Hailstorm Dhule – धुळे जिल्ह्यात जबरदस्त गारपीट, रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान, पहा व्हिडिओ

By Bhimraj Pikwane

Published on:

Hailstorm Dhule धुळे जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. जिल्ह्यातील खोरी तीटणे परिसरात ही गारपीट झाली आहे. आधीच शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारपासून साक्री तालुक्‍यातील बहुतांश ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि गारपिटीसह जोरदार पाऊस झाला.

सुमारे एक ते दीड तास सुरू असलेल्या या मुसळधार अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, कांदा यासह शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सकाळपासून ढगाळ वातावरण त्यानंतर दुपारी अचानक झालेल्या अवकाळी पावसाने जोरदार गारपीट झाल्याने सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे. या अवकाळी पावसामुळे गवत हिरवे झाले असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Hailstorm Dhule - धुळे जिल्ह्यात जबरदस्त गारपीट, रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान, पहा व्हिडिओ

Hailstorm Dhule धुळे गारपीट व्हिडीओ येथे पहा

Hailstorm Dhule - धुळे जिल्ह्यात जबरदस्त गारपीट, रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान, पहा व्हिडिओ

Bhimraj Pikwane

MhShetkari या वेबसाईट द्वारे नव-नवीन शेती विषयी योजनाची तसेच चालू घडामोडीं बद्दल माहिती देत असतो. माहिती कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगत जा, तसेच अपडेट राहण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप नक्की जॉईन करा.

1 thought on “Hailstorm Dhule – धुळे जिल्ह्यात जबरदस्त गारपीट, रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान, पहा व्हिडिओ”

Leave a Comment