CIBIL Agri Loan: पीक कर्ज काढण्यासाठी आता सिबील स्कोर महत्वाचा नाही.

 

CIBIL Agri Loan: पीक कर्ज काढण्यासाठी आता सिबील स्कोर महत्वाचा नाही.
Cibil Score

शेती विषयक कर्जांना सिबिल मधून वगळण्याच्या मागणीबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने रिझर्व बँकेला (Reserve Bank of India) सूचना दिल्या आहेत. याबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्याचे स्पष्टीकरण संबंधित तक्रारदार शेतकऱ्याला पाठवा असं अर्थ मंत्रालयाने सांगितले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन काही दिवसांपूर्वी राज्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या तेव्हा रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी सिबिल बाबत लेखी मुद्दे उपस्थित केले.

Cibil Score अर्थातच Credit Information Bureau (India) Limited च्या नियमांमुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी त्रास होत असल्याचं शिंदे यांचे म्हणणं होते, शेती कर्जासाठी शेतकऱ्यांचा सिबिल स्कोर  (Cibil Score) लक्षात घेतला जातो. 


सिबिल स्कोर म्हणजे काय?


एखाद्या शेतकऱ्याला बँकेकडून कर्ज घ्यायचं असतं तेव्हा बँक शेतकऱ्याचा सिबिल स्कोर (Cibil Score) तपासत म्हणजे शेतकऱ्यांनी यापूर्वी कुठल्याही बँकेकडून घेतलेलं कर्ज वेळेत परत केला आहे की नाही यावर शेतकऱ्याचा सिबिल स्कोर अवलंबून असतो. शेतकऱ्यांनी वेळेत कर्ज परतफेड केली त्याचा सिबील चांगला येतो, तर ज्यांना वेळेत कर्जफेड करता आलेली नाही त्यांचा सिबिल स्कोर खराब येतो. सिबिल खराब असेल तर बँक कर्ज देण्यास टाळा करते. 


त्यामुळे बहुतांश शेतकरी कर्जापासून वंचित राहतात शेतकरी कर्ज काढतात पण शेतमालाचे उत्पादन होताच तात्काळ सर्व रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. शेतमालाचे पैसे 1 ते 18 महिन्यांपर्यंत उशिरा मिळतात परंतु इकडे कर्ज थकल म्हणून सिबिल स्कोर घटवला जातो. त्यामुळे शेतकरी अकारण अडचणी येतात. असे रयतचे म्हणे आहे.


केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी शैलेंद्र कुमार यांनी या मुद्द्यांबाबत रिझर्व बँकेच्या पर्यवेक्षण विभागाच्या मुख्य महाव्यवस्थापनांकडे मुद्दे पाठवलेत. हे मुद्दे तपासून संबंधित शेतकऱ्यांना सविस्तर उत्तर पाठवा अश्या सूचना शैलेंद्र कुमार यांनी केलेल्या आहेत. शेतीमालाचे बाजारभाव पडतात त्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा भरून निघत नाही. तसंच ओला किंवा कोरडा दुष्काळ वादळ गारपीट यामुळेही शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे खाजगी किंवा सहकारी बँकांची कर्जफेड वेळेत होत नाही मात्र सिबील अहवालातील आकडे घसरल्याने इतर बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज दिल जात नाही अशी तक्रार रयत ने केली आहे.

शेतकऱ्याच्या मूळ समस्यांचा विचार न करता सिबील प्रक्रिया राबिवली जाते. त्यामुळे शेती कर्ज शेती उद्योग, कर्ज, शेती अवजारे, शेती यंत्र, शेत घर, विहीर सिंचन अशा सर्व शेती कर्जांना सीबीलची अट लावू नये फक्त थकबाकीदार आहे की नाही याची तपासणी करत कर्ज मंजूर करावं. यामुळे अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी आमची मूळ मागणी होती. credit score check free 

आता याबाबत आणि सर्व बँक काय भूमिका घेते याकडे रयतच्या कार्यकर्त्यांचे लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं.

याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

check cibil score free

सिबिल स्कोर (Cibil Score) तपासण्यासाठी येथे क्लिक करा.

 ताजा अपडेट साठी आमचा व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment

Close Visit Mhshetkari