शेतकऱ्यांनाही भरावा लागणार आता इन्कम टॅक्स… ‘या’ पेक्षा जास्त उत्पन्न असणार्‍या शेतकऱ्यांची होणार आयकर विभागाकडून तपासणी.

शेतकऱ्यांनाही भरावा लागणार आता इन्कम टॅक्स… ‘या’ पेक्षा जास्त उत्पन्न असणार्‍या शेतकऱ्यांची होणार आयकर विभागाकडून तपासणी.

Agriculture Annual Income Tax – शेती करताना शेतकऱ्यांना बऱ्याच संकटांना सामोरे जावे लागते.  कधी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते.  तर कधी पिकाला भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते तसेच काही मोठाले शेतकरी पण आहेत की ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे अतिप्रमाणात मोठे आहे.  अशा श्रीमंत शेतकऱ्यांच्या आयकर विभागाकडून तपासण्या होणार आहेत. आता जास्त उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना केंद्रसरकारच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे शेतीपासून ( Agriculture) मिळणारे उत्पन्न हे दहा लाखापेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांच्या आयकर विभागाकडून तपासण्या होणार आहेत. आयकर विभागा कायद्यांतर्गत कृषी उत्पन्न करमुक्त पण करण्यात आले आहे पण ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्नही १०  लाखापेक्षा अधिक आहे अशा शेतकऱ्यांची आयकर विभाग आता माहिती घ्यायला सुरुवात करणार आहे.

  • कोणत्या शेतकऱ्यांची होणार चौकशी

 ज्या शेतकऱ्यांचे शेतीपासून मिळणारे उत्पन्न हे 10 लाखापेक्षा अधिक असेल असे शेतकरी आयकर ( Farmer Tax ) विभागाच्या जाळ्यात येणार आहेत. आता अशा शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा तपशील हा शेतकऱ्यांना आयकर विभागासमोर सादर करावा लागणार आहे. या संबंधित कृषी उत्पन्न मूल्यांकनाचा  50 वा अहवाल दिनांक मंगळवारी ५  मार्च रोजी सादर केला आहे. तरी या अहवालामध्ये याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

  • या कायद्यानुसार शेतीचे उत्पन्न करमुक्त आहे.

आपण जर पाहिले तर शेतीचे उत्पन्न हे 1961 च्या आयकर कायद्यानुसार करमुक्त आहे.  पण अनेक वेळेस मोठे शेतकरी तसेच राजकारणी आणि व्यवसायिक तसेच मोठे बांधकाम बिल्डर शेतीच्या उत्पन्नातून कमी टक्के कर  लागावा यासाठी झटपट करतात. असे लोक या कायद्यानुसार आपले शेतीचे उत्पन्न दाखवतात.  त्यांचा  आयकर विभागाला संशय आहे.  तसेच ज्या लोकांनी दहा लाखापेक्षा जास्त आपले उत्पन्न दाखवले आहे. अशा लोकांची आयकर विभागाकडून चौकशी करण्यात येणार आहे. तसेच हे उत्पन्न नक्कीच शेतीचे आहे की नाही त्यानंतर हे  या चौकशीमध्ये सिद्ध होईल.


वरील लेख आपल्या मित्रांना पाठवण्यास विसरू नका. किंवा आपल्या काही प्रश्न  असल्यास, कमेंट करून नक्की कळवा… धन्यवाद 🙏🏻

अशाच पद्धतीच्या नवनवीन पोस्ट साठी खाली दिलेल्या आमच्या राज्यस्तरीय WhatsApp  तसेच Telegram ग्रुप ला जॉईन करा..🙏👇

👉 जॉईन  WhatsApp group
👉 जॉईन  Telegram Group

Leave a Comment