E Land Record – ई मोजणी प्रकल्प अंतर्गत आता जमिनीची मोजणी करा, शेतकऱ्यांना आता भूमी अभिलेख कार्यालयात खेटे मारावे लागणार नाही

E Land Record शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष त्रास देणारी जमीन मोजणी ची पद्धत व कागदी नकाशे यापुढे आता कायमची रद्द होणार आहेत. भूमी अभिलेख ( Land Record) कार्यालय आता जीपीएस च्या मदतीने इमोजणी प्रकल्प (E- Land Survey) हा राज्यभर राबविला जाणार आहे. शासनाच्या या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना आता भूमी अभिलेख ऑफिसच्या कार्यालयामध्ये खेटे मारावे लागणार नाहीत. जमीन मोजणीचे डिजिटल नकाशे ( E Land Record) आता थेट एका कॉलवर उपलब्ध होणार आहेत.

सध्याची जमिनीची मोजणी ची पद्धत दुर्बिणीद्वारे होते व या पद्धतीच्या गैर व्यवहाराला चालना देणारी पद्धत असल्यामुळे शेतकऱ्यांना या पद्धतीचा खूप त्रास होतो. या दुर्बीण द्वारे पद्धतीमुळे शेतकऱ्यांना भूमी अभिलेख (E Land Record) कार्यालयाच्या कित्येकदा खेट्या माराव्या लागतात तेव्हा त्यांच्या जमिनीची मोजणी होते. परंतु आत्ता जीपीएस पद्धतीने मोजणी करताना मानवी हस्तक्षेप जास्त होणार नाही.

सध्या जर आपण जमिनीची मोजणी केली तर जमिनीचा नकाशा (Land Map) नुसता एका कागदावर शेतकऱ्यांना दिला जातो. या कागदावरील नकाशांमध्ये शेतजमीन किती कुठे व सुस्थितीत आहे की नाही याचा काहीही शेतकऱ्यांना अंदाज लागत नाही. जेव्हा भूमी अभिलेख ( Bhumi Abhilekh) कार्यालय मधील कर्मचारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात येतात तेव्हाच जमिनीचे नेमके ठिकाण कोणते व स्थान कोणते ते कळते. या कारणास्तव जमिनीचे सध्याचे कागदी रेकॉर्ड अमूल्य असले तरी शेतकऱ्यांसाठी ते खूप कुचकामी आहेत.

या नव्या प्रकल्पाद्वारे म्हणजेच ही मोजणी प्रकल्प द्वारे जुने सर्व कागदी नकाशे आता रद्द होणार आहेत. कागदी नकाशा ऐवजी आता डिजिटल नकाशे (E Land Record) शेतकऱ्यांना मिळणार आहेत. गावांमधील सार्वजनिक सेवा केंद्रात म्हणजेच महा-ई-सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्रात तसेच आपल्या घरामधील संगणकावर किंवा मोबाईलवर देखील स्वतःचे जमिनीचे डिजिटल नकाशे आता आपण पाहू शकणार आहात.

हे नकाशे उपलब्ध झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अक्षरांश व रेखांश दिले जाणार आहे. या नवीन पद्धतीमध्ये शेतकरी आपल्या मोबाईल मध्ये एप्लीकेशन वापरून शेतकरी त्यांच्या स्वतःची शेतजमीन हद्द मोबाईलवरच पाहू शकतो. या नवीन पद्धतीमुळे शेतकऱ्यांची एक इंच जमीन देखील अडकली जाणार नाही असा दावा ई मोजणी प्रकल्प खात्याकडून केला जात आहे.

E Land Record - ई मोजणी प्रकल्प अंतर्गत आता जमिनीची मोजणी करा, शेतकऱ्यांना आता भूमी अभिलेख कार्यालयात खेटे मारावे लागणार नाही

Land Map: आपल्या जमिनीचा ऑनलाईन नकाशा पहा आपल्या मोबाईलवर

राज्यामध्ये दरवर्षी जवळजवळ दीड लाख ठिकाणी शेत जमिनीची मोजणी केली जाते. आता या नवीन पद्धतीमध्ये मोजणी करताना पूर्ण डिजिटल ( Digital Land Record) पद्धतीने केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत जुन्या मोजणीतील कागदी रेकॉर्ड नकाशे E Land Record संगणकीय स्वरूपामध्ये तयार करण्याचे काम सध्या चालू आहे.

जमीन मोजणी नकाशे संगणकीय करण्यासाठी 2012 च्या ई मोजणी प्रणाली (E- Land Survey) मध्ये सुधारणा केली जात आहे. या प्रणाली नंतर दुसरी आवृत्ती अर्थात ई-मोजणी वर्जन 2.0 सुरू केले जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता जमीन मोजण्यासाठी (E Land Record) शेतकऱ्यांना भूमी अभिलेख ( Bhumi Abhilekh) खात्याच्या कार्यालयामध्ये चक्र मारण्याची गरज भासणार नाही.

इमोजणी व्हर्जन 2.0 (E- Land Survey) अंतर्गत शेतकऱ्यांना मोजणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येणार आहेत. मोजणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल केल्यानंतर मोजणी शुल्क ही ऑनलाईनच भरता येणार आहे. व मोजणीसाठी जी कागदपत्रे आवश्यक असणारे कागदपत्र देखील ऑनलाईन अपलोड करता येणार आहेत. हा ई मोजणी प्रकल्प वाशीमध्ये यशस्वी झाला आहे त्यामुळे आता पुढे हा प्रकल्प पुणे व अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे. तेथील चाचणी यशस्वी झाल्यानंतर अंतिम सुधारणा झाल्याच्या नंतर मी 2023 पासून हा प्रकल्प पूर्ण राज्यभर राबविण्यात येईल.

E Land Record ई-मोजणी व्हर्जन दोन मुळे नेमके काय फायदा होणार?

  • शेतकऱ्यांना जीआयएस मोजणी नकाशे मिळतील ते कोणत्याही ठिकाणाहून बघण्याची सुविधा उपलब्ध असेल.
  • उजनीच्या कार्यपद्धतीचे संगणीकरण नकाशे डीजेटायझेशन आणि भू संदर्भीकरण होणार.
  • नकाशामध्ये प्रत्यक्ष रियल कॉर्डिनेट्स असतील. अक्षरावरून रेखांश आपली जमीन कशी किती आणि कुठे हे लगेच समजेल.
  • शेतजमिनीवर एखाद्या शेतकऱ्याचे अतिक्रमण असल्यास ते कळेल तसेच अनधिकृत बांधकाम करणे किंवा जमीन हडपण्याचे प्रकारही थांबणार.
  • हद्द कायम करण्याची मोजणी पोठीशाची मोजणी यापुढे जीपीएस द्वारे होईल त्याचे डिजिटल नकाशे लगेच उपलब्ध होतील.
  • मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज करताच पुढील माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस द्वारे कळेल.
  • मोजणी नोटीसादेखील डिजिटल स्वाक्षरी मध्ये काढल्या जातील त्यामुळे सरकारी कार्यालयातील वेळेच्या अपव्यय टाळणार

E Land Record - ई मोजणी प्रकल्प अंतर्गत आता जमिनीची मोजणी करा, शेतकऱ्यांना आता भूमी अभिलेख कार्यालयात खेटे मारावे लागणार नाही

Leave a Comment

Close Visit Mhshetkari