Crop Insurance: या जिल्ह्यांचा पिक विमा वाटप सुरु

Crop Insurance: पिक विमा संदर्भातील संदर्भातील काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे. मित्रांनो पिक विमा मिळण्यासाठी पात्र असलेले महत्त्वाचा जिल्हा म्हणजे यवतमाळ. कारण दहा वेळा पेक्षा जास्त वेळा अतिवृष्टी झालेली आहे. पावसाने या जिल्ह्याचे नुकसान झालेलं होतं पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी यांना अद्याप पिक विमा वाटप होत नव्हता. शासकीय कंपनी ओळखले जाणारी एग्रीकल्चर इन्शुरन्स ऑफ इंडिया (Agriculture Insurance Of India) या कंपनीच्या माध्यमातून जवळजवळ 16 जिल्ह्यांमध्ये पिक विमा (Crop Insurance) योजना राबवली जात आहे.

याच कंपनीच्या माध्यमातून पिक विमा (Crop Insurance) वाटपामध्ये दिरंगाई होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक मोठ्या प्रमाणात रोष देखील निर्माण झालेला होता. या सर्वांच्या पार्श्वभूमी वरती आता AIC या कंपनी माध्यमातून पिक विम्याच्या वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचा मकाचा क्लेम असेल, सोयाबीनचा क्लेम असेल या क्लेम साठीचा पिक विमा यादी बरोबर काही मंडळामध्ये काढण्यात आलेले आहेत. या आधी सुद्धा काढलेल्या यादी सूचित मंडळांमध्ये सुद्धा पिक विमा वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे.

वाशिम जिल्ह्या पिक विमा वाटप

वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा पिक विमाला कालपासून वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. आज काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे रक्कम आलेली आहे. उद्या आणि सोमवारी सुद्धा काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे रक्कम जमा केली जाईल.

यवतमाळ जिल्ह्या पिक विमा वाटप

मित्रांनो सर्वात मोठा बाधित झालेला आणि सर्वात जास्त अपेक्षा असलेल्या जिल्हामध्ये यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यासाठी चांगला पिक विमा येईल अशा प्रकारचे अपेक्षा होती. परंतु कंपनीच्या माध्यमातून आता खूप कमी रक्कम या ठिकाणी वाटप करायला सुरुवात केलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये आधी सूचना सुद्धा काढलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात मंडळ बाधित झालेली आहे. त्याच्यामुळे आता पिक विमा देताना नेमका क्लेमचा पिक विमा दिला जातोय की त्या मंडळातील बाधित शेतकऱ्यांना आधी सुचणेनुसार पिक विमा दिला जातोय हा देखील त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झालेल आहे. त्याच्याबद्दलचा कन्फर्म अपडेट आल्यानंतर ते अपडेट सुद्धा आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

परंतु जर आधी सूचित मंडळामध्ये तुमचं गाव नसेल आणि तुम्हाला जर पिक विमा मिळालेला असेल तुम्ही जर क्लेम केलेला असेल तर तो तुमचा पिक विमा 100% असणार आहे. कारण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना अधि सूचित मंडळामध्ये नसलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचा पिक विमा मिळण्यासाठी सुरुवात झालेली आहे.

धाराशिव जिल्ह्या पिक विमा वाटप

धाराशिव जिल्ह्याचे पिक विमा कडे पण सर्वांचे लक्ष लागले होते. शेतकऱ्यांनी या ठिकाणी क्लेम केले होते जवळजवळ पाच लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी क्लेम केले होते परंतु जवळजवळ दोन ते अडीच लाख पेक्षा जास्त शेतकरी अद्याप देखील पोस्ट हर्वेस्त किंवा इतर कारणामुळे क्लेमच्या प्रतीक्षेत होते. या शेतकऱ्यांना सुद्धा पिक विमा वाटप होण्यास सुरुवात झाली आहे. याच्यामध्ये सर्वात जास्त पीक विम्याचे ( Crop Insurance) वाटप ईआयसी म्हणजेच एग्रीकल्चर इन्शुरन्स ऑफ इंडिया (Agriculture Insurance Of India) या कंपनीच्या माध्यमातून केले जात आहे.

तर मित्रांनो अशा पद्धतीने वाशिम, यवतमाळ, छत्रपती संभाजी नगर तसेच धाराशिव जिल्हा पिक विमा वाटपाच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं अपडेट होतं.

2 thoughts on “Crop Insurance: या जिल्ह्यांचा पिक विमा वाटप सुरु”

Leave a Comment