शेळीपालन, कुक्कुटपालन, वराह पालन योजनेसाठी करा ऑनलाईन अर्ज, मिळवा 25 लाखापर्यंत सबसिडी.

शेळीपालन, कुक्कुटपालन, वराह पालन योजनेसाठी करा ऑनलाईन अर्ज, मिळवा 25 लाखापर्यंत सबसिडी.
Shelipalan Yojana

शेळी पालन योजना (Shelipalan Yojana 2022) तसेच कुकूटपालन योजनेसाठी 25 ते 50 लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे यासाठी आपण जास्तीत जास्त पशुपालक व शेतकरी बांधवांनी ऑनलाइन अर्ज करावेत असे आव्हान करण्यात आले आहे.



शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर शेळीपालन तसेच कुकूटपालन सुरू करायचा असेल तर या योजनेची संपूर्ण माहिती हवी असेल तर जाणून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तर अशी माहिती.


बरेच शेतकरी बांधव शेती व्यवसाय करत असताना शेतीला जोड धंदा म्हणून एखादा छोटा मोठा शेतीपूरक व्यवसाय करत असतात. बांधवांना आर्थिक मदत होते.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास यावेळेस एखांदा शेतीपूरक व्यवसाय असेल तर शेतकरी बांधव अशा शेतीपूरक व्यवसायातून झालेल्या नुकसानीपासून सावरू शकतो.


शेळी कुक्कुटपालन साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा जाणून घ्या त्याबद्दल सविस्तर अशी माहिती.


ग्रामीण भागामध्ये अनेक तरुण मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. बेरोजगार तरुण शेळी मेंढी (Sheli palan online form) पालन दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन वराह पालन हे सर्व व्यवसाय करून आर्थिक स्थिती सक्षम करून शकतात. हे सर्व व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या वतीने अनुदान दिले जाते या अनुदानाच्या साह्याने शेतकरी बांधव तसेच बेरोजगार तरुण हा व्यवसाय सुरू करू शकतात. दूध व्यवसाय शेळीपालन तसेच कुकूटपालन व्यवसाय करण्यास खूप मोठी संधी सध्या निर्माण झाली आहे. मास अंडी दूध यांना दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. यातूनच दुग्ध व्यवसाय शेळी पालन कुक्कुटपालन वराह पालन व्यवसाय अनेक तरुण करू शकतात.



शेळीपालन कुक्कुटपालन योजनेसाठी किती अनुदान मिळणार.


राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत (Department of Animal Husbandry & Dairying) दुग्ध व्यवसाय, शेळी मेंढी पालन, कुक्कुटपालन, वराह पालन, मुरघास निर्मितीसाठी खालील पद्धती नुसार अनुदान दिले जाणार आहे.


1) कुक्कुटपालन पंचवीस लाख रुपये 

२) शेळी मेंढी पालन व्यवसाय करण्यासाठी 50 लाख रुपये 

३) वराह पालन साठी तीस लाख रुपये

४) मुरघास निर्मितीसाठी 50 लाख रुपये.


वरील योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो.


  • स्वयंसहायता बचत गट शेतकरी उत्पादक संस्था
  • व्यक्तिगत व्यावसायिक
  • कलम आठ अंतर्गत स्थापन झालेली कंपनी
  • सहकारी दूध उत्पादक संस्था.
  • शेतकरी सहकारी संस्था
  • सहजोखीम गट
  • सहकारी संस्था
  • स्टार्टअप ग्रुप 
  • खाजगी संस्था

राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत मिळणार लाभ 


वरील सर्व या पशुधन योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने सन 2022 23 या वर्षापासून पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकास आधारित नवीन राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेसाठी मंजुरी दिलेली आहे.


जे व्यक्ती हा व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असणार आहेत अशा इच्छुक व्यक्तींना या या राष्ट्रीय पशुधन योजनेच्या अंतर्गत लाभ घेण्याचे आव्हान शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


या योजनेसाठी अर्ज कोठे कराल?


या योजचा लाभ घेण्यासाठी पशुपालन डेरी विभागाच्या वेबसाईट वरती ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी डिपार्टमेंट ऑफ ऍनिमल हसबंडरी (Department of Animal Husbandry & Dairying) या वेबसाईटला (website Link) भेट द्या. 


या योजनेविषयी सविस्तर माहितीसाठी आपल्या तालुक्यातील पशुसंवर्धन कार्यालयास भेट द्यावी.


तसेच या योजने संदर्भातील सविस्तर माहिती वेबसाईटवर दिलेली आहे. योजना कशा प्रकारचे आहे अर्ज कसा करावा तसेच अनुदान किती मिळणार आहे कोण कोणते योजना साठी अर्ज करता येत येणार अशी सविस्तर माहिती वरील वेबसाईट वरती दिलेली आहे.

वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Close Visit Mhshetkari