PM Kisan Yojana: पी एम किसान योजनेच्या पुढील व 13 वा हप्त्यासाठी करा हे काम? अन्यथा मिळणार नाही 13 वा हफ्ता.

By Bhimraj Pikwane

Published on:

pm-kisan-yojana

PM Kisan Yojana: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र असलेल्या शेतकऱ्यांना आपल्या बचत खात्याला आधार लिंक करण्यासाठी 15 जुलै 2023 पर्यंतचे मुदत देण्यात आलेली आहे.

मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM kisan Sanman Nidhi Yojana) योजनेचा पुढील हप्ता अर्थात तेरावा हप्ता वितरित करण्यासाठी 2 डिसेंबर 2022 रोजी कृषी विभागाचे महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ कॉन्फरन्स झालेली होती आणि याच व्हिडिओ कॉन्फरेशन मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या बचत खात्याला आधार लिंक झालेले नाही किंवा ज्या शेतकऱ्यांच्या अद्याप केवायसी (Pm Kisan Ekyc) झालेले नाही अशा शेतकऱ्यांची केवायसी आणि बचत खात्याला आधार लिंक करण्यासाठी 15 डिसेंबर 2022 पर्यंतचे मुदत देण्यात आलेली होती. परंतु मित्रांनो महाराष्ट्र मधील लाभार्थ्यांची संख्या पाहता जवळ-जवळ 14 लाख 88 हजार शेतकऱ्यांनी अद्याप देखील आपल्या बचत खात्याला आधार कार्ड लिंक ( Adhar Card Bank Link ) केलेला नाही. यामुळे साधारणपणे महाराष्ट्रातील 15 लाख लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहतील की काय अशा प्रकारचे शक्यता निर्माण झालेले होती.

या आधारे कृषी आयुक्त यांच्या माध्यमातून केलेल्या मागणीनुसार आणि त्यांच्या सूचनेनुसार आता या पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये (PM kisan Sanman Nidhi Yojana) लाभार्थी म्हणून पात्र असलेल्या लाभार्थ्यांना ज्या लाभार्थ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या बचत खात्याला आधार लिंक केलेले नाही अशा शेतकऱ्यांना आपल्या बचत खात्याला आधार लिंक करण्यासाठी 15 जुलै 2023 पर्यंतचे मुदत देण्यात आलेली आहे. मात्र मित्रांनो तेरावा हप्ता वितरित करत असताना या शेतकऱ्यांच्या बचत खात्याला ( Pm kisan Yojana) आधार लिंक झालं तर त्या शेतकऱ्यांना याच वितरण केलं जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांची केवायसी होईल त्या शेतकऱ्याने वितरण केलं जाणार आहे आणि आता हे शेतकरी या तेराव्या हापत्यासाठी वंचित राहतील. पुढे ज्यावेळेस त्यांच्या बचत खात्याला आधार लिंक होईल त्यावेळेस त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम क्रेडिट केली जाणार आहे.

तर मित्रांनो साधारणपणे 2 डिसेंबर पर्यंत शेतकरी दिनाचे औचित्य साधून या तेराव्या हप्त्याचे वितरण केले जाईल अशा प्रकारची शक्यता होती. परंतु महाराष्ट्र प्रमाणे देशांमध्ये इतर राज्यांमध्ये सुद्धा बचत खात्याला आधार लिंक न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना मुदत देण्यासाठी ही एक मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ( Pm Kisan 13th Installment) याच बरोबर आता 20 जानेवारी 2023 नंतर येणाऱ्या पुढील हाप्त्याचे वितरण केलं जाईल अशा प्रकारचे शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतातील एक मोठा सण तो म्हणजे उत्तरायन, शक्यता आहे की उत्तरायण सणाचा निमित्त करून सुद्धा किंवा मकर संक्रांतीचे निमित्त करून सुद्धा या पुढील तेराव्या हापत्याचे वितरण केलं जाऊ शकतात. परंतु याच्या संदर्भातील कुठलीही अधिकृत अशी घोषणा करण्यात आलेली नाही. त्याच्या संदर्भातील काही अधिकृत घोषणा केल्यानंतर येणाऱ्या हप्त्याच्या तारखे संदर्भातील अपडेट सुद्धा आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करूयात.

हा हप्ता मिळवण्यासाठी किंवा येणाऱ्या हफ्ते पुढे चालू ठेवण्यासाठी आपल्या बचत खात्याला जर आपण अजूनही आधार लिंक केले नसेल किंवा आपले जर केवायसी (PM Kisan Ekyc) केलेली नसेल तर करून घ्या आणि लाभासाठी पात्र व्हा.

मित्रानो अशाच प्रकारच्या माहिती रोज मोफत मिळण्यासाठी आमचा ऑनली अडमिन व्हॉट्सॲप ग्रुप नक्की जॉईन करा.

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

2 thoughts on “PM Kisan Yojana: पी एम किसान योजनेच्या पुढील व 13 वा हप्त्यासाठी करा हे काम? अन्यथा मिळणार नाही 13 वा हफ्ता.”

Leave a Comment