Glyphosate Pesticide : ग्लायफोसेट तणनाशकावर निर्बंध, आता शेतकऱ्यांना ग्लायफोसेट फवारता येणार नाही.

Glyphosate Pesticide Tannashak: अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी नापीके मुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी मजुरांचे वाढते भाव शेतमालाला ना मिळणारा भाव या सर्व विषयावरती चिंता दूर असलेल्या शेतकऱ्यांसाठी आणखीन एक चिंतेचा विषय बनलेला आहे. तो म्हणजे महत्त्वाचं अस तणनाशक ग्लायफोसेट (herbicide glyphosate) केंद्र शासनाच्या माध्यमातून वापरावरती निर्बंध (Glyphosate Banned) घालण्यात आलेले आहेत.
चार-पाच वर्षापासून अतिवृष्टीमुळे शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात परेशान झालाय शेती पिकांचं शेतीचं नुकसान होते. मजूर मिळत नाहीत मजूर मिळाले तर मजुरीचे प्रमाण वाढले, आणि या सर्वांच्या पार्श्वभूमी शेतकऱ्याला सध्या आपली शेती तयार करण्यासाठी तिला पुन्हा एका नव्या हंगामासाठी तयार करण्यासाठी कुठेतरी तण नाशकाचा आधार घ्यावा लागतो आणि याच्यामध्ये महत्त्वाचं वापरलं जाणार तणनाशक म्हणजे ग्लायफोसेट (herbicide glyphosate) या वर निर्बंध घालण्यात आलेले आहे. तर केंद्र शासनाच्या माध्यमातून 25 ऑक्टोबर 2022 रोजी एक अधिसूचना काढून याला निर्बंध घालण्यात आलेले आहेत.

जुलै 2020 मध्ये केरळ सरकारच्या माध्यमातून एक त्या ठिकाणी मागणी करण्यात आलेले ते प्रस्ताव देण्यात आलेला होता जो प्रस्तावाच्या माध्यमातून ग्लायफोसॅटच्या वापरावरती निर्बंध घालण्याची मागणी घालण्यात आलेली होती. याच्या नंतर केंद्र शासनाच्या माध्यमातून 07 जुलै 2020 रोजी एका निर्णय  निर्गमित करून याच्यावरती शेतकऱ्यांच्या नागरिकांच्या जे काही वितरक आहे व उत्पादक आहेत यांच्या सर्वांचे सूचना मागवल्या होत्या आणि या सर्व हरकती सूचनाच्या आधारे आता 25 ऑक्टोबर 2022 रोजी एका दिसत नाही एक राजपत्र निर्गमित करून 21 ऑक्टोबर 2022 रोजीच्या आदेशानुसार या ग्लायफोसेटच्या (Glyphosate Pesticide) वापरावर ते निर्बंध घालण्यात आलेले आहेत.

 तर ग्लायफोसेट के उपयोग पर निर्बंधन आदेश २०२२ असे या आदेशाला नाव देण्यात आलेला आहे. 

 व्यावसायिक कीटक नियंत्रणाशिवाय कुणालाही त्याचा वापर करता येणार नाही तसेच सरकारच्या ग्लाय पोस्ट साठी देण्यात आलेले जे काही नोंदणी प्रमाणपत्र आहेत ही नोंदणी समितीकडे परत करण्यासाठी सांगितलेले आहेत.


आता प्रमाणपत्र धारकांना प्रमाणपत्र वरती मोठ्या अक्षरांमध्ये व्यावसायिक कीटक नियंत्रणा मार्फत ग्लायफोसेटच्या (Glyphosate Pesticide Tannashak) वापरास परवानगी असा एक मेसेज लिहून दिला जाणार याच्याच माध्यमातून या प्रमाणपत्र धारकांकडूनच व्यावसायिक कीटक नियंत्रणांकडून त्यांना स्प्रेचा वापर करता येणार आहे. राजपत्र निर्गमित करण्यात आलेले हे राजपत्र https://egazette.nic.in आपण या संकेतस्थळावरती पाहू शकता.

या निर्बंधाचा खूप मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे कारण शेत तयार करण्यासाठी,  निर्मूलन करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला एक आधार होता परंतु आता याच्यावरती बंदी घालण्यात आली आहे. त्याच्यावरती निबंध आल्यामुळे याच्या समर्थन असणारे जे काही येतात त्यांनाच काय त्याचे भाव वाढतील त्याच्यासाठी शेतकऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागतील आणि कुठेतरी निर्मूलन करण्यासाठी आता शेतकऱ्यांना मजुरांचा आधार घ्यावा लागणार आहे.

Leave a Comment