Crop Insurance अमरावती जिल्ह्यामधील गेल्यावर्षी पावसाने नुकसानीसाठी प्रलंबित 27000 शेतकऱ्यांपैकी 6129 शेतकऱ्यांना 7 मार्च पासून पिक विमा कंपनीद्वारे जमा करण्यात आला.
अजूनही नैसर्गिक आपत्तीमुळे Crop Insurance नुकसान झालेले 14 000 व काढणीपशात पिकाचे नुकसान झालेले 7172 शेतकरी विम्याच्या प्रतीक्षा मध्ये आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये जुलै ते ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये तब्बल 84 महसूल मंडळात अतिवृष्टीचा पाऊस झाला होता. यामध्ये जिल्ह्यामधील तीन लाख हेक्टर शेती पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते.
नैसर्गिक Nuksan Bharpaiआपत्ती झाल्यामुळे 1.26 लाख शेतकऱ्यांनी कंपनीकडे तक्रार अर्ज दाखल केले होते. या सर्व अर्जापैकी 26 हजार 384 अर्ज विमा कंपनीने विविध कारणे सांगून नाकारले. तसेच ७२६३९ शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीसाठी 71.94 कोटीचा विमा परतावा कंपनीद्वारे देण्यात आला.
