RTE Admission 2023: आर. टी. ई. 25% अंतर्गत या मुलांना मोफत प्रवेश, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2023-24, आवश्यक कागदपत्रे, सर्व माहिती

By Bhimraj Pikwane

Published on:

RTE Admission 2023

RTE Admission 2023 25% ऑनलाइन अर्ज 20 फेब्रुवारी पासून सुरु होणार होते परंतु सरकारी योजनेच्या लाभासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आल्यामुळे आरटी प्रवेश प्रक्रिया सरकारी योजना असल्यामुळे यामुळे मुलांना मोफत प्रवेश मिळतो त्यासाठी आर टी 25% ऑनलाईन प्रवेश योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. RTE Admission 2023 प्रवेशासाठी मुलांकडे आधार कार्ड नसल्यास ते प्रवेशापासून वंचित राहू शकतात यामुळे प्रवेश प्रक्रिया अजूनही जाहीर केलेली नाही.

RTE Admission 2023 आर टी इ द्वारे खाजगी प्राथमिक शाळांमध्ये राखीव असणाऱ्या पंचवीस टक्के जागेसाठी राज्यांमधील आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांसाठी ऑनलाईन प्रवेश येत्या काही दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे. या प्रवेशासाठी मुलांच्या आधार कार्ड असणे बाबतच्या निर्णयावर शालेय शिक्षण विभागाकडून सूचना मागवण्यात आले आहेत. शिक्षण विभागाकडून यासाठी सूचना आल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

RTE Admission 2023 25% ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे ही सर्व पालकांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांक च्या आत मध्ये तयार ठेवावे.

  • रहिवासी दाखला
  • जात प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र वडिलांचे किंवा मुलांचे
  • अपंग असल्यास त्याचा पुरावा
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • जन्माचा दाखला
  • घटस्फोटीत महिला असल्यास त्याचा पुरावा
  • विधवा महिला असल्यास त्याचा पुरावा
  • एकल पालकत्व (Singal Parents) असल्यास त्याचा पुरावा
  • अनाथ असल्यास त्याचा पुरावा

RTE Admission 2023: आर. टी. ई. 25% अंतर्गत या मुलांना मोफत प्रवेश, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2023-24, आवश्यक कागदपत्रे, सर्व माहिती

Solar-MSKVY: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, जलयुक्त शिवार व घरकुल योजना ‘मिशन मोड’ वर राबविल्या जाणार, देवेंद्र फडणवीस

RTE Portal ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex

rte admission 2023-24 अर्ज कोठून भरावा लागेल?

केंद्रांवर किंवा जेथे इंटरनेट सुविधा, संगणक, प्रिंटर इ. उपलब्ध असेल तेथून भरावा.

rte admission 2023-24 अर्ज करायला किती फीस आहे

शैक्षणिक वर्ष 2023 24 पार्टी 25% ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कसल्याही प्रकारची फीस नाही आर टी च्या वेबसाईटवर जाऊन आपण निशुल्क अर्ज करायचा आहे

पालक किती शाळा व कोणत्या माध्यमासाठी अर्ज करू शकतात

ऑनलाइन अर्ज करताना पालकांनी त्यांच्या रहिवासी क्षेत्रापासून एक ते तीन किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त अंतरापर्यंत उपलब्ध असणाऱ्या शाळांपैकी जास्तीत जास्त कोणत्याही दहा शाळा निवडता येतील तसेच माध्यम निवडण्याचे स्वातंत्र्य पालकांनाच असेल.

अर्ज केला म्हणजे लगेच प्रवेश मिळेल का?

पार्टी प्रवेशासाठी शाळेच्या सुरुवातीला वर्गाच्या 25% प्रवेश क्षमतेपेक्षा जर जास्त अर्ज प्राप्त झाले तर लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जातात अशा स्थितीमध्ये प्रत्येक अर्जदाराच्या पाल्याला प्रवेश मिळेलच असे नाही.

उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला कोणता पाहिजे? RTE Admission 2023

उत्पन्नाचा तसेच जातीचा दाखला बाहेरी राज्यातला ग्राह्य धरण्यात येणार नाही ज्या ठिकाणी रहिवासी आहे त्याच ठिकाणचा पुढील दोन्ही दाखले असावेत. उत्पन्नाचा दाखला तहसीलदार किंवा महसूल अधिकाऱ्याने दिलेला असावा.

ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर पुढील माहिती पालकांना कशी मिळेल?

आर टी ए ऍडमिशन 2023 24 याबाबत पालकांनी अर्ज केल्यास अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर ती त्यांना एसएमएस द्वारे सूचित केले जाईल. त्यामुळे अर्ज भरताना पालकांनी मोबाईल क्रमांक हा व्यवस्थित भरावा. परंतु पालकांनी फक्त एसएमएस वर अवलंबून राहू नाही आरटीओच्या पोर्टलवर एप्लीकेशन वाईस डिटेल या पर्यायावर क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती पहावी.

rte admission 2023-24 प्रवेशासाठी निवड झाल्यास प्रवेश कसा घ्यावा?

पालकांना प्रवेशासाठी निवड झाल्याचा एसएमएस आल्यानंतर आरटी पोर्टल वरील एप्लीकेशन वाईज Application wise details डिटेल या पर्यायावर क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती पहावी लॉटरी लॉटरी लागली असेल तर अलॉटमेंट लेटरची Allotment letter प्रिंट काढावी आणि हमीपत्र या टॅब वर क्लिक करून त्याची प्रिंट काढून घ्यावी.

Allotment letter वर आपल्या विभागातील पडताळणी समितीचा पत्ता दिलेला असतो त्या ठिकाणी अलॉटमेंट लेटर Allotment letter व हमीपत्रची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन जावे आणि आपला प्रवेश निश्चित झाल्याची प्रिंट पडताळणी समितीकडे द्यावी.

निवड झालेल्या बालकांना विहित मुदतीत पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश निश्चित न केल्यास ती जागा रिक्त राहील आणि त्या जागेवर लॉटरी द्वारे निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यास संधी मिळेल.

RTE Admission 2023 आर टी 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत प्रवेश मिळाला अथवा नाही एक असे कळेल?

प्रवेशासाठी निवड झाली आहे असा एसेमेस प्राप्त झाल्यानंतर पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे सबमिट केल्यानंतर त्यांना पडताळणी समितीकडून एक पावती दिली जाते आणि प्रवेश मिळाला मिळाला की नाही हे समजले जाते. rte admission maharashtra

टिपः RTE Admission 2023 25% अंतर्गत एका शाळेत प्रवेश rte school list मिळाल्यानंतर विद्यार्थी कोणत्याही कारणास्तव शाळा बदलू शकत नाही.

RTE Admission 2023: आर. टी. ई. 25% अंतर्गत या मुलांना मोफत प्रवेश, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2023-24, आवश्यक कागदपत्रे, सर्व माहिती

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

3 thoughts on “RTE Admission 2023: आर. टी. ई. 25% अंतर्गत या मुलांना मोफत प्रवेश, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2023-24, आवश्यक कागदपत्रे, सर्व माहिती”

Leave a Comment