Ativrushti Nuksan Bharpai या दहा जिल्ह्यांसाठी मिळणार 675 कोटीची नुकसान भरपाई, नवीन शासन निर्णय

Ativrushti Nuksan Bharpai- 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. या नुकसानीमुळे बरेच जिल्हे बाधित झाले होते. यामधील बऱ्याच जिल्ह्यांना मदतीचा वाटप देखील करण्यात आले आहे. आणि या निधीमध्ये आत्तापर्यंत पाच हजार कोटी पेक्षा जास्त रकमेची तरतूद करण्यात आली आहे. आणि त्यामधील काही रक्कम वितरित करण्यात आली होती. आपण जर पाहिलं तर बरेचसे जिल्हे होते की त्या जिल्ह्याला एक रुपया सुद्धा मिळालेला नव्हता. आणि याच जिल्ह्याला अतिवृष्टी नुकसान भरपाईची ( Nuksan Bharpai 2022) रक्कम कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. त्यामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून आणि सतत पाऊस या दोन्ही बाबीसाठी 3200 कोटी रुपये आणि जी दुप्पट नुकसान भरपाई द्यायचे निकषानुसार याच्यासाठी 400 कोटी असे एकूण 3600 कोटी रुपयांची तरतूद या ठिकाणी केलेले पुरवणी मागणी द्वारे मागणी केलेली आहे. Ativrushti Nuksan Bharpai

याच अनुषंगाने जे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवले होते अशा प्रस्तावांना मंजूर देण्यासाठी सुरुवात झालेली आहे. यामधील नाशिक विभाग (Nashik Ativrushti Nuksan Bharpai) आणि पुणे विभाग (Pune Ativrushti Nuksan Bharpai) या विभागांना म्हणावी तशी रक्कम देण्यात आली नव्हती. याच्यासाठी आज दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण जीआर काढून 10 जिल्ह्यासाठी 675 कोटी रुपये नुकसान भरपाई (Nuksan Bharpai) साठी मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्य शासनाकडे 10 हजार कोटी पेक्षा चे जास्त प्रस्ताव सध्या स्थितीला पडून आहेत. यापूर्वीची नुकसान भरपाईची Ativrushti Nuksan Bharpai रक्कम जी मंजूर करण्यात आलेली आहे त्यामधील काही निधी वितरित करणे बाकी आहे. ही सर्व रक्कम आता या 3600 कोटी निधीमधून वितरित करण्यात येणार आहे. (Nuksan Bharpai)

मित्रांनो दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी जो जीआर काढण्यात आलेला आहे त्यामध्ये जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी तेरा 13600 रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादेमध्ये तसेच बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादेमध्ये आणि बहुवार्षिक (फळबागेसाठी) पिकांच्या नुकसानीसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टर च्या मर्यादेमध्ये नुकसान भरपाई साठी ही मंजुरी देण्यात आलेली आहे. Nuksan Bharpai 2022-23

यामध्ये नाशिक विभाग आयुक्त आणि पुणे विभाग आयुक्त यांच्या मागणीनुसार 675 कोटी निधी वितरित करण्यासाठी या 11 जानेवारीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे.

कोणत्या जिल्ह्याला किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Ativrushti Nuksan Bharpai शासन निर्णय pdf डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Ativrushti Nuksan Bharpai 2022

Leave a Comment

Close Visit Mhshetkari