Crop Insurance: शेतकरी बांधवानो खरीप हंगाम २०२२ पिक विमा लवकरच मिळणार.

Crop Insurance: शेतकरी बांधवानो खरीप हंगाम २०२२ पिक विमा लवकरच मिळणार.
Crop Insurance

खरीप हंगाममध्ये शेतकरी बांधवांचे शेतातील पिकांचं अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. प्रधानमंत्री फसल बीमा योजना (Pradhanmantri Fasal Bima Yojna)अंतर्गत अनेक शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतातील पिकांचा पीक विमा (Crop Insurance) काढलेला होता. पिक विमा काढल्यामुळे पिकांचा नुकसान झाल्यास पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई देण्यात येते. अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे शेतातील पिकांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते अनेक शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांची दावा ( Crop Insurance Claim) देखील पिक विमा कंपनीस केलेले आहेत. राज्यात पिक विमा प्रश्न प्रलंबित आहे. अद्यापही काही ठिकाणी पिक विमा नुकसान भरपाई (Crop Insurance compensation) शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली नाही. शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या प्रलंबित प्रस्तावावर पाच दिवसात कार्यवाही करून येत्या आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना बँक खात्यावर पिक विम्याची रक्कम जमा करावी अशा सूचना राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित यांना दिलेले आहे.

जाणून घेऊयात या संदर्भातील सविस्तर माहिती


राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या विमाच्या प्रलंबित प्रस्तावावर पाच दिवसात कारवाई करून येत्या आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विमा रक्कम (PMFBY) जमा करावी अशा सूचना राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्तांच्या आयोजित केलेल्या मीटिंगमध्ये या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. (crop insurance scheme)

शेतकऱ्यांना आठ दिवसाच्या आत पीक विम्याचे रक्कम त्यांच्या बँक खात्यावरती जमा करावी अशा सूचना दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. म्हणजेच येणाऱ्या तीन ते चार दिवसांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची (pmfby) रक्कम जमा होईल अशी आपण या ठिकाणी अपेक्षा करू शकतो.

त्या दिवशीची मिटींग झाली होती त्यामध्ये इतरही काही सूचना देण्यात आल्या होत्या शेतकऱ्यांचे विम्याच्या प्रश्नावर शासनाकडून सातत्याने आढावा घेतला जात आहे. विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही तर चालडाल करणाऱ्या विमा कंपन्यांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल अशा देखील सूचना त्या दिवशी झालेल्या मीटिंगमध्ये सत्तार साहेबांनी दिलेले आहेत. स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत एकूण प्राप्त सूचना 51 लाख 31 हजार पैकी झालेले सर्वेक्षण 46 लाख 9 हजार व अद्यापही प्रलंबित असलेले सर्वेक्षण 5 लाख 21 हजार तातडीने पूर्ण करावे. नैसर्गिक आपत्तीत निश्चित झालेल्या 1073 कोटी रुपये नुकसान भरपाई पैकी केवळ 96.53 कोटी एवढे रक्कम 3 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे.


अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली व परभणी या तीन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झालेल्या या जिल्ह्यातील 5 लाख शेतकऱ्यांची सर्वेक्षण झाले असून उर्वरित 21 हजार शेतकऱ्यांचे सर्वेक्षण (crop insurance claim process) बाकी आहे. बाकी असलेले सर्वेक्षण संबंधित यंत्रणे पूर्ण करण्याचा सूचना देखील या बैठकीमध्ये देण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी ऑफलाइन अर्ज करण्यात आलेले आहेत यापुढे प्रत्येक तालुक्यात एक व्यक्ती नेऊन ऑफलाइन अर्ज देखील ऑनलाइन करून घेण्याच्या सूचना कृषीमंत्र्यांनी संबंधित यांना दिलेल्या आहेत.

 खरीप हंगाम 2022 (pmfby 2022) मध्ये अतिवृष्टीमुळेच नाही तर सतत सुरू असलेल्या पावसामुळे देखील शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाच्या पंचनामाप्रमाणे विमा कंपन्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार नुकसान भरपाई द्यावी असा आदेश कृषिमंत्री यांनी दिलेला होता. संबंधित अधिकाऱ्याने देखील विमा कंपन्याकडे पाठपुरावा करून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी अशा सुचना देण्यात आल्या होत्या.

या मुळे लवकरात लवकर पिक विमा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे जेणेकरून लवकरात लवकर ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.


अधिक माहिती साठी येथे क्लिक करा 


Leave a Comment