ( Regular Repayment Farmer) वर्ष २०१८-१९ मध्ये घेतलेल्या पिक कर्ज ( Crop Loan )रक्म्मेवर ५० हजार रु एवढी मदत दिली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी वर्ष 2018 19 मध्ये पीक कर्ज घेतले आहे.  पण त्या शेतकऱ्यांची पिक कर्जाची रक्कम ही 50 हजारांपेक्षा कमी आहे.  अशा शेतकऱ्यांना कर्जा एवढ्या रकमेची या निर्णया अंतर्गत मदत केली जाणार आहे. म्हणजेच जर एखाद्या शेतकऱ्यांचे कर्ज ५० हजार रुपयांच्या आत आहे त्यांना तेवढ्या रकमेची मदत दिली जाणार आहे. (farmer-incentive-grants-50-thousands)

अशाच पद्धतीची माहिती रोज मिळवण्यासाठी आमचा WhatsApp तसेच Telegram ग्रुप जॉईन करा.

👉 जॉईन  WhatsApp group

👉 जॉईन  Telegram Group

Leave a Comment