पीएम किसान ई – केवायसी संदर्भात सरकारचा मोठा निर्णय. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.

 

पीएम किसान ई – केवायसी संदर्भात सरकारचा मोठा निर्णय. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

केंद्र सरकारची महत्त्वाची योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना ( Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) या योजने अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपये मिळत असतात ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळत असते प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपये म्हणजे वर्षाला सहा हजार रुपये अशा रूपात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना दहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेले आहेत. आणि येत्या एप्रिल महिन्यात या योजनेचा अकरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत सरकारच्या असे निर्दशनास आले की या योजनेमध्ये मोठा गैर प्रकार घडला असून, त्यामुळे सरकारने या योजनेच्या नियमामध्ये काही बदल केले आहेत. त्यामुळे सरकारने शेतकरयांना ई-केवायसी ( pm kisan eKyc ) करण्यासाठी सूचना दिल्या होत्या… त्याची मुदत ही 31 मार्च ठेवली होती. जे शेतकरी eKyc करणार नाहीत त्या शेतकऱ्यांना या योजनेचा 11 हफ्ता मिळणार नाही असेही सांगितले होते.


परंतु या योजनेची eKyc करतांना भरपूर आश्या तांत्रिक अडचणी शेतकऱ्यांना येत आहेत. ही eKyc ची प्रक्रिया ऑनलाईन असली तरी बऱ्याच शेतकऱ्यांना त्याबाबत माहिती नाही. त्यामुळे शेतकरी स्वतः सी.एस.सी. सेंटर वरती जाऊन आपली eKyc करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

  • eKyc करण्यासाठी मुदतवाढ :
eKyc करण्यासाठी शेतकऱ्याना सीएससी सेंटर वरती बऱ्याच अश्या तांत्रिक अडचणी येत आहेत. कधी वेबसाईट बंद असते तर कधी सर्व्हर प्रॉब्लेम मुळे जाम असते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे सर्व कामे सोडून तासंतास सी. एस. सी. सेंटर वरती बसून राहावे लागत आहे. त्यामुळे eKyc प्रक्रियेत अडचणी येत असल्यामुळे शेतकऱ्यांना ३१ मार्च पर्यंत eKyc करणे शक्य नव्हते. तसेच या साठी मुदतवाढ देण्याची मागणी ही करण्यात येत होती. परंतु आज राज्याचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी या योजने संदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णय मध्ये प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेची ई- केवायसी ची मुदत ३१ मार्च २०२२ वरून ३१ मे २०२२ अशी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आता आपली eKyc ची प्रक्रिया आता ३१ मे २०२२ पर्यंत पूर्ण करू शकणार आहेत. ( Pm Kisan Ekyc last date) या निर्णयामुळे सर्व शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपली eKyc ३१ मे पूर्वी करून घ्यावी.

वरील लेख आपल्या मित्रांना तसेच नातेवाईकांना पाठवण्यास विसरू नका. किंवा आपल्या काही प्रश्न  असल्यास, कमेंट करून नक्की कळवा… धन्यवाद🙏🏻

अशाच पद्धतीच्या नवनवीन पोस्ट साठी खाली दिलेल्या आमच्या राज्यस्तरीय WhatsApp  तसेच Telegram ग्रुप ला जॉईन करा..🙏👇

👉 जॉईन WhatsApp group 
👉 जॉईन Telegram Group

Leave a Comment