Mahamesh Yojana: 20 मेंढ्या व 1 नर मेंढा साठी ऑनलाईन अर्ज सुरु, 2.5 लाखापर्यंत अनुदान.

Mahamesh Yojana: 20 मेंढ्या व 1 नर मेंढा साठी ऑनलाईन अर्ज सुरु, 2.5 लाखापर्यंत अनुदान.
Mahamesh Gat Vatap Yojana


पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील भटक्या जमाती क प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारे एक महत्त्वाचे योजना म्हणजे राजे यशवंतराव होळकर महामेष योजना (raje yashwantrao holkar mahamesh yojana) करता 2022-23 करता अर्ज मागविण्यात आलेले तर 15 नोव्हेंबर 2022 पासून 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.

संदर्भातील एक जाहिरात एक प्रसिद्ध पत्र व्यवस्थापकीय संचालक पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी विकास महामंडळ यांच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये राज्यातील भटक्या जमाती भ ज क या प्रवर्गातील 18 ते 60 वयोगटातील अर्जदारांकडून 15 नोव्हेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत महामेष एप्लीकेशनच्या माध्यमातून फक्त ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक अर्जदारांनी या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे (sheli palan yojana 2022 maharashtra) अशा प्रकारचा आव्हान या जाहिरातीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. 


जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा.


2022-23 मध्ये ही योजना 34 जिल्ह्यांमध्ये 351 तालुक्यांमध्ये राबवली जाणार आहे. ज्याच्या अंतर्गत सहा मुख्य घटक आणि त्याच्या अंतर्गत साधारणपणे 15 उपघटक अशी होणार राबवली जाते. याच्यामध्ये स्थायी आणि स्थलांतरित जे मेंढी पालन करणारे मेंढपाळ आहेत या ठिकाणी वीस मेंढी आणि 1 मेंढा नर अशा प्रकारे 75 टक्के अनुदानावरती वाटप केले जातात. याच्यामध्ये कायमस्वरूपी एका ठिकाणी राहणारे जे मेंढपाळ असतील यांना साधारणपणे 2 लाख 49 हजार 750 रुपये एवढे अनुदानावरती 20 मेंढ्या आणि 1 मेंढा नर दिला जातो. त्याच्यामध्ये साधारणपणे 8 हजार रुपये मेंढी तर दहा हजार रुपये  नर मेंढा पर्यंत मिळणार. अशा प्रकारे प्रकल्प खर्च करून एकूण 3 लाख 33 हजार रुपये एवढा प्रकल्प खर्च ग्राह्य धरला जातो.

Mahamesh Yojana: 20 मेंढ्या व 1 नर मेंढा साठी ऑनलाईन अर्ज सुरु, 2.5 लाखापर्यंत अनुदान.

योजनेचे ठळक वैशिष्ठे – योजने अंतर्गत देण्यात येणारे लाभ – पात्रता – अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती पाहण्यासाठी 

येथे क्लिक करा. 

महामेष वेबसाइट वरून अर्ज करण्याची पध्दत –

 • अर्जदारांनी योजनेचा अर्ज ऑनलाइन भरावयाचा आहे. त्यासोबत कोणतेही कागदपत्रे अपलोड करावयाची नसून संगणकीय सॉफ्टवेअरव्दारे random पद्धतीने (लॉटरी) निवड झाल्यानंतर दिलेल्या विहित कालावधीत विहित केलेली कागदपत्रे विहित वेळेत ऑनलाइन अपलोड करावयाची आहे.
 • अर्जदारांनी अर्ज करण्याकरिता www.mahamesh.in हे महामंडळाचे संकेतस्थळ ओपन करावयाचे आहे.
 • अर्ज भरण्याकरिता अर्जदारांनी प्रथम वरील संकेतस्थळावर जाऊन महामेष योजनेची लिंक ओपन करावी.
 • अर्ज भरण्याबाबतची माहिती दर्शविणारा व्हिडिओ व युजर म्यान्युयल बाबतची लिंक संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल, अर्जदारांनी अर्ज भरण्यापूर्वी याबाबतची माहिती काळजीपूर्वक बघून व वाचून त्याप्रमाणे अर्ज भरण्यात यावा.
 • अर्जदारांनी प्रथम स्वतःचा आधार नंबर वापरुन लॉगिन (अर्जदार लॉगिन) करावयाचे आहे. (एका अर्जाकरिता नोंदणी झालेला आधार नंबर परत दुसर्‍या अर्जदाराच्या अर्जाकरिता वापरता येणार नाही)
 • योजनेचा अर्जामध्ये अर्जदारानी वयक्तिक माहिती, जमिनीचा तपशील तसेच इतर माहिती भरावयाची आहे. माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर NEXT बटन क्लिक करावयाचे आहे. त्यानंतर दुसरे पेज ओपन होईल, यामध्ये अर्जदारास कुठल्या घटकामध्ये लाभ घ्यावयाचा आहे याबाबतची माहिती भरावयाची आहे.
 • अर्जामधील माहिती भरून झाल्यानंतर SUBMIT बटनावर क्लिक करण्यात यावे. (सबमिट करण्याआधी भरलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी)
 • अर्ज सबमीट “Application form is submitted successfully” असा मेसेज आल्यानंतरच अर्जदाराचा अर्ज सबमिट झाल्याचे समजावे.
 • अर्ज सबमिट झाल्यानंतर अर्जाची पावती व्यवस्थित जतन करून ठेवण्यात यावी.
 • घटक निहाय प्रास अर्ज विचारात घेऊन उधिष्ट महामंडळामार्फत निश्चित करण्यात यावे.

