प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजना लाभार्थी हिस्सा भरणेबाबत नवीन अपडेट.

प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजना लाभार्थी हिस्सा भरणेबाबत सुधारित सुचना.
Kusum Solar Pump Yojana

 

     मित्रानो कुसुम सौर कृषी पंप योजना चे आपण सप्टेंबर 2021 महिन्यात ऑनलाईन अर्ज केले होते. परंतु त्या वेळेस  कमी कोठा शिल्लक असल्यामुळे आपले अर्ज हे पेमेंट करण्यासाठी प्रलंबित ठवले होते. 
     परंतु शनिवार दिनांक 7 मे 2022 पासून बऱ्याच शेतकऱ्यांना पेमेंट भरणा करण्यासाठी मेसेज येयाला सुरूवात झाली आहे. आणि काही शेतकऱ्यानी पैसे भरणा पण केला असून कंपनी ची पण निवड केली आहे. 
     याच पैसे भरणा करण्याबाबत 10 मे 2022 रोजी एक परिपत्रक महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) यांनी त्यांच्या वेसाइटवर प्रकाशित केले आहे. त्या मधील काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे:
अ) कुसुम टप्पा २ ची अंमलबजावणी दि. ६ मे २०२२ पासून सुरु झाली लाभार्थ्यांनी नोंदणी व लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी मोठ प्रतिसाद दिला आहे. लाभार्थी हिस्सा भरताना Online पद्धतीने UPI-BHIM/QR CODE चा वापर करून एकूण १३,३०० नोंदणी पैकी ८००० लाभार्थ्यांनी भरणा केला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी या सुविधाजनक पद्धतीचा अधिकाधिक व प्राधान्याने वापर करावा.
 
ब) i) ज्यांना वरीलप्रमाणे ऑनलाईन पेमेंट करणे शक्य नाही, त्या लाभार्थ्यांना ऑफलाईन पध्दतीने NEFT द्वारे देखील पेमेंट करता येईल. ज्यांनी चलन अथवा धनाकर्ष (डी.डी) हा पर्याय निवडून चलनाची / डी.डी Slip ची प्रिंट घेतली आहे, त्यांनी स्वतःचे बँक खाते असलेल्या शाखेमध्ये जाऊन त्यावरील NEFT DETAILS (बँक खाते क्र, IFSC CODE व खाते धारक- Maharashtra Energy Development Agency) च्या आधारे स्वत:च्या खात्यातून NEFT द्वारे महाऊर्जा खात्यावर रक्कम जमा करावी.
 
ii) लाभार्थ्याने Offline – NEFT केल्यानंतर बँकेचा सही शिक्का व शक्यतो UTR नंबर नमूद असलेल्या पावतीचा फोटो कुसुम पोर्टलवर आपलोड करावा.
 
iii) Offline – NEFT करतांना आपल्या बँकेमध्ये अडचण आल्यास कोटक महिंद्रा बँकेच्या
 संपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क करावा. (तपशील सोबत जोडले आहेत) 👉संपर्क यादी 👉 डाऊनलोड करा.
क) वरील दोन्ही पर्याय वापरल्यास धनाकर्ष (डी.डी) अथवा चलनाआधारे रोख रक्कम भरण्यातील अडचणी दूर होतील व विनाविलंब पुरवठादाराची निवड (Assign Vendor) या टप्प्यावर जाता येईल.
(ड) ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी धनाकर्ष (डी.डी.) अथवा चलनाद्वारे रोख रक्कम जमा करण्याचा पर्याय निवडला आहे, मात्र त्यांना वरीलप्रमाणे Online Payment / Offline – NEFT द्वारे भरणा करण्याचा पर्याय घ्यायचा असल्यास त्यांनी पुन्हा पोर्टलवर जाऊन Online Payment /Offline NEFT चा सुधारित पर्याय निवडून विनाविलंब व सहजरीत्या लाभार्थी हिस्सा जमा करता येईल. ही सुविधा दिनांक ११ मे २०२२ पासून कार्यान्वीत करण्यात येत आहे.
 
इ) ज्यांनी धनाकर्ष महाऊर्जाच्या स्थानिक कार्यालयात जमा केले आहेत, अथवा चलनाचे आधारे लाभार्थी हिस्सा महाऊर्जा खात्यावर यशस्वीपणे भरणा केला आहे, त्यांनी पोर्टलवर पुढील कार्यवाही करावी. अडचणी आल्यास पोर्टलवरील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.
 
(ई) लाभार्थी हिस्सा भरण्याची सुधारित मुदत दि. ३१/५/२०२२ अखेरपर्यंत वाढविण्यात येत आहे.
१) कोटक महिंद्रा बँक, तळेगाव दाभाडे : महाराष्ट्रातील आपल्या सर्व संपर्क अधिकारी व शाखा अधिकारी यांनी लाभार्थ्यांना सर्व सहकार्य करावे. तसेच महाऊर्जाच्या स्थानिक कार्यालयांच्या समन्वयाने अडचणी सोडवण्यात आणि तेथे जमा धनाकर्ष प्राप्त करुन ते विनाविलंब महाऊर्जा खात्यात भरणा करावेत व पोर्टलवरील माहिती तात्काळ अद्ययावत करावी.
 
२) विभागीय महाव्यवस्थापक (सर्व) : i) कार्यालयात प्राप्त धनाकर्ष समन्वयाने खालील विवरणासोबत विनाविलंब कोटक महिंद्र बँकेच्या स्थानिक शाखेत जमा करावेत. 

 

ii) लाभार्थी हिस्सा स्विकारण्यासाठी अडचणी उद्भवल्यास निराकरणासाठी बँकेच्या स्थानिक संपर्क अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवावा.
 
३) महाव्यवस्थापक सौर
 
४) वरिष्ठ संगणक संयोजक : मे इनोव्हर यांचेकडून पोर्टलवर आवश्यक सुधारणा दि. ११ मे २०२२ रोजी कार्यान्वीत करवाव्यात.
 
दिनांक 10/05/2022 रोजीचे official Website वरचे परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.👉 Download
अशाच पद्धतीच्या नवनवीन महिती साठी खाली दिलेल्या आमच्या राज्यस्तरीय WhatsApp तसेच Telegram ग्रुप ला जॉईन करा..👇
 
👉 जॉईन WhatsApp group
👉 जॉईन Telegram Group
 

1 thought on “प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजना लाभार्थी हिस्सा भरणेबाबत नवीन अपडेट.”

Leave a Comment