या जिल्हयात नवीन आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज सुरु? मोफत मिळवा आपले सरकार सेवा केंद्र…

Aaple Sarkar Seva Kendra

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स अंतर्गत राज्यातील ग्रामीण व  शहरी भागात नागरिकापर्यंत शासकीय निमशासकीय तसेच खाजगी सेवा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपले सरकार सेवा केंद्रे हे प्रत्येक गावतील ग्रामपंचायत हद्दीत नगरपंचायत हद्दीत तसेच नगर परिषद व महानगरपालिका हद्दीत आपले सरकार सेवा केंद्रे महाराष्ट्र शासन, शासन निर्णय क्र.मांतंसं/१७१६/प्र.क्र.५१७/३९ दिनांक १९ जानेवारी २०१८ अन्वये सुरु करत असते. New Aaple Sarkar Seva Kendra Latur
त्या मध्ये सध्या लातूर व बुलढाणा या जिल्यात नवीन आपले सरकार सेवा केंद्र साठी अर्ज सुरु झाले आहेत.

रिक्त जागेचा तपशील व अर्ज करण्याची माहिती खालील प्रमाणे :
  • लातूर  New Aaple Sarkar Seva Kendra Latur 

लातूर जिल्ह्यामध्ये ७५ आपले सरकार सेवा केंद्रा साठी जागा रिक्त आहेत. रिक्त जागेसाठी आपण २३ मार्च २०२२ ते ०६ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज सादर करावेत. तरी लातूर जिल्ह्यातील इच्छुक अर्जदारांनी या कालावधीत रिक्त असलेल्या कार्यक्षेत्रात आपले सरकार सेवा केंद्रासाठी कार्यलयीन वेळेत आपले अर्ज सादर करावेत.

लातूर जिल्यातील अर्ज प्रक्रिया हि ऑफलाईन पद्धतीने आहे. तसेच नियम अटी व अर्ज नमुना करिता खालील जाहीर प्रसिद्धी पहावी.👇

  • बुलढाणा Aaple sarkar Seva Kendra Buldhana

बुलढाणा जिल्ह्यामध्ये ५५४ आपले सरकार सेवा केंद्रा साठी जागा रिक्त आहेत.  दिनांक २४/०२/२०२२ बुलढाणा जिल्ह्याची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिराती मध्ये ऑनलाईन अर्ज भरण्याचा दिनांक ०७ मार्च २०२२ ते १९ मार्च २०२२ हा होता. आता त्यामध्ये मुदत वाढ करण्यात आली असून ती आता ७ मार्च २०२२ ते ३१ मार्च २०२२ अशी आहे. नवीन आपले सरकार सेवा केंद्र मुदत वाढीचे सुद्धीपत्रक  👉 सुद्धीपत्रक  

ऑनलाईन अर्ज भरण्याची वेबसाईटhttps://bulsetudit.in/CSCBULDHANA/
जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी:  https://cdn.s3waas.gov.in/s3a5771bce93e200c36f7cd9dfd0e5deaa/uploads/2022/03/2022030787.pdf
टीप – अर्ज करण्यापूर्वी सर्व नियम व अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.

अशाच पद्धतीच्या नवनवीन पोस्ट साठी खाली दिलेल्या आमच्या राज्यस्तरीय WhatsApp  तसेच Telegram ग्रुप ला जॉईन करा..🙏👇

👉 जॉईन WhatsApp group 
👉 जॉईन Telegram Group

Leave a Comment