शेतकऱ्यांनो 50 हजारांच्या अनुदान यादीत तुमचं नाव आहे का? नसेल तर लवकरात लवकर करा हे काम?

शेतकऱ्यांनो 50 हजारांच्या अनुदान यादीत तुमचं नाव आहे का? नसेल तर लवकरात लवकर करा हे काम?
Karj Mafi Yojana

केंद्र सरकारकडून नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजाराचे प्रोत्साहन अनुदान Subsidy दिले जाणार आहे. कृषी कर्जातील नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजाराचे प्रोत्साहन अनुदान दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी 15 सप्टेंबर पासून वाटप होणार असे सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात ही माहिती दिली आहे.


हे वाचा: या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई जाहीर, शिंदे सरकारचा मोठा निर्णय..


नवीन याद्या बनवण्यासाठी दिले निर्देश

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना (Mahatma Jyotiba Phule Karj Mafi Yojana) 2021 या योजनेच्या अंतर्गत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार रुपयाची रक्कम दिनांक 15 सप्टेंबर 2022 पासून जमा करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये सन 2017-18 तसेच 2019-20 वर्षांमध्ये कर्जाची परतफेड करणारे सर्व शेतकरी पात्र असतील. दिनांक एक सप्टेंबर 2022 ते 5 सप्टेंबर 2022 या कालावधीत या 50 हजार अनुदानाच्या नवीन याद्या बनविण्याचे निर्देश ही देण्यात आले आहे.

लवकरात लवकर करा हे काम

ज्या शेतकऱ्यांनी बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड आपल्या बँक खात्याची लिंक केले नाही त्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी 30 ऑगस्ट 2022 पर्यंत आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यायचे आहे. या 50 हजार अनुदानासाठी शेतकऱ्यांचे आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल तर आपले नाव या लाभार्थी यादी मध्ये येईल. जर आपल्या बँकेमध्ये आपल्या बँक खात्याला आपले आधार कार्ड लिंक नसेल तर या लाभार्थी यादी मधून आपले नाव वगळण्यात येईल. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही आधार लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.


हे पण वाचा: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कृषी कर्जा बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय…


👇🏻खालील फोटोला क्लिक करून आमचा कृषी योजनांचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा आणि महत्त्वाच्या बातम्या मिळवा.👇🏻

शेतकऱ्यांनो 50 हजारांच्या अनुदान यादीत तुमचं नाव आहे का? नसेल तर लवकरात लवकर करा हे काम?



Leave a Comment