लेक लाडकी योजना: मुलगी झाली, घरी लक्ष्मी आली! मुलीच्या जन्मानंतर मिळणार 75 हजार रुपये

लेक लाडकी योजना: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यांमधील गरीब प्रवर्गातील मुलींच्या शिक्षणासाठी (Maharashtra Lek Ladki Yojana) लेक लाडकी योजना ही नवीन योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या मुलींना 75 हजार रुपये रोख रक्कम मिळणार आहे. मुलींच्या सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा अनेक पालकांना लाभ होणार आहे.

लेक लाडकी योजना

शिंदे सरकार व फडणवीस सरकार यांच्या पहिल्या अर्थसंकल्प मध्ये नऊ मार्चला लेक लाडकी योजना जाहीर करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबामध्ये जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत दिली (Lek Ladki Scheme) जाणार आहे. या मदत निधी मधून मुलींना शिक्षण सुविधा मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले एक सर्वात मोठे पाऊल मानले जात आहे.

मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये, अठरा वर्षाची मुलगी झाल्यानंतर 98 हजार रुपये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना नव्या स्वरूपामध्ये राबविण्यात येणार आहे. केसरी व पिवळ्या रेशन कार्ड धारकामधील कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, मुलगी पहिली गेल्यानंतर 4 हजार रुपये त्यानंतर मुलगी सहावीत गेल्यानंतर 8 हजार रुपये दिले जाणार आहेत. यानंतर मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर 75 हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने मुलीचे सक्षमीकरण होणार आहे.

या कुटुंबामधील मुलींना मिळणार लाभ

ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्यांना सरकारच्या वतीने 2023-24 या आर्थिक वर्षापासून या लेक लाडकी योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या संदर्भातील लवकरच एक शासन निर्णय घेऊन अधिसूचना जाहीर केल्या जातील. पिवळ्या व केशरी राशन कार्ड (Maharashtra Lek Ladki Yojana 2023 Registration) धारकांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचणे आवश्यक आहे.

येथे करा ऑनलाईन अर्ज

लेक लाडकी योजना यासंदर्भातील लवकरच एक शासन निर्णय घेऊन योजनेची सविस्तर माहिती आपण नंतर टॉपिक मध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. लेक लाडकी योजनेमुळे गरीब मुलींना खूप मोठा फायदा होणार आहे कारण की नेमकी मुलगी वयात आली की तिला घरी बसवले जाते आई वडिलांना मुलींना शिकवण्याची इच्छा असली तरीही पालक त्यांना शिकवू शकत नाहीत मात्र या योजनेमुळे प्रत्येक घरातील मुलगी साक्षर होणार.

Leave a Comment