Aaple Sarkar नमस्कार मित्रांनो ( Aaple sarkar seva kendra nagpur )आपले सरकार सेवा केंद्र नागपूर या जिल्ह्यांमध्ये नवीन आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज सुरू झालेले आहेत याबाबत सविस्तर अशी माहिती आपण आजच्या या टॉपिक मध्ये पाहणार आहोत.
Aaple Sarkar- आपले सरकार सेवा केंद्र मार्फत विविध योजनांचा लाभ आपल्याला देता येतो जसे की उत्पन्नाचे प्रमाणपत्र डोमासाईल प्रमाणपत्र तसेच जातीचा दाखला जवळजवळ 200 पेक्षा जास्त सर्विस चा लाभ या आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच सेतू कार्यालय मार्फत देण्यात येतो. नागपूर जिल्हा करता नवीन आपले सरकार सेवा केंद्र (ASSK) घेण्यासाठी जाहिरात निघालेली आहे दिनांक 6 मार्च ते 31 मार्च या कालावधीमध्ये आपण अर्ज करून नागपूर जिल्ह्यामधील ग्रामीण तसेच शहरी भागासाठी आपले सेवा केंद्र (Aaple Sarkar)स्थापित करू शकता. आपले सरकार सेवा केंद्राबद्दल घेण्यासाठी सविस्तर माहिती पाहूया.
जिल्हाधिकार्यालय नागपूर तसेच जिल्हा सेतू समिती यांच्यामार्फत आपले सरकार सेवा केंद्र करिता नागपूर जिल्ह्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील सध्या कार्यरत असलेल्या एकात्मिक नागरी सुविधा केंद्र म्हणजे सेतू केंद्र तसेच महा-ई-सेवा केंद्र यांच्यासाठी जिल्हाधिकार्यालय यांच्यामार्फत एक जाहिरात प्रकाशित केलेली आहे. दिनांक 19 जानेवारी 2018 रोजी च्या शासन निर्णयानुसार शहरी व ग्रामीण भागातील लोकसंख्येच्या निकषानुसार रिक्त पदाची यादी नागपूर जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
नागपूर येथील ग्रामीण भागातील 33 केंद्रासाठी तसेच शहरी भागातील 108 केंद्रासाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. शहरी भागातील तसेच ग्रामीण भागातील कोणत्या गावासाठी आपले सेवा केंद्र देण्यात येणार आहे यासंबंधी सविस्तर अशी माहिती आपल्याला नागपूर जिल्ह्याच्या संकेतस्थळावर पाहायला मिळेल तसेच आपण याची लिंक खाली शेवटी पण दिलेली आहे आपण ते ठिकाणाहून शहरी व ग्रामीण भागातील गावांची यादी पाहू शकता.
नागपूर जिल्ह्यामधील सीएससी म्हणजेच कॉमन सर्विस सेंटर धारकांना व जिल्ह्यामधील शहरी व ग्रामीण भागातील भौगोलिक क्षेत्रात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्ती ज्यांचे केंद्र सुरू नसेल परंतु जो सीएससी कॉमन सर्विस सेंटर चे केंद्र मिळवण्यासाठी विविध नमुन्यात अर्जातील अटी व नियम पाहून अर्ज करीत असेल तर अशा व्यक्तींना 6 मार्च 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये शासकीय कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 05 वाजेपर्यंत लेखी व अचूक अर्ज सादर करू शकतो.
Aaple Sarkar- ज्या व्यक्तींना स्वतः जिल्हाधिकार्यालय नागपूर येथे स्वतः उपस्थित राहून अर्ज सादर करायचा आहे आणि अर्ज करताना आपली पोहोच पावती घेण्यास विसरू नये ईमेल द्वारे अथवा आवक जाऊ विभागाद्वारे इतर पद्धतीने अर्ज केला तर तो अर्ज स्वीकारण्यात येणार नाही तसेच दिलेल्या तारखेला मध्येच अर्ज सादर करावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.
अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र/अपात्र केंद्रांची यादी ही नागपूर विभागाच्या संकेतस्थळावरती नंतर प्रकाशित करण्यात येईल यामुळे नागपूर जिल्ह्याच्या संकेतस्थळ वेळोवेळी भेट देऊन माहिती तपासावी.
Aaple Sarkar- आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी अटी व नियम
- अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराकडे संगणक ज्ञान म्हणजेच एमएस-सीआयटी किंवा ट्रिपल सी mscit/ccc प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- सी सी आय डी असणाऱ्या कॉमन सर्विस सेंटर धारकांना अर्ज केल्यास त्यांना प्राधान्याने आपले सरकार सेवा केंद्र देण्यात येईल.
- कॉमन सर्विस सेंटर ( CSC) धारकांनी एकापेक्षा अधिक अर्ज केल्यास केंद्रातील मागील सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या केंद्र चालकाचे अधिक व्यवहार झाले असतील अशा कॉमन सर्विस सेंटर CSC सेवा केंद्रांना दर्जा प्राप्ततेसाठी चालकाचे व्यवहार समान असल्यास सोडचिठ्ठीद्वारे पुढील प्रक्रिया करण्यात येईल याविषयी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू समिती यांचा निर्णय शेवटचा राहील.
- आपले सरकार सेवा केंद्र चालकाची निवड झाल्यास एक महिन्याच्या आत मध्ये संबंधित पोलीस स्टेशनचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
- इतर अटी व शर्ती पाण्यासाठी शेवटी दिलेले जाहिरात पहावी.
