Cotton Rate Today: देशातील कापूस दर कधी वाढणार? अजून शेतकऱ्यांकडे 45 टक्के कापूस शिल्लक

By Bhimraj Pikwane

Published on:

Cotton Rate Today

Cotton Rate: आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस दरात आज काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. तर देशांमधील काही बाजार समितीमध्ये कापसाचे दर कमी जास्त होत होते परंतु दर पातळी सरासरी कायम होती. राज्यातील बाजार समिती मधील आवक जास्त असल्याने दरवाढीवर मर्यादा येत आहेत व बाजार मध्ये आवक कमी जास्त होत आहे. देशामधील बाजारामध्ये 196 लाख गाठी कापूस आल्याचे भारतीय कापूस महामंडळाने सांगितले आहे.

ऑक्टोबर महिन्यामध्ये कापूस हंगाम सुरू झाला परंतु पहिल्या चार महिन्यांमध्ये शेतकऱ्यांनी कापसाची कमी विक्री केली सरासरीपेक्षा बाजारांमधील आवक निम्मी होती परंतु फेब्रुवारीपासून बाजारातील कापूस आवक वाढलेली आहे तर मार्च महिन्यामधील कापूस आवक सरासरीपेक्षा दुप्पट झाली आहे याचाच दबाव बाजारावर दिसून येत आहे. मार्च महिन्यामधील कापूस व सरासरी दुप्पट झालेली आहे असे असताना देखील शेतकऱ्यांकडे अजून 40 ते 45 टक्के कापूस शिल्लक आहे.

सीसीआयच्या मते देशामधील बाजारात 29 मार्चपर्यंत 196 लाख गाठी कापूस आला आणि कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या (Cotton Association of India) मार्च महिन्यामधील अंदाजानुसार देशांमध्ये यंदा 313 लाख गाठी कापूस उत्पादन होईल. हे उत्पादन पुढील काळामध्ये बदल होऊ शकते म्हणजे 63 टक्के कापूस बाजारामध्ये आला तर 37% कापूस शिल्लक आहे म्हणजेच अजूनही 117 लाख गाठी कापूस शिल्लक आहे.

शेतकऱ्यांकडे शिल्लक कापूस

शेतकऱ्यांकडे किती कापूस शिल्लक आहे याबाबत सर्वांनाच प्रश्न आहे. परंतु सगळ्यांची मते वेगवेगळी आहे. तरीही शेतकऱ्यांकडे 40 किंवा 45 टक्के कापूस शिल्लक असू शकतो. त्यातच बाजारातून आलेला पूर्ण 37% कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक असण्याची शक्यता आहे.

कोणत्या कारणामुळे कापूस दर सध्या कमी आहे

एप्रिल महिन्यामध्ये काही दिवस कापूस दबाव राहू शकतो असा अंदाज आहे. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव ( MCX Cotton Rate Live) सुधारत असताना देखील देशांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे दर वाढलेले नाही. काही बाजारांमध्ये मागील तीन दिवसापासून सुधारणा पाहायला मिळाली. परंतु ही सुधारणा सर्वत्र दिसून आली नाही. बाजारामधील आवक जास्त आहे तोपर्यंत कापूस दर कमीच राहणार आहे. शेतकरी सध्या कापूस विकत आहेत म्हटल्यावर दड वाढवले जाणार नाहीत असं जाणकारांनी सांगितलेला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारामधील कापूस दर ( MCX Cotton Rate Today)

MCX Cotton Rate आंतरराष्ट्रीय बाजार आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत एक टक्क्यांनी वाढले होते. आज 83.35 सेंड प्रतिपादवर कापसाने टप्पा गाठला होता. क्विंटल मध्ये हा भाव 15 हजार 100 रुपये असा होतो. देशांमधील कापूस 63 हजार 400 रुपये प्रतिखंडीवर होता. क्विंटल मध्ये हा भाव 17 हजार 500 रुपये असा होतो.

देशातील कापूस बाजार भाव ( Cotton Rate Today)

देशामध्ये कापसाला सध्या स्थितीला सरासरी 7 हजार 700 ते 8 हजार 400 रुपये भाव मिळत आहे. हा भाव सरासरी आहे किमान भाव यापेक्षा कमी असतो. जास्तीत जास्त कापसाला मिळालेल्या भावाची आपण चर्चा करत असतो. किमान किंवा कमाल भाव जास्त शेतकऱ्यांना मिळत नाही.

Cotton Rate Today: देशातील कापूस दर कधी वाढणार? अजून शेतकऱ्यांकडे 45 टक्के कापूस शिल्लक

Cotton Rate Today आजचे कापुस बाजार भाव, या बाजार समितीमध्ये मिळाला सर्वाधिक दर, पाहा आपल्या भागात काय दर मिळाला.

एप्रिल महिन्यामध्ये कसा राहील कापूस बाजार भाव ( Cotton Market In April)

एप्रिल महिन्यामध्ये काही दिवस कापसाचे भाव जास्त राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आवक सरासरीपेक्षा जास्त राहिल्यास या अवस्थेचा दरवाढीवर परिणाम राहू शकतो. आवक मर्यादीमध्ये झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते. तसेच एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात यूएसडीए (USDA) आणि त्यानंतर सीएआयचा अंदाज येईल. हा अंदाज आल्यानंतर कापूस उत्पादन कमी केल्यास दरवाढ लगेच दिसू शकते कापूस उत्पादनाचे आकडे पुढील काळामध्ये कमी होऊ शकतात अशी सध्या बाजारामध्ये चर्चा आहे. यामुळे कापूस दर जास्त दिवस कमी राहणार नाही. आंतरराष्ट्रीय (Mcx Cotton Rate) बाजारातील दरवाढीचा ही आधार देशातील कापूस बाजाराला मिळेल.

परंतु शेतकऱ्यांनी कापूस विकताना विचारपूर्वकच व माहिती घेऊन कापूस विकण्याचा निर्णय घ्यावा आपण कापूस विकत असलेल्या बाजारांमधील दराची विकण्याअगोदरच माहिती घ्यावी. कापूस दरावर नेहमी लक्ष ठेवावे.

Cotton Rate Today: देशातील कापूस दर कधी वाढणार? अजून शेतकऱ्यांकडे 45 टक्के कापूस शिल्लक

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

Leave a Comment