लम्पी नुकसान भरपाई नोंदणी कशी करायची ?

www.mhpashuaarogya.org हा पोर्टल ओपन करा. वेबसाईट ओपन केल्यानंतर खालील पद्धतीचा वापरा करावा

 • मित्रांनो नुकसान भरपाईसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला तीन क्रमांकाचे अर्जदार नोंदणी नावाचे ऑप्शन दिलेले आहे या अर्जदार नोंदणी वरती आपल्याला क्लिक करायच आहे.
 • अर्जदार नोंदणी या पर्याय वर क्लिक केल्यानंतर आपल्याला काही सूचना दिसतील या सूचना आपल्याला व्यवस्थित वाचून समजून घ्यायच्या आणि त्यानंतर बंद करा त्यावर ती क्लिक कारावे.
 • बंद केल्यानंतर अर्जदार नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपला आधार क्रमांक द्यायचा आहे. त्यानंतर ज्या पर्यायासमोर लाल चिन्ह दिलेले आहे ते पर्याय आपल्याला भरणे गरजेचे आहे.
 • आधार क्रमांक टाकल्यानंतर आपले पहिले नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव, आडनाव, तसेच लिंग, मोबाईल क्रमांक, जिल्हा,तालुका आणि आपले गाव निवडायचे आहे.
 • हे वरील सर्व निवडल्यानंतर यामध्ये आपल्याला आपल्या बँक डिटेल्स द्यायचे आहेत. त्यामध्ये आपल्या ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेचे नाव खाते क्रमांक त्यानंतर आयएफएससी क्रमांक तसेच शाखा हे या ठिकाणी टाईप करायचे आहे.
 • त्यानंतर बँकेची डिटेल टाईप केल्यानंतर यामध्ये आपल्याला आपलं बँक पासबुक किंवा चेक चा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे.

लंपी रोगामुळे जनावरे मृत झाले? नुकसान भरपाई साठी असा करा ऑनलाईन अर्ज

 • बँक पासबुक किंवा चेक चा फोटो अपलोड करत असताना त्याची साईज ही पाच एमबी पर्यंत असावी म्हणजे पाच एमबी पेक्षा जास्त नसावी याची काळजी घ्यावी.
 • बॅक पासबुक किंवा चेक बुक अपलोड केल्यानंतर त्यानंतर आपल्याला अर्जदाराचा फोटो आणि अर्जदाराची स्वाक्षरी या ठिकाणी अपलोड करायची आहे.
 • फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करत असताना फोटोची साईज ही 80 केबीपर्यंत असावी तसेच स्वाक्षरीची साईज ही 40 केबीपर्यंत असावी हे लक्षात घ्यावयाचे आहे.
 • वरील सर्व माहिती तसेच बँक पासबुक अर्जदाराचा फोटो स्वाक्षरी अपलोड केल्यानंतर या ठिकाणी नियम व अटी मला मान्य आहेत या ठिकाणी बॉक्समध्ये चेकमार्क द्यायचे आहे आणि पुढे चला या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  पुढे चला या पर्यायावर ती क्लिक केल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दिसेल ही माहिती सर्व तपासून पाहिजे आहे आणि त्यानंतर जतन करा या पर्यायावर क्लिक करायचे.
 • जतन करा या पर्यावरण क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल वरती एक मेसेज येईल. त्या मध्ये एक पासवर्ड पाठवला जाईल. त्यानंतर आधार कार्ड क्रमांक आणि पासवर्ड टाकून आपण या ठिकाणी लॉगिन करू शकता.
 • आधार क्रमांक आपला युजर आयडी असेल आणि आपल्याला पाठवलेला मोबाईल वरती पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायच आहे आणि लॉगिन करायचे आहे.
 • लॉगिन गेल्यानंतर आपल्याला परत काही सूचना दाखवल्या जाईल त्या सूचना नीट व्यवस्थित वाचून घ्यायच्या आणि बंद करा या पर्यायावर ती क्लिक करायचे.
 • या मध्ये आपण नोंदणी करतानाची सर्व सर्व माहिती आपल्याला दाखवली जाईल.

आणि याच्या खाली आपल्याला महत्वाची माहिती भरायची आहे म्हणजे मृत जनावराची माहिती याच्यामध्ये जनावरांचा प्रकार काय होता आपल्याला निवडायचे त्यानंतर आजारी पडल्याची तारीख व मुर्त्यू दिनांक निवडायची, उपचार कोठे केले खाजगी की सरकारी ते निवडा, त्यानंतर लसीकरण केले होते का ते होय किंवा नाही म्हणून निवडा.

 • जनावरांचा टॅग नंबर असेल तर तो टाकायचा आहे. तसेच शेवटी मरत जनावराचा फोटो जो पंचनामा करते वेळेस जो फोटो काढला होता तो फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. म्हणजेच ज्या वेळेस डॉक्टरने पंचनामा केला होता त्यावेळेस जो फोटो घेतला असेल तो फोटो अपलोड करा जेणेकरून मदत मिळण्यास सोपे जाईल जर पंचनामा करतानाचा फोटो नसेल तर महेश जनावरांचा जो फोटो असेल तो फोटो या ठिकाणी अपलोड केले तरी चालेल.
 • यामध्ये सर्वात शेवटी वरील अटी व शर्ती मला सर्व मान्य आहेत अशा पद्धतीचे एक ऑप्शन या ठिकाणी दिली आहे तेथील बॉक्स वरती टिक करून पुढे चला या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
 • पुढे चला या पर्यावरण क्लिक केल्यानंतर आपण जी काही सर्व माहिती भरली होती ती सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला दिसेल ही माहिती आपल्याला पुन्हा एकदा तपासून घ्यायची आहे जर काही चूक असेल तर एडिट या पर्यायावर ती क्लिक करून ही माहिती पुन्हा आपण भरू शकतो जर सर्व माहिती बरोबर असेल तर जतन करा या पर्याय क्लिक करायचे आहे.
 • त्यानंतर पुन्हा काही सूचना येतील त्या सूचना वाचून घ्यायचे आहेत. सूचना मला मान्य आहे या पर्यायावर क्लिक करून आपला हा अर्ज आपण सबमिट करू शकता.
 • हा अर्ज सबमिट केल्यानंतर पुन्हा आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून या अर्जामध्ये आपण लॉगिन होऊ शकता आणि लॉगिन केल्यानंतर आपल्या या अर्जाची स्थिती या ठिकाणी आपल्याला दाखवेल.
 • मित्रांनो अर्ज करत असताना आपल्याला जर काही अडचणी येत असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा तसेच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका.