माहितीचा अधिकार अंतर्गत ग्रामपंचायतच्या मागील तीन वर्षाच्या ऑडिट रिपोर्ट अहवाल साठी असा करा अर्ज

माहितीचा अधिकार अर्ज


माहितीचा अधिकार अर्ज कसा करावा (Mahiticha Adhikar Arj Kasa Karava)


ग्रामपचायतींना आपल्या कारभाराचा लेखाजोखा संपूर्ण (How to apply Right to Information) शासनाला द्यावा लागतो. यासाठी (Grampanchayat Audit Report ) ग्रामपंचायतींचे ऑडिट होते. त्यातून त्यांनी खर्च केलेल्या निधीचे विवरण तसेच आलेल्या निधीचे वितरण असते. ग्रामपचायतींनी आपल्या ऑडिटची रिपोर्ट (Grampanchayat Audit Report ) ग्राम संभेत दिली पाहिजे आणि हे बंधनकारक आहे. ग्रामपचायतींचे दरवर्षी ऑडिट करून घेणे हे सरपंच आणि ग्रामसेवक यांची जबादारी असते. लेखापरीक्षक यांनी ऑडिट मध्ये काढलेल्या त्रुटी जाणून घ्या त्या त्रुटींची ग्रामपंचायत ( Grampanchayat) पूर्तता करते का ते ही जाणून घ्या. हा सामान्य नागरिकाचा अधिकार आहे. 


ग्रामपचायतींचा मागील 3 वर्षांचा लेखा परीक्षण अहवाल म्हणजे ऑडिट रिपोर्ट पाहण्यासाठी खालील बाबी अर्जामध्ये नमूद करामाहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत कलम 3 अन्वये अर्ज

(जोडपत्र ‘अ’ नियम 3 नुसार)


प्रति, जनमाहिती अधिकारी, 

ग्रामसेवक……….. ग्रामपंचायत कार्यालय, 

ता. ……….. जि. …………


अर्जदार नाव व पत्ता :

माहितीचा विषय: ग्रामपंचयतीचा मागील 3 वर्षांचा लेखा परीक्षण अहवाल मिलनेबाबत


१) ग्रामपंचायतीने सन…… ते सन …… मध्ये केलेली विकास कामे कधी केली कुठे केली किती निधी वापरण्यात आला कसा निधी वापरण्यात आला. या विकास कामांसाठी केंद्र सरकार किंव्हा राज्य सरकार कुठून निधी आला आहे याचा तपशील देण्यात यावा.


२) आपल्या ग्रामपंचायतीने मागील 3 वर्षाच्या लेखा परीक्षण (Audit Report) अहवालाच्या छायांकित प्रती द्यावा.


३) ग्रामपंचायतीमध्ये किती कर्मचारी आहे त्यांचे वेतन किती, ग्रामपंचायतीचा मासिक खर्च किती, याचा तपशील देण्यात यावा.

४) ग्रामपंचायातील सन …… ते सन….. मध्ये प्रतिवर्षी कोण कोणत्या संस्थे मार्फत निधी आला आहे. या निधीचा विनियोग कुठे व कसा करण्यात आला याची माहिती देण्यात यावी.


५) सन……… ते सन…….. यामध्ये झालेल्या ग्रामसभाची माहिती देणे सभेला उपस्थित लोकांची यादी देणे ठरवांची यादी देणे व ठरवांच्या छायांकीत प्रती मिळाव्या.


माहिती व्यक्तिशः / स्पीडपोस्टने हवी


दिनाक:                                                                                                                  अर्जदार सही

पत्ता:                                                                                                                      मोबाईल नंबर:


वरील नमुना PDF स्वरुपात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

हे पण वाचा : आपल्या ग्रामपंचायत मध्ये कोणत्या नवीन योजना आल्या? आणि कोणत्या नागरिकांना त्याचा लाभ मिळाला पहा ऑनलाईन.


याप्रकारे अर्ज करून जमा करावा म्हणजे आपल्याला सर्व माहिती पोहोच मिळेल. त्या माहितीमध्ये काही त्रुटी असेल तर आपण तत्काळ कारवाई करू शकतो किंव्हा ग्रामसभेत मुद्दा उपस्थित करू शकतो.


सर्व अपडेट लवकर मिळवण्यासाठी आम्हाला गूगल न्यूज (Google News) ला स्टार ⭐ बटणावर क्लिक करून फॉलो करा. 🙏😊

👇👇👇👇👇

https://news.google.com/publications/CAAqBwgKMLC6tAswvdXLAw?

ceid=IN:en&oc=3

Leave a Comment