विनायक मेटे यांच्या अपघाता पूर्वीचा टोलनाक्यावरील व्हिडिओ आला समोर अनेक गोष्टींचा होणार उलगडा….!

By Bhimraj Pikwane

Published on:

 

विनायक मेटे यांच्या अपघाता पूर्वीचा टोलनाक्यावरील व्हिडिओ आला समोर अनेक गोष्टींचा होणार उलगडा....!
Vinayak Mete Accident

विनायक मेटे (Vinayak  mete) यांचे आज अपघाती निधन झाले, पुणे मुंबई एक्स्प्रेस वर (mumbai pune expressway) त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. 

आता या अपघाता अगोदरचा एक व्हिडीओ आला आहे. विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघातापूर्वीचा खालापूर टोलनाका ( Khalapur Tolnaka) येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील हा व्हिडीओ आहे. या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे, त्याचा शोध रायगड पोलीस घेत आहेत.

मुंबईला जात असताना विनायक मेटे vinayak mete accident यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वर अपघात झाला. त्यावेळी गाडीमध्ये तीन व्यक्ती होते. जखमी व्यक्तींना लगेच पनवेल मधील mgm दवाखान्यात नेण्रयात आले होते. या प्रकरणाचा तपास केला जात आहे. तपासातून सर्वबाबी समोर येईल. एक मोठा ट्रक होता, या ट्रकला पाठीमागून कार धडकली आहे, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक दुधे यांनी दिली.

या अपघातात चालक सुखरूप आहे. तर डाव्या बाजूला पुढे अंगरक्षक पोलीस तर मागे विनायक मेटे बसले होते. दरम्यान, या अपघातापूर्वीचा खालापूर टोलनाका येथील Video समोर आला आहे. आता या अपघात पाहून सर्वांच्या मनात एक शंका निर्माण होत आहे की, समोर बसलेले गाडी चालक आणि अंग रक्षक दोघेही सुख रूप आहेत आणि मागे बसलेले मेटे साहेबाना एवढी मोठी इजा कशी झाली. त्यामुळे त्यांच्या गाडी चालकाची चौकशी होणार आहे.

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघातापूर्वीचा खालापूर टोलनाका येथील Video समोर#VinayakMete #ACCIDENT pic.twitter.com/Ff8vpm8MoJ

— News18Lokmat (@News18lokmat) August 14, 2022

  

विनायक मेटे यांच्या अपघाता पूर्वीचा टोलनाक्यावरील व्हिडिओ आला समोर अनेक गोष्टींचा होणार उलगडा....!

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment