Loan Waiver List: 50 हजार प्रोत्साहन अनुदान लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अशा शेतकऱ्यांची आता 5 वी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ही यादी आपण जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र(ASSK) किंवा सीएससी सेंटर तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्था, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तेथे पाहू शकता.
ज्या शेतकऱ्यांची यादी मध्ये नावे आहेत अशा शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, कर्ज खाते पासबुक व बचत खाते पासबुक घेऊन आपल्या जवळील आपल्या सरकार सेवा केंद्र किंवा बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण लवकरात लवकर करून घ्यावे.
हे शेतकरी राहणार पात्र | Farmer Loan Waiver List
वर्ष 2017-18 व 2018-19 व 2019-20 या तीन आर्थिक वर्षापैकी दोन वर्षांमध्ये आपल्या घेतलेल्या पीक कर्जाची शासन निर्णयामध्ये दिल्याप्रमाणे विविध कालावधीमध्ये परतफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहन पर कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे.
ज्या शेतकऱ्यांची प्रसिद्ध यादीमध्ये नावे आहेत अशा शेतकऱ्यांनी यादी मधील (Loan Waiver List) नावासमोरचा दर्शविलेला विशिष्ट क्रमांक तसेच कर्ज खाते पासबुक व आधार कार्ड घेऊन बँकेच्या शाखेमध्ये किंवा आपले सरकार केंद्रामध्ये जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करायचे आहे. आधार प्रमाणे करण करताना संगणकावर दर्शवल्याप्रमाणे कर्ज खात्याचा तपशील आपला आधार क्रमांक या बाबीची खात्री करून आपले आधार प्रमाणे करण यशस्वीरित्या पूर्ण करावे. आधार प्रमाणीकरण केल्यानंतर कर्जमाफी लाभाची रक्कम लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा होते.
आपण खाली काही जिल्ह्यांच्या लाभार्थी यादी (Farmer Loan Waiver List) या ठिकाणी डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. बाकी जिल्ह्यामधील लाभार्थी यादी पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर किंवा आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन आपले नाव तपासून आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे.

कर्ज माफी यादी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
Official Website – https://mjpsky.maharashtra.gov.in/
वरील ज्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी दिलेली आहे ही यादी अंतिम नसून ज्याप्रमाणे बँकेकडून माहिती राज्य शासनाला उपलब्ध होते त्याप्रमाणे कर्ज खात्याची यादी या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची नावे पुढील यादीमध्ये प्रदर्शित होतील.
1 thought on “Loan Waiver List: कर्ज माफी 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची 5 वी लाभार्थी यादी जाहीर, आपले नाव तपासा”