Android मोबाईलद्वारे MAHAMESH” App वरून  अर्ज करण्याची पध्दत –
 • अर्ज करण्याकरिता “MAHAMESH” App हे http://mahamesh.co.in/ या संकेतस्थळावरून किंवा Google Playstore वरून  “MAHAMESH” इन्स्टोल करण्यात यावे.
 • “MAHAMESH” App ओपन करून अर्ज भरण्याबाबतची माहिती दर्शविणारा व्हिडिओ व युजर म्यान्युयल बाबतची लिंक उपलब्ध करून देण्यात येईल, अर्जदारांनी अर्ज भरण्यापूर्वी याबाबतची माहिती काळजीपूर्वक बघून व वाचून त्याप्रमाणे अर्ज भरण्यात यावा.
 • अर्जदारानी प्रथम स्वतःचा आधार नंबर वापरुन नोंदणी करावयाची आहे. (एका अर्जाकरिता नोंदणी झालेला आधार नंबर परत दुसर्‍या अर्जदाराच्या अर्जाकरिता वापरता येणार नाही)
 • योजनेचा अर्जामध्ये अर्जदाराची वायक्तिक माहिती, जमिनीचा तपशील तसेच इतर माहिती भरावयाची आहे.  यामध्ये अर्जदारास कुठल्या घटका मध्ये लाभ घ्यावयाचा आहे याबाबतची माहिती भरावयाची आहे.
 • अर्जामधील माहिती भरून झाल्यानंतर Submit बटनावर क्लिक करण्यात यावे. (सबमिट करण्याआधी भरलेली माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी)
 • अर्ज सबमीट झाल्यानंतर “Application form is submitted successfully” असा मेसेज आल्यानंतरच अर्जदाराचा अर्ज सबमिट झाल्याचे समजावे.
 • अर्ज सबमिट झाल्यानंतर अर्जाची पावती व्यवस्थित जतन करून ठेवण्यात यावी.
 
लाभधारक निवड प्रक्रिया –

 1. घटक निहाय प्रात अर्ज विचारात घेऊन महामंडळामार्फत उधिष्ट निश्चित करण्यात येईल.
 2. महामंडळामार्फत उधिष्ट निश्चित झाल्यानंतर, जिल्हा स्तरीय निवड समितीमार्फत निवड यादी (1 selected + 5 waiting) यानुसार ऐच्छिक ( (Random) रित्या ऑनलाईन पद्धतीने प्रास अर्जामधून लाभधारक निवड करण्यात येईल.
 3. ऐच्छिक(Random) पद्धतीने निवड करण्यात आलेल्या अर्जदारांना संकेतस्थळाच्या (www.mahamesh.in) माध्यमाद्वारे त्यांच्या नोंदनिकृत भ्रमणध्वनिवर लघु संदेशाव्दारे (SMS) निवड झाल्याबद्दल कळविण्यात येईल.
 4. निवड यादीमध्ये उपलब्ध तरतुदीच्या आधीन राहून निश्चित केलेल्या लक्षांकाच्या पाच पट (उपलब्ध व पात्र अर्जास आधीन राहून) अर्जदारांना कागदपत्रे पडताळणी करिता अपलोड करण्याकरिता कळविण्यात येईल.
 5. अर्जदारांना आवश्यक कागदपत्रे संकेतस्थळावर उपलोड करण्याकरिता १५ दिवसाचा कालावधी देण्यात येईल.
 6. अर्जदारांना आवश्यक कागदपत्राची पूर्तता न केल्यास त्यांना अपात्र ठरविण्यात येईल.
 7. निवड यादी महामंडळाच्या संकेतस्थळावर (www.mahamesh.in) उपलब्ध असेल.
अधिक माहितीसाठी खालील pdf तपासा 

Leave a Comment