Crop Insurance Claim केंद्र सरकारने जास्त पाऊस वादळी वारापूर गारपीट आणि इतर नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान भरपाई मिळावी म्हणून प्रधानमंत्री फसल बीमा योजना (Crop Insurance)सुरू केलेली आहे. नुकतेच आपण प्रधानमंत्री पिक विमा योजना Pik Vima Yojana खरीप हंगाम किंवा रब्बी 2022 साठी अर्ज ही केला असेल.
यामध्ये शेतकऱ्यांना प्रीमियम भरून नुकसान भरपाई मिळते. प्रधानमंत्री पिक विमा योजना लागवडीच्या आधी आणि काढणीनंतरही पिकाला संरक्षण देते. या योजनेमध्ये पिकाच्या पेरणी पासून ते काढणीपर्यंतच्या हंगामात कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान (Crop Insurance Claim) झाले तर त्याची नुकसान भरपाई मिळते.
पिकाची नुकसान झाल्यास 72 तासाच्या आत भरपाईसाठी माहिती देणे आवश्यक:
पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा crop insurance भरल्यानंतर नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटानंतर 72 तासाच्या आत कंपनीला नुकसान झाल्याची माहिती द्यावी लागते.
वादळी वारा, भूखलन, गारपीट, नैसर्गिक आग, ढगफुटी आणि उभ्या पिकाचे इतर नैसर्गिक कारणाने नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पिक विमा योजनेतून नुकसान भरपाई साठी (Crop Insurance Claim) दावा करता येतो. अति पाऊस चक्रीवादळ गारपीट त्याच्या काढणीनंतर नुकसान झालं तरी पण विम्याचा संरक्षण दिले जाते. या दोन्ही परिस्थितीत शेतकरयांना विमा कंपनीला माहिती देणे बंधनकारक आहे.
नुकसान भरपाई कशी मिळवावी: Crop Insurance Claim
मंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा दावा मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो. अर्ज करण्यासाठी शेतकरी दोन पद्धतीमध्ये अर्ज करू शकतो एक ऑनलाईन पद्धत किंवा ऑफलाईन यापैकी कोणत्याही प्रकारे शेतकरी भरपाईसाठी अर्ज करू शकतात. तसेच आपल्या जिल्ह्यानुसार जी कंपनी असेल त्या कंपनीला त्यांच्या टोल फ्री क्रमांकावर फोन किंवा इमेल करून देखील तक्रार Crop Insurance Claim करू शकतात.
- ऑनलाईन तक्रार कशी करावी हे पाहूयात : Crop Insurance App
- शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाल्यास नुकसानीची माहिती ऑनलाईन पद्धतीने कंपनीला देण्यासाठी शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर Play Store वर जाऊन क्रॉप इन्शुरन्स Crop Insurance ॲप डाऊनलोड करायचे आहे.
- खालील दिलेल्या लिंक वरून क्रॉप इन्शुरन्स Crop Insurance ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरू शकता.
- क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन ओपन झाल्यानंतर आपल्याला त्यामधील चेंज लैंग्वेज पर्याय निवडून त्यावरील भाषा मराठी करायची आहे. भाषा निवडल्यानंतर त्यामध्ये लॉगिन करण्यासाठी तीन पर्याय आहेत.
१) शेतकरी म्हणून नोंदणी करा
२) पॉलिसीसाठी प्रवेश करा
३) नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा
वरीलपैकी एक पर्याय निवडून लोगिन करा.
क्रॉप इन्शुरन्स ॲप मध्ये लॉगिन झाल्यानंतर पिक विमा अंतर्गत नुकसान भरपाई Crop Insurance Claim मिळवण्यासाठी पीक नुकसान Crop Insurance Claim हा एक पर्याय दिसेल या पर्याय वरती क्लिक करा. त्यानंतर पुढे पीक नुकसानीची पूर्वसूचना या पर्यायावर ती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाका आणि त्यानंतर मोबाईल नंबर वरती आलेला जो ओटीपी आहे तो टाका.
त्यानंतर आपण पिक विमा कुठून भरला म्हणजे स्वतः भरला की सीएससी सेंटर वरती भरला का बँक मध्ये भरला हा आपला नोंदणीच्या स्रोत निवडा आणि त्यानंतर आपला पिक विमा पावतीवरील पॉलिसी नंबर टाका आणि Done वर क्लिक करा.
त्यानंतर आपल्या पिक निवडून पिकनिक सणाची सर्व माहिती भरून नुकसानीचा फोटो किंवा व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि विमा क्लेम सबमिट करायचा आहे.
- अशी करा ऑफलाइन तक्रार:
Crop Insurance Claim ऑफलाइन तक्रार देण्यासाठी आपण विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक वर किंवा ई-मेलवर तक्रार देऊ शकता.

समाविष्ट जिल्हे त्यांचे टोल फ्री क्रमांक व ईमेल आयडी
1) कोल्हापूर, चंद्रपूर, जालना, गोंदिया, नाशिक, अहमदनगर : नियुक्त केलेली विमा कंपनी – HDFC ऍग्रो इन्शुरन्स कंपनी लिमिटेड टोल फ्री क्रमांक १८००२६६०७०० ई- मेल – prmfby.maharashtra@hdfcergo.com
2) जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, सातारा, भंडारा, पालघर, वाशिम, रायगड, सांगली, बुलढाणा, यवतमाळ, नंदुरबार, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर : न्युक्त केलेली विमा कंपनी – भारतीय कृषी विमा कंपनी टोल फ्री क्रमांक १८००४१९५००४ ई-मेल- pikvina@aloofindia.com
3) नागपूर, वर्धा, परभणी, हिंगोली, धुळे, अकोला, पुणे: नियुक्त केलेली विमा कंपनी – ICICI Lombard general insurance company limited लिमिटेड टोल फ्री क्रमांक १८०० १० ३७ ७१२ ई-मेल- customersupportba@icicilombard.com
4) ठाणे, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग: नियुक्त केलेले विमा कंपनी – युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड टोल फ्री क्रमांक १८००२३३५५ ५५ ई-मेल – pmfbypune@ulic.com
5) बीड: नियुक्त केलेली विमा कंपनी- बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड टोल फ्री क्रमांक १८०० २० ९५ ९५९ ई-मेल – bagichelp@bajajallianz.com
वरील लेख कसा वाटला नक्की कमेंट करा तसेच सर्व मित्रांना शेअर करा..
पिक विमा क्लेम Crop Insurance App वरून कसा करायचा हे व्हिडिओद्वारे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.