शिंदे फडणवीस सरकारचे शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले मोठे निर्णय


शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी राज्य सरकारने मोठे गिफ्ट दिले आहे. भूविकास बँकेत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य सरकारने भूविकास बँकेची संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 964 कोटी 15 लाख रुपयांची कर्जमाफी भूविकास बँकेची केली जाणार आहे. तसेच भूविकास जी बँक आहे या बँकेची मालमत्ता हस्तांतरित केली जाणार आहे.

राजकीय सामाजिक आंदोलनातील गुन्हे आता मागे घेतले जाणार आहेत. 30 जून 2022 या रोजी पर्यंतचे जे काही गुन्हे आहेत ते सर्व गुन्हे मागे घेण्यात येणार. राज ठाकरे यांची ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय


१) राज्यात महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र नीती आयोगाच्या धरतीवर स्थापन करणार.

२) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्ष बाहेरील गट ब व गट क व गट भरतीसाठी परीक्षा टीसीएस आयबीपीएस घेणार. या अंतर्गत 75 हजार पदे भरणार.

३) ऐच्छिक वाहनांचे स्क्रॅपिंग करणाऱ्याना व्याज व दंड माफ होणार. या अंतर्गत भंगार स्थितीमध्ये असलेल्या वाहनांचा प्रश्न सुटणार.

४) फाईव्ह जी सेवा साठी पायाभूत ज्या काही सुविधा असतील त्या वेगाने वाढण्यासाठी दूरसंचार सुविधा धोरण.

५) विदर्भ मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रात अल्पसंख्यांक महिलांचे 2800 बचत गट निर्माण करणार. तसेच 1500 महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण.

6) भू विकास बँकेचे जे शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहे त्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाणार. 965 कोटी 15 लाख रुपयाची कर्जमाफी.

७) महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (Maharashtra Agri Business Network) MAGNET या संस्थेस अनुदान स्वरूपात निधी देणार. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे शक्य होईल.

८) राज्यातील राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील 30 जून 2022 पर्यंतचे सर्व खटले मागे घेण्यात येणार.

९) बुलढाणा जिल्ह्यातील अर्कचेरी आणि आलेवाडी बृहत लघु पाटबंधारे या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येणार. अंतर्गत 1918 हेक्टर जमिनीला सिंचनाचा फायदा होईल.

१०) राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनीचे भाग भांडवल 311 कोटी करणार.

११) राज्यातील आकस्मिकता निधीच्या मर्यादेमध्ये 200 कोटीची तात्पुरती स्वरूपात वाढ करण्याचा निर्णय.

१२) ऊस गाळप क्षमता प्रती दिवस १२५० मे टन वरून २५०० मे टन पर्यंत वाढवण्यासाठी शासकीय भाग भांडवल देणार.

महत्वाच्या पोस्ट

Tractor Yojana 2022- ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 अर्ज सुरु. पहा संपूर्ण माहिती

महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना या तारखे पासून येणार खात्यावर रक्कम

राज्यात नवीन सातबारा, तुमच्या जमिनीला मिळाला नवीन ULPIN आधार नंबर लगेच चेक करा

आता शेतकऱ्यांना दरमहा मिळणार 3,000 रुपये पेन्शन, कसे ते पहा

रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी, या धारकांना मिळणार नाही रेशन, रेशन कार्ड होणार रद्द

Leave a Comment