Grampanchayat : ग्रामपंचायती झाल्या मालामाल , राज्यातील ग्रामपंचायतीला आला ७२६ कोटीचा निधी.

Grampanchayat : ग्रामपंचायती झाल्या मालामाल , राज्यातील ग्रामपंचायतीला आला ७२६ कोटीचा निधी.
(Grampanchayat Fifteenth Finance Commission)

    ग्रामपंचायतला विकास कामाकरता केंद्र शासनाच्या माध्यमातून पंधराव्या वित्त आयोग (Fifteenth Finance Commission) अंतर्गत बंधित अबांधित अर्थात टाईट अनटाईत निधीचे वितरण केलं जातं, याच्याच अंतर्गत अबंधित अर्थात अंटाईत निधीच्या अंतर्गत 726 कोटी रुपयांच्या वितरण आज 10 नोव्हेंबर 2022 रोजी एका शासन निर्णया अंतर्गत करण्यात आले आहे. या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या या टॉपिक च्या माध्यमातून घेणार आहोत.

केंद्र शासनाच्या माध्यमातून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांना टाईट अनटाईट अर्थात बंधीत अंबंधीत अशा प्रकारांमध्ये निधीचं वितरण केल जात. या स्वरूपामध्ये वितरित केलेल्या निधीच्या अंतर्गत किंवा इतर जे महत्त्वाचे काम आहेत ती काम करावे लागतात. परंतु अन टाईट निधीच्या अंतर्गत ग्रामपंचायतला विकास कामा करता पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जातो. ग्रामपंचायतींना ठरवलेली विकास कामे या निधीच्या अंतर्गत केली जातात. याच्यासाठी आज केंद्र शासनाच्या माध्यमातून 726 कोटी महाराष्ट्र राज्याकरता दिलेले आहेत. (grampanchayat nidhi)


या अंतर्गत आपण जर पाहिले तर पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत दिलेल्या निधीमध्ये 80 टक्के निधी हा ग्रामपंचायतीला दिला जातो, 10 टक्के निधी पंचायत समितीला दिला जातो आणि 10 टक्के निधी हा जिल्हा परिषदेला दिला जातो. यामुळे एकूण 726 कोटी पैकी 694 कोटी एवढा निधी हा ग्रामपंचायतीला दिला जाणार आहे. या निधीमुळे आता ग्रामपंचायत मालामाल होऊन त्यांना आपली विकास कामे करण्यासाठी हा निधी उपलब्ध होणार आहे. 

यासाठी वितरित करण्यात आलेल्या निधीमध्ये जिल्हा निहाय ग्रामपंचायत आणि तालुका निहाय अशा प्रकारे हा निधी वितरित करण्यासाठी विवरण पत्र या शासन निर्णयात देण्यात आलेले आहे. या विवरण पत्रात आपण पाहू शकता जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि त्याच्यासाठी वितरित करण्यात आलेला निधी दिलेला आहे ती खालील प्रमाणे आहे.

ठाणे जिल्ह्यातील एकूण 265 ग्रामपंचायती करता 8.24 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. 

पालघर जिल्ह्यामधील 473 ग्रामपंचायत करता 18 कोटी 34 लाख रुपये एवढा निधी दिला जाणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 783 ग्रामपंचायत करता 20 कोटी 41 लाख रुपये.

रत्नागिरी जिल्ह्यात मधील एकूण 791 ग्रामपंचायत करता 14.88 कोटी. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 427 ग्रामपंचायत करता 8 कोटी 57 लाख रुपये.

नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 1187 ग्रामपंचायतीकरता 36.15 कोटी रुपये.

धुळे जिल्ह्यामधील एकूण 529 ग्रामपंचायत करता 16.28 कोटी रुपये.

नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण 574 ग्रामपंचायत करता 14.19 कोटी.

जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 1154 ग्रामपंचायतीसाठी 32 कोटी 83 लाख रुपये.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण 1267 ग्रामपंचायतीसाठी 40.50 कोटी रुपये.

पुणे जिल्ह्यामधील 1380 ग्रामपंचायत करता 39 कोटी 21 लाख रुपये. 

