Crop Insurance: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 25 हजार बागायतदारांना मिळणार 27 कोटीचा विमा परतावा

By Bhimraj Pikwane

Published on:

Crop Insurance: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 25 हजार बागायतदारांना मिळणार 27 कोटीचा विमा परतावा
Weather Based Crop Insurance

फळ पिक विमा योजनेअंतर्गत (Fruit Crop Insurance) बागायतदार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील 26613 लाभार्थ्यांपैकी 3780 काजू आणि 22 हजार 488 पैकी आंबा बागायतदार शेतकऱ्यांना 27 कोटी 47 लाख 70 हजार 624 रुपयांचा विमा मंजूर झाल्याचे कळविण्यात येत आहे. ही रक्कम थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. तसेच अजून जास्त तापमानामुळे झालेल्या नुकसानीचा परतावा देण्यात आल्याची माहिती ही समोर आली आहे.

Crop Insurance: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 25 हजार बागायतदारांना मिळणार 27 कोटीचा विमा परतावा


सध्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांवर तसेच पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे हवामानावर आधारित फळ पिक विमा (Weather Based Crop Insurance) केंद्र सरकारने जाहीर केला आहे. त्यानुसार 26 हजार 613 जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी विमा उतरला होता. काजू आणि आंबा मिळून 14 हजार 734 हेक्टर क्षेत्रावर विमा उतरला आहे. मागच्या वर्षी काजू आणि आंबा हंगामाच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बहर आला होता. परंतु हवामान बदलल्यामुळे त्यांना फळ आले नाहीत. त्यात अजून जास्त पाऊस तसेच उच्च तापमान यामुळे फळगळही झाली होती. तसेच डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात अवकाळी चा फटका ही बसला होता. पुढे फेब्रुवारी मार्चमध्ये पुन्हा जास्त तापमानामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

हे सुद्धा वाचा 👉 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कृषी कर्जा बाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय…  

Crop Insurance: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 25 हजार बागायतदारांना मिळणार 27 कोटीचा विमा परतावा

या कारणामुळे जाहीर करण्यात आलेला आहे पिक विमा:

सुरुवातीला उत्पादन कमी असल्या कारणाने  बाजारात दर देखील जास्त होता. पुढे एप्रिलमध्ये अखेरीस दर कोसळला. त्याचा पण फटका बागायतदार शेतकर्यांना बसला. उत्पादन कमी राहिल्यामुळे अपेक्षित नफा-तोट्याचा ताळेबंद राखण्याचे बागायतदारांपुढे मागील हंगामात आव्हानच राहिले होते. तीन ते चार वाढीव फवारण्यांच्या खर्चाची भर पडल्याने बागायतदारांचे आर्थिक गणित कोलमडले. नुकतेच विमा मिळण्या संबंधित कंपनीकडून जाहीर करण्यात आला आहे. विमा भरलेल्या एकूण बागायतदार शेतकर्यान पैकी २२ हजार ४८८ शेतकर्यांना  विमा परतावा मिळणार आहे. त्यात ३ हजार ७८० काजू बागायतदारांसाठी ९ कोटी ४५ लाख १८ हजार ५७६, तर २२ हजार ४८८ आंबा बागायदारांसाठी १८ कोटी २५ लाख २ हजार ४८ रुपयांचा परतावा मिळणार आहे. विमा कंपनीकडून बागायतदारांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे; मात्र जिल्ह्यातील महसूल मंडळातील किती शेतकरी पात्र ठरले, किती परतावा प्राप्त झाला याची माहिती कंपनीकडून दिलेली नाही.


पण तरीही बागायतदार शेतकर्यांनमध्ये नाराजी 

काजू उत्पादकांना विमा परतावा हा पूर्ण हंगामाचा जाहीर करण्यात आला आहे. परंतु आंबा उत्पादकांसाठी अवेळी पाऊस आणि कमी तापमान यामुळे झालेल्या नुकसानीबाबत परतावा दिला आहे. अजूनही जास्त तापमानामुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी ही जाहीर झालेली नाही त्यामुळे बागायतदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आह.

जिल्ह्यातील लाभार्थी संख्या – २६ हजार ६१३

पहिल्या टप्प्यात विमा परतावा मंजूर झालेल्यांची संख्या – २२ हजार ४८८

मंजूर झालेली विमा परतावा रक्कम – २७ कोटी ४७ लाख ७० हजार ६२४ रुपये

३ हजार ७८० काजू बागायतदारांसाठी – ९ कोटी ४५ लाख १८ हजार ५७६ रुपये

२२ हजार ४८८ आंबा बागायदारांसाठी – १८ कोटी २५ लाख २ हजार ४८ रुपये

विमा कालावधी संपल्यानंतर कंपनीकडून ४५ दिवसांत शेतकऱ्यांना विमा परतावा रक्कम प्राप्त होणे आवश्यक आहे परंतु विमा कंपनीकडून वेळेत परतावा दिला जात नाही. सध्या मिळालेली रक्कम ही यंदाच्या हंगामात झालेल्या नुकसानीच्या तुलनेत फारच कमी आहे.

Crop Insurance: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 25 हजार बागायतदारांना मिळणार 27 कोटीचा विमा परतावा


Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment