पीक पाहणी व्हर्जन २ ॲप मधील नवीन सुधारणा – E Peek Pahani Version 2 App New Changes

E Peek Pahani Version 2

 1. Geo Fencing. सुविधा. 
ई पीक पाहणी Epeek pahani सुधारित मोबाईल ॲपमध्ये राज्यातील प्रत्येक गटाच्या मध्यबिंदूचे (centroid) अक्षांस व रेखांश समाविष्ट करण्यात आले असून शेतकरी ज्यावेळी पीक पाहणी करतांना पिकाचा फोटो घेतील त्यावेडेस फोटो घेण्याच्या ठिकाणापासून त्या गटाच्या मध्यबिंदू (centroid) पर्यतचे अंतर आज्ञावलीमध्ये दिसणार आहे. व शेतकरी पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटापासून दूर असल्यास त्यांना त्या बाबतचा संदेश मोबाईल अॅपमध्ये दर्शविण्यात येणार आहे. या सुविध्येमुळे पिकाचा अचूक फोटो घेतला आहे किंवा नाही हे निर्धारित करता येणार आहे.
2. ई- पीक पाहणी शेतकयांद्वारे स्वयं प्रमाणीत मानण्यात येणार E Peek Pahani App
शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेल्या पिकांबाबत Crop आज्ञावलीमध्ये स्वयं घोषणापत्र घेतले जाणार असून अश्या रीतीने शेतकऱ्यांनी केलेली ई – पीक पाहणी स्वयं प्रमाणित मानण्यात येऊन ती गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिबीत होणार आहे.

इथे क्लिक करून ई पिक पाहणी अप डाउनलोड करा 

3. किमान 10% तपासणी तलाठी यांचेमार्फत.
वरील प्रमाणे शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पाहणी पैकी १०% नोंदीची पळताळणी तलाठी यांचे मार्फत करण्यात येणार असून त्यामध्ये पिकाचा फोटो नसलेल्या नोंदी, चुकिचा फोटो असलेल्या नोंदी व विहित अंतराच्या बाहेरून घेतलेले फोटो अशा नोंदीचा समावेश असणार आहे. तलाठी हे पळताळणी अंती आवश्यक असल्यास दुरुस्ती करून त्या नोंदी सत्यापित करतील. त्यानंतर त्या गाव नमुना नंबर १२ मध्ये प्रतिबिबीत होतील.
4. 48 तासात खातेदारास स्वतः पीक पाहणी दुरुस्तीची सुविधा
शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी  Epeek Pahani मोबाईल ॲपद्वारे नोंदविलेली पीक पाहणी अशी पीक पाहणी नोंदविल्या पासून ४८ तासामध्ये स्वत:हून केव्हाही एक वेळेस दुरुस्त करता येईल.
5. किमान आधारभूत किंमत योजनेंअंतर्गत पिकाच्या विक्रीसाठी संमती नोंदविण्याची सुविधा

