शिंदे सरकार प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’ आणणार..

शिंदे सरकार प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्यात 'मुख्यमंत्री किसान योजना' आणणार..
मुख्यमंत्री किसान योजना 


PM Kisan- शिंदे-फडणवीस सरकार ने राज्यात महत्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi yojana) आधारावर आता राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना’ (Mukhyamantri Kisan Yojana) चालू करण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतला आहे.

या योजने मधून शेतकऱ्यांना दर वर्षी ६ हजार रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे. कृषी विभागासोबतच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात याबाबत तरतूद केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.


मुख्यमंत्री किसान योजने मधून प्रत्येक सली पात्र शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. सध्या देशपातळीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi Yojana) राबवण्यात येत आहे. त्याच आधारावर आता राज्यात देखील मुख्यमंत्री किसान सम्मान निधी योजना ( Mukhyamatri Kisan Sanman Nidhi Yojana) राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्यात टप्प्या टप्प्यानं शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे. दर वर्षी पात्र  असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.


हे पण वाचा- फळ पिक विमा 2021-22 निधी वितरित, लवकरच होणार वाटप

कृषी विभागाच्या बैठकीत या योजनेचा निर्णय झालेला असला तरी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री किसान योजनासाठी नेमकी किती रुपयांची तरतूद केली जाणार आहे याची माहिती आतापर्यंत समोर आलेली नाही. पण शिंदे सरकार लवकरच याबाबत घोषणा करण्याचा अंदाज आहे. तसेच या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असतील याचेही निकषही आता पर्यंत समोर आलेले नाहीत. परंतु, मागील चार दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या बैठकीत या योजने बद्दल चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.


👇 हे पण वाचा 👇


Leave a Comment