Pm Kisan – पीएम किसान ई-केवायसी’ साठी पुन्हा मुदतवाढ..

   

Pm Kisan - पीएम किसान ई-केवायसी’ साठी पुन्हा मुदतवाढ..
Pm Kisan E-kyc Last Date


पीएम किसान ( Pm Kisan) योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ( Pradhan mantri Kisan Sanman Nidhi Yojana) शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची ठीक मदत केली जाते. योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना 11 हप्ते वर्ग करण्यात आलेले आहेत.  लवकरच 12 हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे.

या योजनेमध्ये अनेक अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर केंद्र सरकारने या योजनेसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे.


  • पी एम किसान ई-केवायसी साठी पुन्हा मुदतवाढ.. ( Pm Kisan E kyc Last Date)



प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना 31 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र तरी पण अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी अजूनही ई-केवायसी E-Kyc प्रक्रिया पूर्ण केली नाही. इ केवायसी करण्यासाठी अनेक शेतकरी गंभीर नसून, तसेच बरेच शेतकऱ्यांना ई-केवायसी करणयासाठी बऱ्याच काही तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा चौथ्यांदा ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना 30 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ Pm Kisan E kyc Last Date देण्यात आली आहे. 


कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत ( Pradhan mantri Kisan Sanman Nidhi Yojana विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह विविध राज्याचे कृषिमंत्री या बैठकीला उपस्थित होते. आणि याच बैठकीमध्ये कृषिमंत्री सत्तार यांनी या ई – केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. 

कृषिमंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar) असे म्हणाले की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी शेतकऱ्यांचा डाटा बेस काम प्रगतीपथावर असून, या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 11 लाख 39 हजार नवीन लाभार्थ्यांचा डाटाबेस अपलोड केला आहे. परंतु पात्र शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने ई-केवायसी ekyc करण्यासाठी सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ द्यावी.


कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची मागणी मान्य करताना, केंद्रीय मंत्री तोमर म्हणाले की पीएम किसान योजनेचा जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना लाभ व्हावा, यासाठी ही मुदतवाढ करण्यात येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांचा या योजनेमध्ये समावेश करून 30 सप्टेंबर 2022 (Pm Kisan Ekyc Last Date )पर्यंत इ-केवायसी लाभार्थ्यांनी पूर्ण करावी.


हे पण वाचा: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या झाली कमी, नवीन यादीत तुमचं नाव आहे की नाही असं करा चेक..!

Pm Kisan - पीएम किसान ई-केवायसी’ साठी पुन्हा मुदतवाढ..


Leave a Comment

Close Visit Mhshetkari