रब्बी ज्वारी पेरणीसाठी कोणते वाण निवडावे ? पेरणी करतांना या गोष्टी लक्षात घ्या.

 


महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी रब्बी ज्वारीचे पीक (Rabbi sorghum sowing) मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. पश्चिम महाराष्ट्रात खरीप ज्वारीची लागवड होत नाही या उलट मराठवाड्यात दोन्ही हंगामात ज्वारीचे पीक घेतलं जातं.लवकर पेरणी केल्यास खोडमाशीचा उपद्रव वाढतो तर उशिरा पेरणी केल्यास जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे बियाण्यांची उगवण क्षमता कमी होऊन ताटांची योग्य संख्या राखता येत नाही.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने रब्बी ज्वारीची पेरणी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात याविषयी दिलेली माहिती आपण पाहणार आहोत.

  • रब्बी ज्वारीची पेरणी (Rabbi sorghum sowing) मोठ्या प्रमाणात जिरायती क्षेत्रावर केली जाते. मध्यम ते भारी जमिनीत ओल जास्त काल टिकून राहत असल्याने अशा जमिनीत रब्बी ज्वारीची पेरणी करावी.
  • जिरायत क्षेत्रावर (Arable land)जास्त उत्पादन येण्यासाठी योग्य वाणांची निवड जमिनीच्या खोलीनुसार करावी.
  • 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर हा काळ रब्बी ज्वारीची कोरडवाहू क्षेत्रामध्ये पेरणी करण्यासाठी शिफारस केलेला आहे.

जमिनीच्या प्रकरणानुसार कोणते वाण योग्य ठरतं कोणतं वाण निवडावं तर ते आपण पाहूयात..

जमिनीच्या प्रकारानुसार सुधारित संकरित वाणांचा वापर करावा. हलक्या जमिनीसाठी फुले अनुराधा, फुले माऊली या वाणांची निवड करावी. 
  • मध्यम जमिनीसाठी फुले सुचित्रा, फुले माऊली, फुले चित्रा, परभणी मोती आणि मालदांडी 351 या वाणांची निवड करावी.
  • भारी जमिनीसाठी (Heavy soil) फुले वसुधा, फुले यशोदा, सीएसव्ही 22, परभणी मोती आणि सी एच 15 या संकरित वाणांची निवड करावी. 
  • बागायती जमिनीसाठी (horticultural land) फुले रेवती, फुले वसुधा, सीएसव्ही 18, सीएसएस 15 आणि 19 या वाणांची निवड करावी.
  • हुरड्यासाठी फुले उतारा, फुले मधूर, आणि लाह्यांसाठी फुले पंचमी आणि पापडांसाठी फुले रोहिणी या वाणांची निवड करावी.
  • रब्बी ज्वारीपासून अधिक धान्य कडबा मिळवण्यासाठी पेरणीपूर्वक पाच ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट दहा लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात बियाणं दहा ते बारा तास भिजून पेरावे.
पेरणी करताना 40 किलो नत्र 20 किलो  प्रति हेक्टरी देऊन पेरणी करावी पेरणीनंतर 55 दिवसांनी दोन टक्के पोटॅशियमच्या द्रावणाची फवारणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

बागायत ज्वारीचं अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी ज्वारीची पेरणी 45 बाय 22 सेंटीमीटर अंतरावर करावी जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करून हेक्टरी दहा किलो बियाणे वापरावे पेरणीसाठी दोन साड्यांची पाबर वापरून एकाच वेळी खत आणि बियाणे पेरावे.

Leave a Comment