प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 11वा हप्ता कधी मिळणार? जर यादीत नाव नसेल तर अशा प्रकारे करा तक्रार.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील 12 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून त्यांना दरवर्षी 6 हजार रुपयाची मदत केंद्र सरकार मार्फत करण्यात येत असते. दर चार महिन्याला 2 हजार रुपयाचा हप्ता केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करीत असते.

आतापर्यंत केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा हप्ते पूर्णपणे जमा केले आहेत. तसेच लवकरच ११ हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.  गेल्या काही दिवसापासून पीएम किसान सम्मान निधि योजना चे लाभार्थी आहेत ते अकराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत.  त्यांना लवकरच एक खुशखबर केंद्र सरकार कडून मिळू शकते असा अंदाज आहे. 

एप्रिल ते जुलै  महिन्याचा ११ वा हप्ता हा आपल्याला एप्रिल महिन्यात येऊ शकतो.  pm kisan परंतु त्यापूर्वी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी च्या पोर्टल वरती त्यांच्या नावाची खात्री करून घ्यायची आहे. म्हणजेच त्यात काही चुका असल्यास त्या दुरुस्त करायच्यात त्या चुका जर आपण दुरुस्त नाही केला तर आपल्या खात्यावर हा अकरावा हप्ता येणार नाही. 


आता नेमका प्रधानमंत्री किसान सन्मान निधी च्या पोर्टल वरती आपल्याला काय चेक करायचे हे जाणून घेऊयात.

 • आपले नाव अकराव्या हप्त्याच्या यादीत आहे की नाही हे आपल्याला तपासून पाहायचे आहे.

 • आपल्या बँक खात्याची आपण पी एम किसान चा वेबसाईट वरून किंवा सीएससी सेंटर वरून केवायसी केली असेल तर ती अपडेट झाली की नाही ही एक गोष्ट तपासायची आहे.

 • तसेच जर आपले नाव या यादीत नसेल तर ताबडतोप आपल्याला  तक्रार करायची आहे. म्हणजेच पुढील हप्ता मिळण्यासाठी आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही.


 •  तक्रार कशी करायची हे पाहुयात:


 •  पहिल्यांदा आपल्याला काय करायचे pmkisan.gov.in या प्रधानमंत्री किसान योजनेच्या वेबसाईट वरती जायचे आहे.

 • पोर्टल वरती गेल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला फार्मर कॉर्नर म्हणून एक पर्याय दिसेल त्यावर ती क्लिक करायचे आहे.

 • फार्मर कॉर्नर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला बेनिफिशियरी स्टेटस ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.

 • बेनिफिशियरी स्टेटस या पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपला आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून आपले प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची स्थिती तपासायचे आहे.

 •  ही सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यावर तुम्ही आपले नाव यादी पाहू शकता.


समजा आपल्याला आतापर्यंत योजनेचा लाभ मिळाला असेल,  म्हणजेच आपल्याला या अगोदर काही हप्ते आले आहेत पण काही हा हप्त्याची रक्कम आपल्याला अद्याप पर्यंत ही मिळाली नाही तर आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची हेल्पलाइन आहे त्यावर ती कॉल करून किंवा इमेल करून आपली तक्रार नोंदवू शकता.


 • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे हेल्पलाइन क्रमांक खालील प्रमाणे आहेत:


 • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी चा नवीन हेल्पलाइन नंबर -011-24300606

 • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी चा टोल फ्री क्रमांक-18001155266

 • प्रधानमंत्री किसान हेल्पलाइन क्रमांक-155261

 • प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा लँडलाईन क्रमांक- 011-23381092, 23382401

 • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी चा आणखीन एक हेल्पलाईन क्रमांक – 0120-6025109


 • प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेचा ई-मेल आयडी :

                    [email protected] 


हे पण वाचा 👉 शेतकऱ्यांनाही भरावा लागणार आता इन्कम टॅक्स… ‘या’ पेक्षा जास्त उत्पन्न असणार्‍या शेतकऱ्यांची होणार आयकर विभागाकडून तपासणी.


वरील लेख आपल्या मित्रांना पाठवण्यास विसरू नका. किंवा आपल्या काही प्रश्न  असल्यास, कमेंट करून नक्की कळवा… धन्यवाद 🙏🏻

 

अशाच पद्धतीच्या नवनवीन पोस्ट साठी खाली दिलेल्या आमच्या राज्यस्तरीय WhatsApp  तसेच Telegram ग्रुप ला जॉईन करा..🙏👇

👉 जॉईन  WhatsApp group

👉 जॉईन  Telegram Group

Leave a Comment