Farmer Scheme: या 40 लाख लाभार्थ्यांना धान्य ऐवजी मिळणार वर्षाला ₹9000 रुपये. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी 14 जिल्ह्यामधील 40 लाख लाभार्थ्यांना स्वस्त दरात धान्य देण्याची योजना बंद करण्यावरून नाराजी असताना आता थेट धान्याऐवजी खात्यामध्ये रक्कम जमा करण्याची योजना राज्य सरकारने जाहीर केले आहे.
राज्यामधील पात्र शेतकऱ्यांना 59 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ राशन दुकाना (Ration Card) तून देण्याचे योजना सुरू केली होती. तसेच या योजनेतून केंद्र सरकारही धान्य देत होते. परंतु ते बंद करण्यात आल्याने या लाभार्थ्यांना जुलै 2022 पासून गव्हाचे आणि सप्टेंबर 2022 पासून तांदळाचे वाटप बंद करण्यात आले होते.
काय आहे योजना?
या योजनेअंतर्गत एका व्यक्तीसाठी महिन्याला 150 रुपये म्हणजेच एका कुटुंबामध्ये पाच व्यक्ती असेल तर पाच जणांच्या कुटुंबाला वर्षाकाठी 9 हजार रुपये देण्याचा प्रस्ताव शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने तयार केलेला आहे. या योजनेसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. ration card beneficiary Farmer Scheme
कसे मिळणार लाभार्थ्यांना पैसे Farmer Scheme
कुटुंबामधील राशन कार्ड नुसार महिलेच्या बँक खात्यामध्ये सर्वांचे पैसे जमा करण्याचा साठी शासनाचा विचार आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थीच्या बँक खात्याला आधार सलग्न असणे गरजेचे असणार आहे. कारण की आधार संलग्न बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे.
असे मिळतील वर्षाकाठी 36 हजार रुपये.
चार जणांच्या कुटुंबाला वर्षाकाठी 36 हजार रुपये मिळनार. या पैशांमधून पात्र कुटुंबांना बाजारामधून गहू तसेच तांदळाची खरेदी करता येणार. तसेच गहू आणि तांदळाची खरेदी करून वाचलेल्या पैशांमधून लाभार्थी त्याच्या वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी ही या पैशाचा वापर करू शकतो.

Pm Kisan Yojana : पीएम सन्मान निधी योजने च्या अपात्र लाभार्थ्यावर चालणार न्यायालयामध्ये खटले
खालील 14 जिल्ह्यांचा समावेश
- बुलढाणा
- अकोला
- वाशिम
- यवतमाळ
- अमरावती
- वर्धा
- औरंगाबाद
- जालना
- परभणी
- नांदेड
- उस्मानाबाद
- बीड
- लातूर
- हिंगोली

1 thought on “Farmer Scheme: या 14 जिल्ह्यांमधील 40 लाख राशन कार्ड धारकांना धान्य ऐवजी मिळणार वर्षाला 9 हजार रुपये.”