फळ पिक विमा 2021-22 निधी वितरित, लवकरच होणार वाटप.

 

फळ पिक विमा 2021-22 निधी वितरित, लवकरच होणार वाटप.

         राज्यांमध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे फळबागांना, फळ पिकांना होणाऱ्या नुकसाना पासून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना (Weather Based Fasal Bima Yojana) राबवली जाते. आणि याच योजनेसाठी निधी वितरीत करण्याच्या संबंधातील महत्वपूर्ण असे शासन निर्णय 8 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात आलेले आहेत. तसेच आपण जर पाहिलं तर 2021 मध्ये आंब्या बहार गारपीट, त्याचप्रमाणे मृग बहार हा फळ विमा ( Pik Vima ) बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आलेला आहे. परंतु अद्याप देखील बरेच सारे शेतकरी या पिक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. 2022 च्या हंगामामध्ये सुद्धा बरेचसे शेतकऱ्यांनी अतिवृष्टी (heavy rain) पावसाचा खंड या कारणामुळे क्लेम केलेले आहेत. परंतु निधीच्या उपलब्धतेमुळे कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विम्याचा (Crop Insurance) वाटप केले जात नाही. याच पार्शवभूमीवरती या पिक विमा योजना ( Fasal Bima Yojana) 2021-22 या हंगामासाठी आज दि. (8 सप्टेंबर 2022) निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.


याच्यामध्ये पहिला शासन निर्णय आहे पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना (Weather based crop insurance scheme) अंबिया बहार सन 2021-22 करता. 16.88 कोटी रुपये एवढा निधी वितरित करण्याच्या संबंधातील.


तसेच यानंतर दुसरा शासन निर्णय घेण्यात आलेल्या पुनर्रचित हवामान आधारित फळ विमा योजना (Weather based crop insurance scheme) आंबिया बहार गारपीट 2021-22 साठी 9.35 कोटी रुपये एवढा निधी वितरित करण्याबाबत.


याचप्रमाणे पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना (Weather based crop insurance scheme) मृग बहार सन 2022 म्हणजेच सध्याचा जो खरीप हंगाम चालू आहे या हंगामासाठी 19.65 कोटी एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे.


 याचप्रमाणे सन 2020 मध्ये मृग बहार विमा योजने (Fruit Crop Insurance) करता 4.75 कोटी रुपये एवढा निधी सुद्धा या शासन निर्णयाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.


याचप्रमाणे पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना (Weather based crop insurance scheme) मृग बहार करता 42 लाख 36 हजार 461 रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी देखील मंजुरी देण्यात आलेली आहे.


तर अशा प्रकारचे शासन निर्णय घेऊन या फळ पिक विमा (Crop Insurance) योजने करता निधी वितरणासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे जेणेकरून जे शेतकरी पिक विमा पासून वंचित आहे किंवा ज्यांनी क्लेम केलेले आहेत. अशा शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यासाठी या ठिकाणी मदत होऊ शकते.


तर मित्रांनो फळ पिक विमा (Fruit Crop Insurance) योजनेच्या संदर्भातील हे एक असं महत्त्वाचा अपडेट होतं ज्याची माहिती आपल्याला नक्की आवडली असेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद…!


हे पण वाचा- अतिवृष्टी नुकसान भरपाई 3445 कोटी निधी आला, पहा तुमच्या जिल्ह्याला किती?


वरील सर्व शासन निर्णय PDF खालील लिंक वरून डाउनलोड करा 👇👇

अशा प्रकारच्या माहिती साठी आमचा व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment