पी एम किसान Ekyc मोबाईल वरुन कशी करावी ?

पी एम किसान Ekyc मोबाईल वरुन कशी करावी ?

 
पी एम किसान Ekyc आपल्या मोबाईल वरुन कशी करावी ?

जसे की मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की Pm Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना 2000 रुपये तीन हप्त्यांमध्ये असे 6000 रुपये हे प्रत्येक वर्षाला मिळत असतात. पण मित्रांनो बऱ्याच वेळेस आधार कार्ड व्हेरिफाईड नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचे काही हप्ते मिळाले नाहीत, त्यामुळे सरकारनेPm Kisan Samman Nidhi Yojana योजनेअंतर्गत केवायसी प्रक्रिया सुरू केलेली आहे. यामुळे आपण घरी बसल्या किंवा जवळच्या सीएससी सेंटर वरती जाऊन ही केवायसी प्रक्रिया आपण पूर्ण करू शकतो. पी एम किसान योजनेची ekyc ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्या आधार ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.

जर आपल्या आधार ला मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपण आपल्या जवळच्या आधार सेंटर किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आपल्या आधार ला मोबाईल नंबर हा जोडू शकतो. तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत की आपण घरी बसल्या आपल्या मोबाईल वरून pm kisan  योजनेचे केवायसी कशी करायची ते एकदम सोपी पद्धत आहे पण त्यासाठी आपल्या आधार ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक असणार आहे, जर आपल्याला मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपण आपल्या जवळील सीएससी सेंटर वरती जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतो. 

 

हेही वाचा : तुमच्या हक्काचे रेशन किती मिळते ? माहित नसेल तर तुमच्या मोबाईल वर पाहू शकता.

चला तर मित्रांनो आपण स्टेप बाय स्टेप पाहून घेऊया की Pm Kisan Ekyc ओ टी पी च्या साह्याने  कशी करायची

सर्वप्रथम आपल्याला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईट वरती यायचे त्याची लिंक खाली दिलेली आहे. pm kisan samman nidhi 👉 https://pmkisan.gov.in/

वेबसाईटवर ती आल्यानंतर खालील प्रमाणे 👇 पेज आपल्यासमोर ओपन होईल त्यामध्ये आपल्याला डाव्या बाजूला फार्मर कॉर्नर मध्ये सुरुवातीलाच Ekyc चे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे.

पी एम किसान Ekyc मोबाईल वरुन कशी करावी ?

eKYC बटन वर क्लिक केल्यावर आपल्या समोर खालीलप्रमाणे विंडो ओपेन होईल. त्या ठिकाणी आपला आधार नंबर टाका आणि Search बटन वर क्लिक करा.

पी एम किसान Ekyc मोबाईल वरुन कशी करावी ?

Search बटन वरती क्लिक केल्यावर खालील प्रमाणे पेज आपल्या समोर ओपन होईल, आधार नंबर समोर आपला आधार ला जोडलेला मोबाईल नंबर टाका आणि get mobille otp या ऑप्शन वर क्लिक करा.

 
पी एम किसान Ekyc मोबाईल वरुन कशी करावी ?

त्यानंतर आपल्या मोबाईल वर एक ४ अंकी otp येईल. खालील फोटो प्रमाणे तो ४ अंकी otp टाका आणि त्या पुढे आधार otp या ऑप्शन व क्लिक करा. आधार otp ऑप्शन वरती क्लिक केल्यावर आपल्या आधार लिंक नंबर पुन्हा एक ६ अंकी otp येईल तो otp Adhar Register Mobile Otp या ठिकाणी टाका आणि Submit For Auth. या ऑप्शन वर क्लिक करा.

पी एम किसान Ekyc मोबाईल वरुन कशी करावी ?
 

Submit For Auth. या ऑप्शन वर क्लिक केल्या नंतर EKYC Is Sucessfully Submitted. असा खालील फोटो मध्ये दिसते त्या प्रमाणे मेसेज येईल. अशा पद्धतीने आपली Pm Kisan Samman Nidhi Yojana ची eKYC यशस्वी रुपात पूर्ण झाली आहे.

पी एम किसान Ekyc मोबाईल वरुन कशी करावी ?

 

अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या PM Kisan eKYC कंप्लीट झाली आहे.

 

मित्रांनो शासकीय योजना तसेच शेती विषयी ताज्या घडामोडी साठी मी आपल्याला खाली आपल्या टेलिग्राम तसेच व्हाट्सअप ग्रुप च्या लिंक दिलेल्या आहेत त्या ठिकाणाहून आपण जाऊन जॉईन होऊन, ताज्या घडामोडी  माहिती घेऊ शकता त्यामुळे थोडा उशीर न करता लगेच व्हाट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप वर जॉईन धन्यवाद

वरील माहिती व्हिडीओ  स्वरुपात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.🙏

Leave a Comment

Close Visit Mhshetkari