Cotton News: कपाशी पिकातील पातेगळ कशी रोखाल?

Cotton News: कपाशी पिकातील पातेगळ कशी रोखाल?
कपाशी पिकातील पातेगळ कशी रोखाल?


कपाशीचे पिक सध्या पातळ आणि फुल लागण्याच्या अवस्थेत आहे. जून मध्ये लवकर लागवड केलेल्या कपाशीमध्ये बोंड पक्क होत आहेत. सध्या वातावरणामध्ये मोठे बदल दिसून येत आहेत. कधी पावसाचे उघडे आणि हवामान आणि तापमानात वाढ होत आहे. तर कधी सलग पाच ते सहा दिवस पावसाचं वातावरण होत आहे. अशा हवामान बदलामुळे कपाशी पातेगळ होण्याची शक्यता अधिक असते.

कपाशीतील पातेगळ रोखण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील तज्ञांनी पुढील सल्ला दिलाय.


काय सल्ला दिलाय हेच आपण या पोस्ट मधून पहाणार आहोत.

तर कपाशीतील नैसर्गिक पातेगळ रोखण्यासाठी न्याथेलीन असेटीक एसिड एन ए ए दोन पूर्णांक पाच मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पिकामध्ये दोन महिन्यानंतर नत्रयुक्त खताची मात्रा देण्यासाठी बागायतीसाठी 52 किलो आणि कोरडवाहू साठी 31 किलो युरिया प्रति एकर द्यावा. अधिक उत्पादनासाठी कापूस पिकामध्ये दोन टक्के DAP 200 ग्रॅम अधिक ५० ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेट दोन प्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे. 
लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कपाशीच्या शेतामध्ये 20 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसाच्या अंतराने दोन वेळा फुले लागण्याच्या आणि बोंडे भरण्याच्या अवस्थेत फवारावे. फवारणी करिता दूषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापराव आणि पाण्याचे प्रमाण शिफारशीतच वापरावे, कमी पाणी वापरल्यास कीड आणि रोगांचे अपेक्षित व्यवस्थापन होत नाही. 


 

सर्व अपडेट लवकर मिळवण्यासाठी आम्हाला गूगल न्यूज (Google News) ला स्टार ⭐ बटणावर क्लिक करून फॉलो करा. 🙏😊

👇👇👇👇👇

https://news.google.com/publications/CAAqBwgKMLC6tAswvdXLAw?ceid=IN:en&oc=3

 

Cotton News: कपाशी पिकातील पातेगळ कशी रोखाल?

Cotton News: कपाशी पिकातील पातेगळ कशी रोखाल?

 

Leave a Comment