सातारा जिल्ह्यामध्ये 1476 ग्रामपंचायत साठी 28कोटी 51 लाख रुपये. 

सांगली जिल्ह्यामध्ये 695 ग्रामपंचायत 23.22 कोटी रुपये.

सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 1019 ग्रामपंचायत साठी 32 कोटी 46 लाख रुपये.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1021 ग्रामपंचायत साठी 32.12 कोटी रुपये. 

औरंगाबाद जिल्ह्यामधील 870 ग्रामपंचायत साठी 25.84 कोटी रुपये.

जालना जिल्ह्यामध्ये 772 ग्रामपंचायत 17.52 कोटी रुपये.

परभणी जिल्ह्यामधील एकूण ७०२ ग्रामपंचायतीत 14.59 कोटी रुपये.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये 557 ग्रामपंचायत साठी 11 कोटी 60 लाख रुपये. 

बीड जिल्ह्यामध्ये 1028 ग्रामपंचायतीसाठी 23.41 कोटी रुपये.

नांदेड जिल्ह्यामध्ये 1290 ग्रामपंचायतीसाठी 27 कोटी 97 लाख रुपये.

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 621 ग्रामपंचायत साठी 15 कोटी 89 लाख रुपये.

लातूर जिल्ह्यामध्ये 784 ग्रामपंचायतीसाठी 20 कोटी 78 लाख रुपये दिले जाणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यामधील 870 ग्रामपंचायतीसाठी 23.51 कोटी रुपये.

अकोला जिल्हा 535 ग्रामपंचायतीसाठी 12.13 कोटी रुपये. 

वाशिम जिल्ह्यामध्ये 490 ग्रामपंचायत 11 कोटी नऊ लाख रुपये 

अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 837 ग्रामपंचायतीकरता 20 कोटी 92 लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यामधील एकूण 1143 ग्रामपंचायतीसाठी 23.18 कोटी रुपये.

वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण 504 ग्रामपंचायतीसाठी 10.73 कोटी रुपये. 

नागपूर जिल्ह्यामध्ये 751 ग्रामपंचायत साठी 18 कोटी 97 लाख रुपये 

तर भंडारा जिल्ह्यामध्ये 521 ग्रामपंचायत साठी ११ कोटी आठ लाख रुपये 

गोंदिया जिल्ह्यामधील 537 ग्रामपंचायती 12 कोटी 43 लाख रुपये. 

तर चंद्रपूर जिल्ह्यामधील एकूण 812 ग्रामपंचायतीसाठी 16कोटीत 37 लाख रुपये व गडचिरोली जिल्ह्यामध्ये 435 ग्रामपंचायती करता 9.98 कोटी एवढा निधी हा ग्रापांचायातीना दिला जाणार आहे.


हेहि वाचा: आपल्या ग्रामपंचायत मध्ये कोणत्या नवीन योजना आल्या? आणि कोणत्या नागरिकांना त्याचा लाभ मिळाला पहा ऑनलाईन.

अशा एकूण महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतसाठी 694 कोटी रुपयांच्या निधीचा हफ्त्याचे वितरण करण्यात आलेले आहे. 10 टक्के जिल्हा परिषद आणि दहा टक्के पंचायत समिती असा एकूण हा 726 हप्ता याठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे. यामध्ये ग्रामपंचायतीला 694 कोटी एवढा निधी आता उपलब्ध झालेला आहे. त्याच्यामुळे ग्रामपंचायतला आता विकास काम करण्यासाठी पुरेसा निधी मिळणार आहे आणि ग्रामपंचायत या निधीच्या माध्यमातून मालामाल होणार आहेत.

याच अबंधीत निधीच्या संदर्भातील एक महत्त्वाचे असे हे एक अपडेट होत. ही माहिती आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा करतो धन्यवाद.


Grampanchayat : ग्रामपंचायती झाल्या मालामाल , राज्यातील ग्रामपंचायतीला आला ७२६ कोटीचा निधी.

शासन निर्णय डाउनलोड करा 

Leave a Comment