किमान आधारभूत योजने अंतर्गत येणाऱ्या पिकांची ई-पीक पाहणीसाठी शेतकर्यांनी नोंदणी केल्यास ई-पीक पाहणी ॲपमध्येच शेतकऱ्याला “आपणास किमान आधारभूत किमान योजने अंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करावयाची आहे काय ? असा प्रश्न विचारला जाणार आहे. शेतकऱ्याने होय असा पर्याय निवडल्यास अशा सर्व शेतकऱ्यांची माहिती वेब आज्ञावलीद्वारे पुरवठा विभागाला दिली जाणार असून त्याआधारे पुरवठा विभागाच्या किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत अशा शेतकऱ्यांची नोंदणी आपोआप होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रामध्ये जाऊन रांगेत उभे राहून नोंदणी करण्याची आवश्यकता भासणार नाही.
6. मिश्र पिकांमध्ये मुख्य पिकासह तीन घटक पीके नोंदविण्याची सुविधा
यापूर्वीच्या मोबाईल अॅपमध्ये मुख्य पीक व दोन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधा उपलब्ध होती. मात्र क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मागणी प्रमाणे एक मुख्य पीक व तीन दुय्यम पिके नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दुय्यम पिकांचा लागवडीचा दिनांक, हंगाम व क्षेत्र नोंदविण्याची सुविधा देखील देण्यात आलेली पिकांची आहे. त्यामुळे दुय्यम अचूक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
 7. संपूर्ण गावाची पीक पाहणी पाहण्याची सुविधा.
ई-पीक पाहणी मोबाईल अॅपमध्येच त्या गावातील खातेदारांनी नोंदविलेल्या पीक पाहणीची माहिती पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याद्वारे खातेदारांना पीक पाहणीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास वेळेत तलाठी यांचे कडे अर्ज करणे शक्य होणार आहे.
8. ई-पीक पाहणी अॅपमध्येच मदत बटन देण्यात आलेले आहे.
वापरकत्याला ई-पीक पाहणी मोबाईल अॅप वापरतांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी अॅपमध्ये ” मदत हे बटन देण्यात आलेले आहे. या बटणवर क्लिक केल्यावर नेहमी विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे देण्यात आलेली आहेत (FAQ), तसेच ई-पीक पाहणी ॲपमधील कायम पड़ क्षेत्र नोंदविणे, बांधावरची झाडे नोंदविणे, पिकांची माहिती नोंदविणे, गावची पीक पाहणी पाहणे, इत्यादी बाबतची माहिती देणाऱ्या दृकश्राव्य क्लीप (audio video clip) च्या लिंक देण्यात आलेल्या आहेत. याचा वापर करून शेतकरी अॅप वापरतांना येणाऱ्या अडचणी सोडवू शकतील. 
 9. अॅप बाबत अभिप्राय व रेटिंग नोंदविण्याची सुविधा.
ई-पीक पाहणी व्हर्जन- २ मध्ये वापरकर्त्यांना ॲपबाबत त्यांचे अभिप्राय नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
10.खाता update करण्याची सुविधा
पीक पाहणी हंगाम सुरु असताना खात्यामध्ये काही बदल झाल्यास उदा. क्षेत्रात बदल असे updated खात्याची माहिती ई प्रणालीतून फेरफार मिळविन्यासाठी खाताअपडेट करा ही सुविधा देण्यात आली आहे
ई-पीक पाहणी कालावधी
  • शेतकर्यांनी करावयाची पिक पाहणी
हंगाम                                     कालावधी
खरीप                            1 ऑगस्ट  ते 15 ऑक्टोबर 
रबी                               15 नोव्हेंबर ते 31 जानेवारी
उन्हाळी                        15 फेब्रुवारी ते 15 एप्रिल
  • तलाठी स्तरावर करावयाची पिक पाहणी
हंगाम                                     कालावधी                        
खरीप                         16 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर
रबी                            1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 
उन्हाळी                      16 एप्रिल ते 15 मे
टिप : यामध्ये काही कारणास्तव हंगामामध्ये शेतकरी स्तरावरील पिक पाहणी करणेसाठ मुदत वाढ देण्यात अल्यास त्याप्रमाणे कार्यवाही करावी.
> तलाठी लॉगीन मधून पीक पाहणी नोंद दुरुस्त करणेसाठी त्या हंगामातील शेतकरी स्तरावरील पिक पाहणी करणेसाठी दिलेला कालावधी + तलाठी स्तरावरील पिक पाहणी साठी दिलेला कालावधी + 15 दिवस असा कालावधी
> मंडळ अधिकारी लॉगीन मधून पीक पाहूणी नोंद दुरुस्त करणेसाठी त्या हंगामातील शेतकरी स्तरावरील पिक पाहणी करणेसाठी दिलेला कालावधी + तलाठी स्तरावरील पिक पाहणी साठी दिलेला कालावधी + 15 दिवस असा कालावधी

Leave a Comment