Salam Kisan App: सलाम किसान ॲप आहे तरी काय? जाणून घ्या सलाम किसान ॲप बद्दल.

Salam Kisan App: सलाम किसान ॲप आहे तरी काय? जाणून घ्या सलाम किसान ॲप बद्दल.
Salam Kisan App


नमस्कार शेतकरी बंधूंनो आज जाणून घेऊया सलाम किसान ॲप बद्दल.


अगोदर जाणून घेऊया सलाम किसान ॲप आहे काय?

सलाम किसान हे एक एप्लीकेशन (Salam Kisan App ) आहे ज्याद्वारे सलाम किसान ॲप सांगेल की शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये येणाऱ्या निरनिराळ्या अडचणींवर कशी मात केली पाहिजे. तसंच शेतीला लागणारा खर्च कमी करून जास्त उत्पन्न कसे मिळवलं पाहिजे ज्यामुळे शेतकरी वर्गाची भरभराट होईल.


सलाम किसान ॲप शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या सेवा देते हे पाहुयात.


हवामान अंदाज : दररोज बदलणारा हवामान अंदाजाबाबत यामध्ये माहिती मिळेल.


पीक दिनदर्शिका: शेतीतील पिकांबद्दल त्याच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण माहिती मिळेल.


माती परीक्षण: 90 सेकंदामध्ये आणि अत्यंत कमी खर्चात तसंच तुमच्या शेतामध्ये करता येणार मातीचे परीक्षण.


ड्रोन सुविधा: प्रती एकरी सहा ते सात मिनिटांमध्ये शेतात ड्रोन द्वारे फवारणी.


कीड आणि रोग शोधणे: कीड आणि रोग शोधून त्यावर नियंत्रण करता येईल.


कृषी तज्ञांचा सल्ला: सलाम किसानचे कृषी तज्ञ देणार शेती बद्दल वेळोवेळी सल्ला.

बाजार भाव: दररोज बदलणाऱ्या बाजारभावाबद्दल माहिती मिळेल बाजार उपलब्धता शेतकऱ्याला बाजारपेठे बद्दल माहिती मिळेल.


वाहतूक सुविधा: शेतीतील माल शेतापासून तर बाजारापर्यंत कमीत कमी वाहतूक खर्चात नेणे होईल शक्य.


कृषी बातमी: आता दररोज कृषी क्षेत्रातील बातम्या बद्दल माहिती मिळेल.


सलाम किसान शॉप: शेतीसाठी लागणारी सर्व उत्पादने एकाच जागेवर मिळेल.


मिळेल वित्त मार्गदर्शन: वित्त आधार मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत करेल. सलाम किसानच्या या सर्व सेवांचा लाभ तुम्ही घेऊ शकता.


हे पण वाचा: तुमच्या हक्काचे रेशन किती मिळते ? माहित नसेल तर तुमच्या मोबाईल वर पाहू शकता.


सलाम किसान च व्हिजन?

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास आणि सक्षमीकरण.


सलाम किसानचे मिशन

शेतीचे व्यवस्थापन शेतीसाठी उपलब्ध अर्थसाहयाचे मार्ग थेट बाजारपेठेची जोडणी आणि शासकीय यंत्रणेचे साहाय्य मिळवून देण्यासाठी भागधारकांना एकत्र आणण्याच्या एक आदर्श कृती आराखड्यावर सलाम किसान व्हिजन झपाटून काम करत आहे.


सलाम किसान ध्येय

संपूर्ण दृष्टिकोन 

शेतकऱ्यांचा विकास 

तंत्रज्ञान आधारित उपाय 

शाश्वत शेतीला प्राधान्य

कमी खर्चात जास्त उत्पादन सलाम किसान अस्तित्व महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यात दोन लाख शेतकरी 

300 हून अधिक डीलर.

180 हून अधिक प्रोडक.

आत्ताच रेफर करा आणि मिळवा आकर्षक उपहार आत्ताच डाऊनलोड करून सलाम किसान ॲप चा आनंद घ्या. ( Salam Kisan App Download)


हे पण वाचा: एक शेतकरी एक डीपी योजना सुरू, आता शेतकर्यांना मिळणार स्वतःची डीपी.


सलाम किसान ॲप मध्ये नोंदणी कशी करावी व ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील व्हिडिओ पहा 



Leave a Comment

Close Visit Mhshetkari