मोठी बातमी: थेट सरपंचपदांसह 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान.

By Bhimraj Pikwane

Published on:

मोठी बातमी: थेट सरपंचपदांसह 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान.
Grampanchayat Election 2022


मुंबई, दि. 9: राज्यातील विविध जिल्ह्यां मधील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून म्हणजेच 09 नोव्हेंबर २०२२ आचारसंहिता लागू झाली आहे. तसेच 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे. अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज दिनांक 09 नोव्हेंबर रोजी केली. (Gram Panchayat Election 2022) 

मोठी बातमी: थेट सरपंचपदांसह 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान.

श्री. मदान यांनी पुढे असे सांगितले की, ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या काळात मुदत संपणाऱ्या; तसेच नवीन स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. (Gram Panchayat Election 2022) नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या काळात दाखल करण्यात येणार आहेत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची शेवट दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. 

नक्षली भागात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ राहील. व मतमोजणी हि 20 डिसेंबर 2022 रोजी होईल. ( Grampanchayat Result 2022) 


विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या: 

अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, चंद्रपूर- 59, भंडारा- 363, बुलडाणा- 279, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, सातारा- 319, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, नंदुरबार- 123, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, वर्धा- 113, सांगली- 452, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751. 


अधिक माहितीसाठी खालील परिपत्रक डाउनलोड करा 

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक –

माहे ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालाविीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित  ग्रामपंचायती तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवनुकांमधील वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या ( सदस्य पदासह थेट सरपांच पदाच्या ) सार्वत्रिक निवडणुकांसाठी सांगणकप्रणालीव्दारे राबवण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम..सविस्तर माहितीसाठी  येथे क्लिक करा

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment