Cotton Rate 2022 : यंदा २०२२ मध्ये कसा असेल कापसाला भाव ?

Cotton Rate 2022 : यंदा २०२२ मध्ये कसा असेल कापसाला भाव ?
Cotton Market Situation

आल्या महाराष्ट्र मध्ये कापूस लागवड मोठ्या प्रमाणात होते. मागच्या वर्षी महाराष्ट्रातीलच नव्हे तर साधारण भारतात जास्त पावसामुळे कापूस पिकांचे अतोनात नुकसान झाले होते व त्यासोबतच बोंडअळीचा प्रमाण ही मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे उत्पादनात प्रचंड घट झाली होती. त्यामुळे कापसाला 10 हजाराच्या Cotton Rate पुढे इतका भाव शेतकऱ्यांना मिळाला. या मुळे या वर्षी कापसाला भाव कसा राहील व लागवड क्षेत्रा विषयी बरेच अंदाज वर्तवले जात आहेत.
इतर परदेशातील कापसाच्या बाजारपेठ चा विचार केला तर येणारा काळ कापसाच्या दराबाबत कसा असेल? याबाबत एक अंदाज आपण लाऊ शकतो.

 सध्याची कापसाची परिस्थिती : Cotton Market Rate Situation

 गेल्या  वर्षाची जी काही बाजारपेठेची परिस्थिती होती, त्यामुळे या वर्षी कापूस लागवडीत वाढ होईल असा एक अंदाज होताच व तो अंदाज खरा ठरत यावर्षी लागवड क्षेत्रात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. परंतु परदेशातील बाजाराचा विचार केला तर कापसाचे भाव सध्या कमी आहेत. या मुळे देखील सुरुवातीच्या काळात असलेली कापूस लागवडित जी काही वाढ होती ती सध्यातरी कमी झाली आहे.

 एकंदरीत पाच ऑगस्ट पर्यंतच्या एक आकडेवारीचा विचार केला तर सात टक्क्यांनी कापूस लागवड क्षेत्रात वाढ अधिक आहे. आपण मागच्या वर्षीच्या 113 लाख हे. लागवडी वरील क्षेत्राच्या तुलनेत या वर्षी 121 लाख हे. टन कापूस लागवड झाली.

 परंतु जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण  भारतात पावसाने दमदार हजेरी लावली व प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापूस पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे नंतरच्या काळात ही लागवड क्षेत्रातील जी काही वाढ आहे, येणाऱ्या काळात कमी होऊ शकते. हेच नाही तर तेलंगणा आणि हरियाणा या राज्यामध्ये कापूस उत्पादक राज्यामध्ये बोंड अळी चा पर्दुर्भाव असल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्यामुळे तेथील कापसाचे उत्पादन हे नक्कीच कमी होणार आहे.
 त्यामध्ये जर आपण परदेशातील बाजार पेठेचा विचार केला तर अमेरिका व  इतर देशांमध्ये देखील वातावरणाचा फटका कापूस पिकाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यामुळे सध्या तरी कापसाच्या दरात बाबत नक्कीच सुधारणा पाहायला मिळत आहे.

 त्यासोबतच देशातील खाजगी  बाजारपेठेत देखील कापसाचे दर Today Cotton Rate सुधारले आहेत. त्यामुळे हे सगळे परदेशी बाजाराची परिस्थिती व देशांतर्गत लागवड क्षेत्र व इतर परिस्थिती इत्यादींमुळे कापसाचे दर टिकून राहतील, हीच शक्यता आहे.

Leave a Comment