E.W.S.(ई.डब्ल्यू.एस.) आरक्षणाचा फायदा कोणाला मिळणार; प्रमाणपत्र कसे काढाल?; जाणून घ्या सर्व माहिती.

E.W.S.(ई.डब्ल्यू.एस.) आरक्षणाचा फायदा कोणाला मिळणार; प्रमाणपत्र कसे काढाल?; जाणून घ्या सर्व माहिती.
How-to-get ews certificate

नवी दिल्लीः आर्थिक दुर्बल घटकांना नोकरी आणि महाविद्यालयातील प्रवेशांसाठी देण्यात आलेल्या १०% आरक्षणाच्या वैधतेवर मे.सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. 

१०३ व्या घटनेतील दुरुस्तीच्या माध्यमातून करण्यात आलेली आरक्षणाची तरतूद वैध असल्याचा निकाल मे. सर्वोच्च न्यायालयाने (HIGH CORT) दिला आहे.

सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील घटनेपीठाने हा निकाल दिला असून 5 न्यायमूर्तींचा यात भाग होता. केंद्र सरकारने 103 वी घटनादुरुस्ती करुन सवर्ण प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास (EWS) घटकांना आरक्षणाची तरतूद या अगोदर केली होती. 

मे.सुप्रीम कोर्टाच्या (High Cort) या निकालामुळं देशभरात आर्थिक आरक्षण लागू करण्याचा मार्ग आता  खुला झाला आहे.


आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना समाजात सन्मानाने वावरता यावे तसेच त्यांना शिक्षण आणि नोकरीची संधी मिळावी, यासाठी या घटकाला १०% आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने आरक्षणाची तरतूद या अगोदर करण्यात आली होती.

 2016 साली मोदी सरकारने (Modi Sarkar) विधेयक मंजुर केले होते. मात्र, मे.सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. 

केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधामध्ये जवळ- जवळ ४० याचिका दाखल केल्या होत्या.


 • मे. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; 
 • १०% आर्थिक आरक्षणावर शिक्का मोर्तब
 • E.W.S. म्हणजे काय?

 Economically Weaker Sections अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWSज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे, अशा वेक्तीला E.W.S. मधून शिक्षण आणि नोकरीत आरक्षण दिले जाते.

 हे आरक्षण S.C., ST., NT यांच्यासाठी नाही. म्हणजेच फक्त ओपन प्रवर्गासाठी आहे.


✅ E.W.S.चा फायदा कोणाला मिळणार?


खुल्या प्रवर्गातील कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. एस.सी.(S.C.), एस.टी.(S.T.), ओ.बी.सी.(O.B.C.) आरक्षणातील लोकांना या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.

 • कुटुंबाचे उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असलेल्या नागरिकांना नोकरीमध्ये  व शिक्षणामध्ये आरक्षण मिळू शकते.
 • आरक्षणासाठी पात्र नागरिकांच्या कुटुंबाची शेती 5 एकरापेक्षा जास्त नसावी.
 • 1 हजार चौ. फूट किंवा त्यापेक्षा जास्त मोठं राहते घराचे क्षेत्र नसावं.
 • महानगरपालिका क्षेत्रातील कुटुंबांचं घराचं क्षेत्र 800 चौरस फुटापेक्षा जास्त नसावं.
 • गैर नगरपालिका किंवा ग्रामीण भागातील कुटुंबाकरिता 1800 चौ. फूट जागेची अट आहे.


✅ E.W.S. प्रमाणपत्र कसं काढाल?


E.W.S. (ई.डब्ल्यू.एस.) प्रमाणपत्र मिळवण्यापूर्वी, तुम्हाला E.W.S. (ई.डब्ल्यू.एस.) चा अर्ज डाउनलोड करावा लागेल. अर्ज भरल्यानंतर, अर्जमध्ये विचारलेल्या कागदपत्रांसोबत ते तहसील कार्यालयात जमा करायचे आहेत. तहसील मधून पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला E.W.S. प्रमाणपत्र मिळेल.


आवश्यक कागदपत्र ?

 • लाभार्थी व त्यांच्या वडिलांचे आधार कार्ड झेरॉक्स.
 • लाभार्थी व त्यांच्या वडिलांची किंवा चुलत्याचे (T.C.) / निर्गम उतारा झेरॉक्स.
 • राशन कार्ड (Ration Card)झेरॉक्स.
 • रहिवाशी प्रमाणपत्र ( Domacile Certificate).
 • उत्पन्नाचा दाखला (Income Certificate).
 • (७/12 उतारा , 8अ उतारा/ फॉर्म 16 / आयकर भरल्याचा पुरावा).
 • अर्जदार किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य 13 ऑक्टो. 1667 रोजी किंवा त्या आधीचे महाराष्ट्राचे रहिवाशी असल्या बाबतचा पुरावा.
 • स्वघोषणा पत्र.
 • विहित नमुन्यातील अर्ज.
 • ३ पासपोर्ट फोटो.


हे पण वाचा: Tractor Yojana 2022- ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 अर्ज सुरु. पहा संपूर्ण माहिती.


E.W..S प्रमाणपत्र किती वर्षांसाठी वैध


E.W.S. (ई.डब्ल्यू.एस.) प्रमाणपत्राची वैधता फक्त 1 वर्षांची असेल.

Leave a Comment