विदर्भ मराठवाड्यातील या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी? नवीन शासन निर्णय जाहीर

By Bhimraj Pikwane

Updated on:

विदर्भ मराठवाड्यातील या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी? नवीन शासन निर्णय जाहीर
https://mhshetkari.in/index.php/2022/11/20/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ad-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%af%e0%a4%be/


विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या कर्जमाफीच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज 18 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आलेला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून खाजगी परवानाधारक सावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या कर्जमाफीसाठी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. (karj mafi yojana)

 मित्रांनो 10 एप्रिल 2015 च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाच्या माध्यमातून विदर्भ मराठवाड्यामधील आत्महत्याग्रस्त असलेल्या १४ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे खाजगी परवानाधारक सावकाराकडून घेतलेली कर्ज माफ करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. मात्रे मंजुरी देत असताना ज्या सावकाराने कार्यक्षेत्र बाहेरील शेतकऱ्यांना आपली कर्ज दिलेली आहेत अशा शेतकऱ्यांना अशा सावकारांना याच्यामधून बाद करण्यात आलेलं होतं. मात्र याच्यासाठी 13 सप्टेंबर 2019 रोजी एक शासन निर्णय घेऊन या शेतकऱ्यांचा देखील याच्यामध्ये पात्रतेमध्ये समावेश करण्यात आलेला होता. 


हे पण वाचा: Crop Insurance: शेतकरी बांधवानो खरीप हंगाम २०२२ पिक विमा लवकरच मिळणार.


याच्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली होती या जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून विदर्भ मराठवाड्यामधील 14 जिल्ह्यातील 3759 शेतकऱ्यांना पात्र करण्यात आले होते आणि ज्याच्यासाठी 9 कोटी 4 लाख रुपये एवढे निधीची तरतूद देखील करण्यात आलेली होती. 2020-21 मध्ये 3.75 कोटी आणि चालू आर्थिक वर्षात 2022-23 मध्ये 1 कोटी असा 4.75 कोटी रुपये निधी आपण स्वीकारित करण्यात आले होते. याच निधी पैकी उर्वरित असलेला 4 कोटी 28 लाख 59 हजार रुपये एवढा निधी 18 नोव्हेंबर 2022 रोजी शासन निर्णयाच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांनी कार्यक्षेत्र बाहेर परवाना दरात सावकाराकडून घेतलेली कर्ज आता माफ होणार आहेत. कर्जमाफी (karj mafi yadi) या निधीच्या माध्यमातून केले जाणार आहे. याच्यासाठी 10 एप्रिल 2015 याच प्रमाणे 13 सप्टेंबर 2019 रोजी च्या शासन निर्णयानुसार अटी शर्तीची पूर्तता करून या निधीचे वितरण केल जाणार आहे.

अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण असा शासन निर्णयामुळे या सावकाराकडील कर्जमाफीच्या प्रतीक्षा असणाऱ्या या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण https://gr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळा वरती पाहू शकता किंवा याची लिंक आपल्याला खाली सुद्धा मिळेल.  

धन्यवाद…!

डाउनलोड शासन निर्णय

 

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment