‘या’ मोबाईल क्रमांक पासून रहा सावध ! नाहीतर बँक खाते होईल रिकामे… एसबीआय बँकेने दिला ग्राहकांना इशारा

By Bhimraj Pikwane

Published on:

   या मोबाईल क्रमांक पासून रहा सावध ! नाहीतर बँक खाते होईल रिकामे… एसबीआय बँकेने दिला ग्राहकांना इशारा.

आपल्या भारतामधील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया,  एसबीआय बँक आपल्या ग्राहकांना नेहमीच फसवणूक बाबत सावध  राहण्यासाठी सांगत असते. आपण पाहतच आहोत की गेल्या काही वर्षांमध्ये बँकिंग व्यवस्थेमध्ये बऱ्याच पैकी बदल झाले आहेत.  सध्याच्या डिजीटल युगात लोक बँक शाखेमध्ये जाण्याऐवजी घरी बसूनच UPI क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, डेबिट कार्ड इत्यादींचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत. 

यामुळे ऑनलाईन व्यवहाराच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गाने लोकांना त्यांच्या जाळ्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न करत असतात.  याच बाबत SBI च्या 44 कोटी ग्राहकांना सतर्क राहण्यासाठी SBI बँकेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून एक ट्विट केले आहे.

'या' मोबाईल क्रमांक पासून रहा सावध ! नाहीतर बँक खाते होईल रिकामे... एसबीआय बँकेने दिला ग्राहकांना इशारा 


 बँकेने  सायबर गुन्हेगारांचे ( Cyber Crime) 2 मोबाईल क्रमांक ट्विटमध्ये दिले आहेत. 918294710946 आणि 917365951973  या दोन मोबाईल क्रमांक पासून SBI ( STATE BAN OF INDIA ) बँकेने सावध राहण्यास ग्राहकांना सांगितले आहे.  काही दिवसापासून या दोन नंबर वरून सायबर गुन्हेगार ग्राहकांना कॉल करतात आणि लोकांना EKYC करण्यासाठी सांगतात. त्यामुळे ग्राहकांनी अशा CALL पासून सावध राहून आपली कोणत्याही प्रकारची डिटेल्स या नंबर वरून फोन आल्यास त्यांना देऊ नये.  किंवा कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या लिंक वर क्लिक करून आपली वैयक्तिक माहिती त्याठिकाणी शेअर करू नये असे बँकेने सांगितले आहे.

फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा…


  • जर तुम्हाला कोणी कॉल वर SMS द्वारे किंवा ईमेल द्वारे KYC अपडेट करण्यासाठी सांगत असेल तर अशा वेळेस या कॉल मेसेज पासून सावध राहा.

  • तसेच तुमचा पासवर्ड नेहमी बदलत राहा.

  • तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा इतर कोणत्याही बँकेसाठी संपर्क करण्यासाठी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनच तिथे दिलेल्या नंबर वरती कॉल करा.

  • तरीही फसवणूक झाली तर https://cybercrime.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपली तक्रार नोंदवा.


खालील दिलेल्या सुखा करणे टाळा..


  • तुमची वैयक्तिक माहिती तसेच तुमच्या बँक अकाउंट ची माहिती कोणालाही शेअर करू नका.

  •  आपला पासवर्ड स्ट्रॉंग ठेवा.

  •  तसेच आपल्या एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, upi  पिन चा पासवर्ड कोठेही लिहून ठेवू नका.

  • आपली पर्सनल माहिती कुठेही सोशल मीडिया वरती शेअर करू नका.

  • तसेच कोणत्याही फॉरवर्ड संशयास्पद लिंक वर क्लिक करणे टाळा.


अशाच पद्धतीच्या नवनवीन पोस्ट साठी खाली दिलेल्या आमच्या राज्यस्तरीय WhatsApp  तसेच Telegram ग्रुप ला जॉईन करा..🙏👇

👉 जॉईन  WhatsApp group

👉 जॉईन  Telegram Group

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment