या शेतकऱ्यांना मिळणार ५० हजार रुपये? अजित पवार यांचा खुलासा…!

 

वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकर्यांना सरकार ५०००० रुपयाचे प्रोत्साहन देणार आहे.


राज्य सरकारकडून एक निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचा राज्य सरकार कडून निर्णय घेण्यात आला आहे.  पण कोणत्या काळात कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना ही 50 हजार रुपयाची रक्कम दिली जाणार आहे? तसेच ही मदत रक्कम केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे?  असे अनेक प्रश्‍न शेतकऱ्यांच्या मनात येत आहेत. या प्रश्नाबाबत अर्थमंत्री अजित पवार यांनी बुधवारी एक खुलासा केला आहे.

नेमके कोणत्या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. हे आपण आता सविस्तरपणे पाहू- 

वर्ष 2017-18, वर्ष 2018 -19 आणि तसेच 2019-20 या वर्षात ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाची दिनांक 30 जून 2020 पर्यंत कर्जाची रक्कम नियमित परतफेड करणाऱ्या कर्जधारकांना म्हणजे शेतकऱ्यांना वर्ष 2018-19 मध्ये घेतलेल्या कर्ज रकमेवर 50 हजार रुपये एवढी रक्कम ही दिली जाणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी वर्ष 2018-19 मध्ये पिक कर्ज घेतलेले असेल पण त्याची रक्कम ही म्हणजेच पिक कर्ज रक्कम ही 50000 अपेक्षा कमी आहे. अशा शेतकऱ्यांना यांची कर्ज रकमेची मदत केली जाणार आहे.  म्हणजेच एखाद्या शेतकऱ्याची 50000 पेक्षा कर्ज रक्कम ही कमी असली तर त्यांना त्यांची कर्ज रक्कम एवढी मदत ही केली जाणार आहे.

हे पण वाचा 👉रेशन कार्ड चा ऑनलाईन १२ अंकी SRC नंबर कसा काढावा?

  तसेच ज्या शेतकऱ्यांनी नियमित पिक कर्ज रक्कम  भरली आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा 50 हजार रुपये देण्यात येणार असून अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. परंतु कोरुना स्थितीमुळे तसेच राज्य सरकारच्या आर्थिक स्थितीमुळे ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली नव्हती.  त्यामुळे आता ही रक्कम शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला असून यासाठी वीस लाख शेतकऱ्यांना या घोषणेचा फायदा होणार आहे. यासाठी राज्य सरकारने 10000 कोटी एवढ्या रकमेची तरतूद राज्य सरकारने केली आहे. 


मित्रांनो शासकीय योजना तसेच शेती विषयी ताज्या घडामोडी साठी मी आपल्याला खाली आपल्या टेलिग्राम तसेच व्हाट्सअप ग्रुप च्या लिंक दिलेल्या आहेत. त्या ठिकाणाहून आपण जाऊन जॉईन होऊन, ताज्या घडामोडी  माहिती घेऊ शकता त्यामुळे थोडा उशीर न करता लगेच व्हाट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. धन्यवाद

👉 जॉईन WhatsApp group 

                                                            👉 जॉईन Telegram Group

Leave a Comment