राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; रब्बी हंगाम पिक विमा साठी 187 कोटी मंजूर.

 राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; रब्बी हंगाम पिक विमा साठी 187 कोटी मंजूर

राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; रब्बी हंगाम पिक विमा साठी 187 कोटी मंजूर.
187 crore approved-Rabi season crop insurance

शेतकऱ्यांसाठी सरकार नेहमी नवनवीन योजना राबवत असते. या योजनेमधून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. या योजने मधूनच एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री पिक विमा योजना Pradhan mantri crop insurance scheme. या योजनेतील लाभार्थ्यांसाठी शिंदे सरकारने एक महत्त्वाचा मोठा निर्णय घेतला आहे याबद्दल सविस्तर पाहू.

रब्बी हंगाम सन 2021-22 मधील पिकाचे नैसर्गिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी काढलेला पिक विमा शासनाने आता मंजूर केला आहे. राज्य शासनाच्या हिश्याची 187 कोटी 15 लाख 65 हजार 73 रुपये शासनाने विमा कंपन्यांना दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिक विमा (Crop Insurance) मिळणे निश्चित झाले असून शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकार व राज्य सरकार ( Goverment) यांच्या संयुक्त भागीदारीतून ही पीक विमा ( Pik Vima Rabbi 2021-22) योजना राबवली जाते. ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) अंतर्गत रब्बी हंगाम 2021-22 मधील पिकाचा विमा भरला आहे. अशा शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्याची  विमा रक्कम ही लवकरच त्यांना मिळणार आहे. रब्बी हंगामामध्ये पिकांवर गारपीट ( Hail ) तसेच पावसाचे संकट आले होते त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे रब्बी हंगामामध्ये पिकांचे भरपूर नुकसान झाले होते. त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी म्हणून पिक विमा मिळाला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. 

त्यासाठी बऱ्याच शेतकरी संघटना व राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा यासाठी आवाज उठविला होता त्यामुळे शासनाने झालेल्या नुकसानीचा ( Damage) विचार करून खरीप हंगाम  पिक विमा Kharip Pik Vima पाठोपाठ आता रब्बी हंगामातील म्हणजेच 2021-22 मधील पिक विमा देऊ केला आहे. यासाठी सरकारने राज्य शासनाच्या हिश्याची असलेली जी रक्कम आहे 187 कोटी 15 लाख रुपये ही रक्कम भारतीय कृषी विमा कंपनी, बजाज एलियन्स इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी एग्रो इन्शुरन्स कंपनी, इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कं. या कंपन्यांना ही १८७ कोटी १५ लाख ६५ हजार ७३ रुपय एवढी रक्कम वितरित करण्यात आली आहे. 

हे पण वाचा: नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीच्या पिकाचे नुकसान झाले तर असा करा भरपाईसाठी क्लेम आणि लाभ मिळवा

30 सप्टेंबर 2022 अखेर पिक विमा रकमेचे वाटप होणार असून येत्या रब्बी हंगामातील पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा मोठा आधार मिळणार आहे.

Leave a Comment